Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > पिरिएड्समध्ये फक्त दोनच दिवस रक्तस्त्राव होतो, हे कशाचं लक्षण? नियमित पाळी येण्यासाठी काय करावे?

पिरिएड्समध्ये फक्त दोनच दिवस रक्तस्त्राव होतो, हे कशाचं लक्षण? नियमित पाळी येण्यासाठी काय करावे?

How to Get Regular Periods Naturally : काहींना पाळी आल्यानंतर फक्त २ दिवस रक्तस्त्राव होतो पुढचे ४ दिवस अंगावरून जात नाही. ही एक गंभीर समस्या असू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 02:41 PM2023-09-03T14:41:20+5:302023-09-04T15:18:57+5:30

How to Get Regular Periods Naturally : काहींना पाळी आल्यानंतर फक्त २ दिवस रक्तस्त्राव होतो पुढचे ४ दिवस अंगावरून जात नाही. ही एक गंभीर समस्या असू शकते.

How to Get Regular Periods Naturally : Foods for Regulate Your Periods Home Remedies for Irregular Periods | पिरिएड्समध्ये फक्त दोनच दिवस रक्तस्त्राव होतो, हे कशाचं लक्षण? नियमित पाळी येण्यासाठी काय करावे?

पिरिएड्समध्ये फक्त दोनच दिवस रक्तस्त्राव होतो, हे कशाचं लक्षण? नियमित पाळी येण्यासाठी काय करावे?

साधारपणपणे २८ ते ३० दिवसांनी महिलांची मासिक पाळीची सायकल रिपीट होत असते. पाळी आल्यानंतर ४ ते  ७  दिवसांपर्यंत रक्तस्त्राव होतो. अनेकींना  हार्मोनल बदल, वजन वाढ, गंभीर आजार, खाण्यापिण्यात अनियमितता यामुळे पाळी वेळेवर येत नाही. तर काहींना पाळी आल्यानंतर फक्त २ दिवस रक्तस्त्राव होतो पुढचे ४ दिवस अंगावरून जात नाही. ही एक गंभीर समस्या असू शकते. डॉ. प्रियांका अभिनव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to Get Regular Periods Naturally)

चुकीची जीवनशैली, अनहेल्दी खाण्यापिण्याच्या सवयी, झोपेचा अभाव, जास्त विचार करणं यामुळे पिरिएड्स सायकलवर परिणाम होतो. पीसीओडी, लठ्ठपणा, ओव्हरीयनं सिस्ट, पीसीओएस, हार्मोनल इम्बेलेंसस यामळे पाळी अनियमित येते.  या समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क नक्की साधा. (Effective Home Remedies For Irregular Periods)

पिरिएड्स नियमित येण्यासाठी काय करावे? (Foods for Regulate Your Periods)

१) रेग्युलर ५ दिवस ब्लड फ्लो होण्यासाठी पिरिएड्सच्या येण्याच्या ५ दिवस आधीपासूनच पपई खायला सुरूवात करा. पिकलेली पपई रोज खा, सकाळी उठल्यानंतर आलं घातलेलं कोमट पाणी प्या. पांढरे तीळ रोज १ चमचा खा.ओवा, दालचिनीचे पाणी, हिंगाचे पाणी यापैकी कोणत्याही ड्रिंकचे सेवन तुम्ही करू शकता, आहारात पालक आणि गाजराचा समावेश करा.

२) पिरिएड्स अनियमित असतील किंवा अधिक वेदना जाणवत असतील तर अननसाचे सेवन करा. या फळात ब्रोमेलन नावाचे एन्जाईम असते जे युटरस लाईनिंगमध्ये येणारी समस्या दूर करते. याव्यतिरिकक्त लाल आणि पांढऱ्या रक्तपेशींची निर्मीती वाढते. आणि  पिरिएड्सदरम्यान रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. 

३) बडिशेपेचं पाणी पिरिएड्स नियमित करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. यामुळे हार्मोनल संतुलन व्यवस्थित राहतं. ओव्ल्यूलेशन वाढते, मासिक पाळीमुळे येणाऱ्या वेदना, पोटदुखीपासून आराम मिळतो. एक ग्लास उकळत्या पाण्यात  १ ते २ चमचे बडीशेप घाला. अर्ध राहिल्यानंतर गाळून हे पाणी प्या.  बडिशेपेचं पाणी प्यायल्यानं अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होते. 

४) औषधी गुणांनी परिपूर्ण हळद अनियमित पिरिएड्सची समस्या दूर करते. एक चमचा हळदीत दूध मिसळा आणि गोडवा येण्यासाठी तुम्ही त्यात मध घालू शकता. 

Web Title: How to Get Regular Periods Naturally : Foods for Regulate Your Periods Home Remedies for Irregular Periods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.