सॅनिटरी नॅपकिन्स तर पाळीच्या चार दिवसात आपण वापरतो. पण प्रश्न गंभीर आहे तो त्याची विल्हेवाट कशी लावायची असा? कापड वापरलं तर धुवून वापरता येतं पण नॅपकिन्सचा कचरा नष्ट होत नाही. शहरात तर डस्टबिनमध्ये न गुंडाळता टाकलेले नॅपकिन्स सफाई कामगारांना हाताळावे लागतात. त्यांच्याही आरोग्याचे प्रश्न आहेत, कचऱ्याचेही प्रश्न आहेत. दुसरीकडे बायकांसमोर प्रश्न आहे की मग ते वापरलेलं नॅपकिन टाकायचं कुठं आणि कसं? त्याएवजी कप वापरता येईल का अशी नवीन चर्चा आणि पर्याय याचदृष्टीने समोर येत आहे. कप वापरणं अजूनही अनेकींना जमत नाही, त्या नॅपकिनच वापरतात पण मग त्याची विल्हेवाट कशी लावायची हे समजून घेतलं पाहिजे.
एकच नॅपकिन किती काळ वापरायचा.? दिवसाला किती नॅपकिन वापरायचे.?
नॅपकिन वापरण्याचा उद्देशच मुळात स्वच्छता हा आहे. त्यामुळे दिवसाला किमान ३ नॅपकिन वापरायला हवे. आठ तासाने एकदा नॅपकिन बदलायलाच हवा. ज्या मुलींना रक्तस्त्राव कमी होतो त्या नॅपकिन बदलत नाही मात्र जे रक्त नॅपकिनमध्ये साठवलं जात त्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते. गर्भाशय आणि योनीमार्गाची त्वचा नाजुक असते त्यातुन जंतुसंसर्ग होऊ शकतो. लैंगिक संबंधातून झालेले संसर्ग त्यामुळे वाढू शकतात. म्हणून नॅपकिन बदलण्याची दक्षता घ्यायलाच हवी.
(Image :google)
टाकायचे कुठे?
१. आधीच आपल्याकडे हा विषय अत्यंत संकोचाचा. अंधारातला त्यात हे नॅपकिन उघडय़ावर टाकणार कसे? शहरात मुली कागदात गुंडाळून घंटागाडीत टाकतात, मात्र अनेकदा ते नीट पॅक केलेले नसतात. ते नीट पॅक करुन, डस्बिनला टाकावे. त्यातून दुर्गंधी येते. अनेकदा ते ओल्या कचऱ्यातच टाकले जाते तसे करु नये.
२.उघडय़ावर टाकले तर कुत्री ते खाण्याचा प्रयत्न करतात. असे होऊ नये असे वाटत असेल तर ते नॅपकिन एखाद्या खडय़ात पुरावे. उकिरडय़ात टाकावे, फ्लश करु नये.
(Image :google)
३.आपण मासिक पाळीचं चक्र समजून घेतलं आहे. त्याप्रमाणे आपण आपले नॅपकिन कुठं टाकणार याचा विचार करायला हवा. मुद्दा एवढाच आहे की हे नॅपकिन्स कुत्री, गायी-म्हशी खाणार नाहीत, उघडय़ावर पडलेली दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी. बाकीच्यांच्या आरोग्याचाही त्यामुळे प्रश्न निर्माण होतो.