Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळी वेळेवर येत नाही? कधी लवकर तर कधी २-३ महिन्यांनी येते? ४ टिप्स; त्रास होईल कायमचा दूर

मासिक पाळी वेळेवर येत नाही? कधी लवकर तर कधी २-३ महिन्यांनी येते? ४ टिप्स; त्रास होईल कायमचा दूर

How to Get Periods: Natural Home Remedies to Prepone Menstruation : अनेक महिलांना मासिक पाळी वेळेवर न येण्याच्या समस्येचा त्रास होतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2024 06:47 PM2024-11-18T18:47:52+5:302024-11-18T18:49:48+5:30

How to Get Periods: Natural Home Remedies to Prepone Menstruation : अनेक महिलांना मासिक पाळी वेळेवर न येण्याच्या समस्येचा त्रास होतो..

How to Get Periods: Natural Home Remedies to Prepone Menstruation | मासिक पाळी वेळेवर येत नाही? कधी लवकर तर कधी २-३ महिन्यांनी येते? ४ टिप्स; त्रास होईल कायमचा दूर

मासिक पाळी वेळेवर येत नाही? कधी लवकर तर कधी २-३ महिन्यांनी येते? ४ टिप्स; त्रास होईल कायमचा दूर

मासिक पाळीतील (Menstruation) '४' दिवस महिलांसाठी फार महत्वाचे ठरतात. महिन्याला मासिक पाळी येणं फार गरजेचं आहे. पण जर पिरीएड्स वेळेवर येत नसेल तर? मासिक पाळी वेळेवर न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात (Home Remedies). PCOS, PCOD, पौष्टिकतेची कमतरता किंवा कोणत्याही आरोग्य समस्यांमुळे होऊ शकते (Health Tips). मासिक पाळी वेळेवर न येणे शरीरासाठी अजिबात सुरक्षित नाही. त्यामुळे शरीरात सिस्ट्स तयार होतात. मासिक पाळी चुकल्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात.

अशा परीस्थित डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार करणे गरजेचं आहे. यासह आहार आणि जीवनशैलीत देखील काही बदल करणे गरजेचं आहे. जर आपल्या देखील मासिक पाळीमध्ये अनियमितता असेल, तर होमिओपॅथ आणि पोषणतज्ज्ञ डॉ. स्मिता भोइर यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या दूर होतील(How to Get Periods: Natural Home Remedies to Prepone Menstruation).

कच्ची पपई

मासिक पाळी जर अनियमित असेल तर, कच्ची पपई खाणे फायदेशीर ठरू शकते. त्यात पॅपेन नावाचे नैसर्गिक संयुग आढळते, जे गर्भाशयाच्या स्नायूंचा विस्तार करण्यास मदत करते. यामुळे रक्त प्रवाह वाढतो आणिमासिक पाळी येण्यास मदत होते. आपण नियमित सकाळी वाटीभर कच्ची पपई खाऊ शकता.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

बीटरूटचा रस

मासिक पाळीचा त्रास होऊ नये म्हणून आपण आहारात बीटरूटच्या रसाचा समावेश करू शकता. दररोज बीटरूटचा रस प्यायल्याने रक्त प्रवाह वाढण्यास मदत होईल. बीटरूटमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड सारखे पोषक घटक आढळतात, जे हार्मोनल आरोग्य वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे रक्तप्रवाह वाढतो.


विविध प्रकारच्या बिया खा

पिरीएड्सदरम्यान अडथळे येऊ नये, यासाठी आहारात बियाणांचा समावेश करा. आपण अळशीच्या बिया. चिया सीड्स, पांढरे तीळ आणि भोपळ्याच्या बिया इत्यादी खाऊ शकता. यात ओमेगा 3 फॅटी ऍसिडसह झिंक आणि मॅग्नेशियम देखील असतात. ज्यामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन्स संतुलित राहतात. आणि मासिक पाळीमध्ये अडथळे येत नाही.

किचन सिंक सतत तुंबते? पाईपला गुंडाळा 'ही' १ गोष्ट; मग बघा कमाल - सिंक ब्लॉकची कटकटच सुटेल

मेडिटेशन

बऱ्याचदा स्ट्रेस घेतल्याने पिरीएड्स सायकलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज मेडीटेशन करा. तणाव नियंत्रित केल्याने, कोर्टिसोल संतुलित राहील. जे पीरियड्स सायकलसाठी हे आवश्यक आहे.

Web Title: How to Get Periods: Natural Home Remedies to Prepone Menstruation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.