Join us   

पिरिड्समध्ये पॅड्स लावूनही कपड्यांवर डाग पडण्याचं टेंशन येतं? १ ट्रिक, रिलॅक्स व्हा, डाग पडणारच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 5:31 PM

How to use Sanitary Napkins : पिरिएड्समध्ये बऱ्याच महिला डिस्पोजेबल पॅड्सचा वापर करता. जे अगदी सुरक्षित आहे. पण अनेकदा पॅड्स लावूनही  ब्लड कपड्यांना लागत जे अजिबात चांगला दिसत नाही.

मासिक पाळीच्या  २ ते ३ दिवसात मेंस्ट्रअल हायजीनची काळजी घेणं गरजेचं असतं. परिएड्सदरम्यान व्यवस्थित स्वच्छता केली नाही तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणं फार महत्वाचे असते. (How to use Sanitary Napkins)

पिरिएड्समध्ये बऱ्याच महिला डिस्पोजेबल पॅड्सचा वापर करता. जे अगदी सुरक्षित आहे. पण अनेकदा पॅड्स लावूनही  ब्लड कपड्यांना लागत जे अजिबात चांगला दिसत नाही. अशावेळी पॅड्स लावण्याच्या परफेक्ट ट्रिक्स माहिती असतील  हे टाळता येऊ शकतं. (Everything You Need To Know About Using Sanitary Napkins)

होमपॅड कसे बनवायचे

होममेड क्लॉथ पॅड बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ कापड घेऊन ते पॅडच्या आकारात कापून घ्या. आता या पॅडच्या आकारात स्टॅन्सिल कट सुती कापडाच्या वर ठेवा. आता कापडावर पॅडचा आकार काढा, त्याच्या काठाला खडूने बॉर्डर तयार करा. पॅड नेहमी सुती कापडाचा असावा याची विशेष काळजी घ्या. त्यातून हवा जाते. तर सिंथेटिक कपड्यांना जास्त घाम येतो. आता टॉवेल त्याच आकारात कापून घ्या जेणेकरून पॅडचे फिलिंग तयार करता येईल.

पडचा वरचा आणि खालचा थर बनवण्यासाठी सुती कापडापासून कटआउट्स बनवा. कापडाचे असे 3 ते 4 थर कापा जेणेकरून पॅड थोडा जाड असेल आणि ते रक्त चांगले शोषू शकेल. आता पॅडच्या आकारात कापलेल्या टॉवेलचे तुकडे एकाच्या वरती एक स्टिच करा. यामुळे पॅडचा आतील भाग तयार होईल. कापसाचा थर टॉवेलच्या थराच्या वरच्या आणि खालच्या बाजूस ठेवून शिलाई करा. 

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यहेल्थ टिप्सआरोग्य