मासिक पाळी म्हणजे महिन्यातील ४ दिवस काहीसे अवघडलेले असतात. पाळी येण्याच्या आधीपासूनच आपल्याला पोटदुखी, पाय कंबर यांचे दुखणे सुरू झालेले असते. त्यातही जास्त दगदग झाली असेल तर हे ४ दिवस आणखीनच त्रासदायक होतात. अनेकदा आपल्याला सुरुवातीला फ्लो कमी होतो पण पोट, कंबर जास्त दुखते, तर काहींना सुरुवातीपासूनच खूप जास्त फ्लो होतो. आपल्याकडे पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीन्स वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. विविध प्रकारचे आणि ब्रँडचे सॅनिटरी नॅपकीन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. बरेचदा अशाप्रकारचे नॅपकीन वापरणे कम्फर्टेबल असल्याने गेल्या काही वर्षांपासून सर्वच वयोगटातील स्त्रिया ते वापरण्याला पसंती देतात (How To Take Care of Heavy Flow in Menstrual Cycle).
मासिक पाळी सुरू असताना जरुर खा ७ पदार्थ - पोटदुखी होईल कमी, अंगदुखी होईल दूर...
या नॅपकीन्सची साईज कितीही मोठी आणि चांगली असली तरी अनेकदा ते गोळा होतात आणि मग कपडे खराब होण्याची भिती वाटते. प्रवासात आणि दिवसभर नोकरीच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्या महिलांना ही भिती जास्त प्रमाणात सतावते. काहीवेळा फ्लो फारच जास्त असेल आणि नॅपकीन बदलायला वेळच मिळाला नाही तर कपडे हमखास खराब होतात. बाहेर असताना कपड्यांना डाग पडले तर अक्षरश: ओशाळल्यासारखे होते. कपड्यांवरचे हे डाग वाळले की निघणेही कठिण जाते. असे होऊ नये म्हणून सॅनिटरी नॅपकीन लावण्याची परफेक्ट आणि सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत.
१. आपण वापरत असलेल्या सॅनिटरी नॅपकीनला २ विंग्ज दिलेल्या असतात. आपण साधारणपणे आपल्या पँटीवर हा नॅपकीन लावतो आणि विंग्ज बाजूने खाली घेऊन चिकटून टाकतो. हे अगदी बरोबर आहे त्यामुळे असे करायलाच हवे.
प्रसूतीनंतर पाळी लवकर आली किंवा वर्षभर आलीच नाही तर? डॉक्टर सांगतात, शास्त्रीय सत्य
२. नेहमीप्रमाणे पँटीला एक उभा नॅपकीन लावल्यावर मागच्या बाजूला आणखी एक आडवा नॅपकीन लावायला हवा. कारण बरेचदा आपल्याला मागच्याच बाजूने लीक झाल्याचे दिसते. फ्लो जास्त असेल तर तो मागच्या बाजूला जातो आणि मागे डाग पडतो. असे होऊ नये म्हणून पँटीला मागे आणखी एक नॅपकीन लावला तर त्याचा फायदा होतो.
३. अशी काळजी घेतल्यास आपल्याला पाळीच्या काळातही अगदी बिनधास्त वावरता येते आणि सतत कपडे खराब होण्याचे किंवा डाग पडण्याचे टेन्शन वागवावे लागत नाही. किमान ५ ते ६ तास आपण अशाप्रकारे सहज वावरु शकतो. त्यामुळे पाळी कम्फर्टेबल व्हायची असेल तर ही पद्धत नक्की वापरा.