Join us   

पाळीमध्ये पोट खूप दुखत असेल तर 'या' पद्धतीने केशर खा, पोटदुखीचा त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2024 1:02 PM

How To Use Saffron For Reducing Menstrual Pain: पाळीमध्ये पोटदुखीचा खूप त्रास होत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी केशर खूप उपयुक्त ठरू शकतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

ठळक मुद्दे केशरमध्ये असणारे कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी ६ असे घटक असतात ते शारिरीक वेदना कमी करण्यासाठी मदत करतात.

मासिक पाळीचे दिवस म्हणजे अनेकींसाठी डोकेदुखीच ठरते. कारण त्या दिवसांमध्ये खूप जणींना अतिशय त्रास होतो. काही जणींना पाळी येण्याच्या ३ ते ४ दिवस आधीपासूनच पोटात बारीक दुखणं, कंबर आखडून जाणं, पोटऱ्यांमध्ये गोळे येणं असा त्रास होतो. तो त्यांचा त्रास पाळीच्या दिवसांत तर खूप जास्त वाढतो. बऱ्याच जणींना तर इतका त्रास होत असतो की पाळीच्या दरम्यानचा एक दिवस शाळा, कॉलेज, ऑफिसमधून सुटी घेऊन घरी थांबावं लागतं. असं तुमचंही असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी अगदी आतापासूनच आहारतज्ज्ञांनी सांगितलेला हा एक उपाय करणं सुरू करा..(home remedies to reduce pain during periods or menstruation)

 

पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी उपाय How to use saffron for reducing menstrual pain?

पाळीमध्ये होणारा सगळ्याच प्रकारचा त्रास कमी करण्यासाठी केशर कसे उपयुक्त ठरू शकते, याविषयी आहारतज्ज्ञ निखिल वत्स यांनी दिलेली माहिती झी न्यूजने प्रकाशित केली आहे.

प्रदुषित हवेमुळेही होऊ शकतो मधुमेह? याविषयीचा अभ्यास सांगतो- म्हणूनच आता धुळीत जाताना.... 

त्यानुसार केशरमध्ये असणारे कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी ६ असे घटक असतात ते शारिरीक वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. केशरमध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टीइन्फ्लामेट्री गुणधर्म पाळीचा त्रास कमी करतात. पाळीच्या दिवसांत अनेकजणींना शांत झोप येत नाही. त्यामुळे त्यांचा आराम होत नाही. त्यासाठीही केशर फायदेशीर ठरते. केशरमध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे शांत झोप लागते.

 

पाळीचा त्रास कमी होण्यासाठी कशा पद्धतीने केशर खावे?

पाळीचा त्रास कमी करण्यासाठी केशर दुधामध्ये मिसळून पिणे अधिक चांगले. यासाठी तुम्ही रात्री किंवा सकाळी कोणत्याही एक वेळेस दररोज नियमितपणे केशराचे दूध प्या.

जागतिक पोहे दिवस: पोह्यांचे एक से एक चवदार प्रकार, बघा यापैकी तुम्ही किती खाऊन पाहिले?

केशर टाकून दूध उकळून घेणे हा एक सोपा उपाय आहेच. पण आणखी एक उपायही करू शकता. त्यासाठी १ ग्लास दूध घ्या. त्यात ४ ते ५ केशराच्या काड्या टाकून तो ग्लास फ्रिजमध्ये ठेवून द्या. कारण दूध बाहेर ठेवले तर ते नासण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर ७ ते ८ तासांनी ते दूध उकळून घ्या. त्यात थोडी बदाम पावडर, वेलची पूड टाकली तरी चालेल. हे दूध गरमगरम पिऊन घ्या. 

 

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यहेल्थ टिप्सआरोग्यअन्न