Join us

पाळीच्या वेदना असह्य होतात, पोट-कंबर खूप दुखते? तज्ज्ञ सांगतात १ उपाय, मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2023 15:35 IST

How To Reduce Period Pain According to Nutritionist Lavneet Batra : दर महिन्याला होणारी पोटदुखी कमी करायची तर..

दर महिन्याला येणारी पाळी अनेकींना नकोशी होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाळीच्या दरम्यान पोटात येणाऱ्या कळा आणि क्रॅम्प. कधीकधी या कळा इतक्या जास्त असतात की अक्षरश: नकोसे होऊन जाते. मात्र पाळीला आणि या कळांना काहीच पर्याय नसल्याने आपल्याला त्या सहन कराव्या लागतात. काही वेळा या कळा असह्य झाल्या की आपण डॉक्टरांकडे जातो आणि हे दुखणे कमी होण्यासाठी काही औषधे घेतो. पण घरच्या घरी काही सोप्या उपायांनी आपली दर महिन्याला होणारी ही पोटदुखी आपण कमी करु शकतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यासाठी काही सोप्या टिप्स सांगतात (How To Reduce Period Pain According to Nutritionist Lavneet Batra). 

गूळ खाणे ठरते फायदेशीर.. 

पाळीच्या काळात जास्त वेदना होत असतील तर गुळाचा खडा खाणे फायदेशीर ठरते. गुळाचा खडा खाल्ल्यास शरीरात एंडोर्फिन हार्मोनचे उत्पादन वाढते. शरीरात कोणत्याही ठिकाणी वेदना होत असतील तर डोक्याला याचे संकेत मिळतात. तेव्हा या वेदना कमी करण्यासाठी एंडोर्फिन उपयुक्त ठरते. गुळ अँटी इन्फ्लमेटरी असल्याने पोटात येणाऱ्या क्रॅम्प्सपासून दूर राहण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

गूळ खाण्याचे फायदे

१. अॅनिमियापासून बचाव होतो. 

२. डोकं चांगले काम करण्यासाठी फायदेशीर 

३. लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम मिळण्यास उपयुक्त 

४. मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत 

५. मज्जासंस्था मजबूत करण्यास फायदेशीर

गूळ उष्ण असतो मग उन्हाळ्यात कसा खायचा? 

गूळ उष्ण असतो त्यामुळे तो उन्हाळ्यात कसा खायचा असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडू शकतो. पण थोड्या प्रमाणात गूळ खाल्ला तरी चालतो. त्यामुळे पाळीच्या दरम्यान गुळाचे लहान खडे तोंडात टाकावेत. इतकेच नाही तर तुम्ही गुळाचं सरबत म्हणजेच गुळाचं पाणीही पिऊ शकता. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य