Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > पाळी अनियमित आहे? कधी लवकर येते कधी खूप उशीरा? डॉक्टर सांगतात १ उपाय

पाळी अनियमित आहे? कधी लवकर येते कधी खूप उशीरा? डॉक्टर सांगतात १ उपाय

How to Get Regular Periods Naturally, 1 Easy Home Remedy मासिक पाळीच्या त्रासावर किरकोळ उपचार घेऊन चालत नाही, वेळेत डॉक्टरांना भेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 05:44 PM2023-05-23T17:44:04+5:302023-05-23T17:44:48+5:30

How to Get Regular Periods Naturally, 1 Easy Home Remedy मासिक पाळीच्या त्रासावर किरकोळ उपचार घेऊन चालत नाही, वेळेत डॉक्टरांना भेटा

How to Get Regular Periods Naturally, 1 Easy Home Remedy | पाळी अनियमित आहे? कधी लवकर येते कधी खूप उशीरा? डॉक्टर सांगतात १ उपाय

पाळी अनियमित आहे? कधी लवकर येते कधी खूप उशीरा? डॉक्टर सांगतात १ उपाय

महिन्यातील ते चार दिवस महिलांसाठी खूप अवघड जातात. सध्याच्या पिढीमध्ये अनेक स्त्रियांची मासिक पाळी ही वेळेवर येत नाही. कधी ठराविक तारखेच्या आधी तर कधी नंतर येते. मासिक पाळी वेळेवर न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. स्ट्रेस, वजन वाढणे, हार्मोन्सचे असंतुलन, पीसीओडी, गर्भ निरोधकांचे वापर, थायरॉईड इत्यादी कारणांमुळे ही समस्या उद्भवते.

मासिक पाळी वेळेवर यावी यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. परंतु मासिक पाळी हा विषय नाजूक असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात, आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य मिहीर खत्री यांनी मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी एक घरगुती उपाय आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे(How to Get Regular Periods Naturally, 1 Easy Home Remedy).

मासिक पाळी वेळेवर यावी यासाठी उपाय

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये 3-4 चमचे (15-20 ग्रॅम) काळे तीळ घ्या. त्यात ४ कप पाणी घालून उकळवा. पाण्याला उकळी आल्यानंतर चेक करा. त्यात एक कप पाणी शिल्लक राहिले की, एका ग्लासमध्ये गाळून घ्या. शेवटी त्यात १-२ चमचे गूळ मिसळून प्या.

भयंकर उकाडा, रात्री झोपच लागत नाही? ७ उपाय- घाम कमी-झोपही लागेल शांत

या वेळेला करा सेवन

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, ''मासिक पाळी उशीरा येत असल्यास, सकाळी रिकाम्या पोटी या आयुर्वेदिक पेयाचे सेवन करा. ते प्यायल्यानंतर अर्धा तास पाणी सोडून काहीही खाऊ नका किंवा पिऊ नका. मासिक पाळी येईपर्यंत हा उपाय रोज करा.

अनियमित मासिक पाळीसाठी उपाय

जर आपली मासिक पाळी दर महिन्याला वेळेवर येत नसेल तर, हा पेयाचे सेवन दर महिन्याला करा. जेव्हाही तुमची पुढील अपेक्षित तारीख असेल, तेव्हा एक आठवडा आधी या आयुर्वेदिक पेयाचे सेवन करा. तीन ते ४ महिने या पेयाचे सेवन केल्याने, अनियमित मासिक पाळीची समस्या कमी होईल.

मासिक पाळीच्या चार दिवसात शारीरिक संबंध ठेवावेत का? डॉक्टर सांगतात, आरोग्यसाठी योग्य काय...

मासिक पाळीसाठी काळ्या तिळाचे फायदे

काळे तीळ झिंकने समृद्ध असतात. यासह इन्शुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी योग्यरीत्या कार्य करते. काळे तीळ उबदार असतात. जे अतिरिक्त कफ कमी करून मासिक पाळी नियमित करण्यासाठी मदत करतात.

Web Title: How to Get Regular Periods Naturally, 1 Easy Home Remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.