Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > पाळीत पोटात दुखतं, खूप रक्तस्त्राव होतो? ही समस्या नॉर्मल आहे का, डॉक्टरांनी सांगितले महत्वाचे कारण..

पाळीत पोटात दुखतं, खूप रक्तस्त्राव होतो? ही समस्या नॉर्मल आहे का, डॉक्टरांनी सांगितले महत्वाचे कारण..

Is Period Pain Normal: Period Pain Causes: Menstrual Cramps: Dysmenorrhea: Endometriosis and Period Pain: Natural Remedies for Period Pain: When to See a Doctor for Period Pain: Cramps During Menstruation: पाळीत पोटात दुखणं, अति रक्तस्त्राव होणं ही सामान्य गोष्ट नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2025 10:42 IST2025-02-27T10:41:45+5:302025-02-27T10:42:38+5:30

Is Period Pain Normal: Period Pain Causes: Menstrual Cramps: Dysmenorrhea: Endometriosis and Period Pain: Natural Remedies for Period Pain: When to See a Doctor for Period Pain: Cramps During Menstruation: पाळीत पोटात दुखणं, अति रक्तस्त्राव होणं ही सामान्य गोष्ट नाही.

Is Period Pain Normal women health issue Endometriosis kidney functional problem menstrual cycle | पाळीत पोटात दुखतं, खूप रक्तस्त्राव होतो? ही समस्या नॉर्मल आहे का, डॉक्टरांनी सांगितले महत्वाचे कारण..

पाळीत पोटात दुखतं, खूप रक्तस्त्राव होतो? ही समस्या नॉर्मल आहे का, डॉक्टरांनी सांगितले महत्वाचे कारण..

मासिक पाळीच्या काळात पोटात दुखणे, पोट टम्म फुगणे, ओटीपोटीत कळा येणे, कमी रक्तस्त्राव होणं यांसारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं. (Is Period Pain Normal) अनेकदा ओटीपोटीत दुखणं ही समस्या पाळी येण्याच्या काही दिवसांपासूनच सुरु होते.(When to See a Doctor for Period Pain) हे दुखणं अक्षरश: महिलांना हैराण करुन सोडतात. अशा बऱ्याच त्रासामधून जावं लागतं. मासिक पाळीचे चक्र हे २८ दिवसांचे असते. जर ती महिन्याला महिना वेळेवर येतं असेल तर महिलांचे आरोग्य सुदृढ मानले जाते. (Endometriosis and Period Pain)
याउलट मासिक पाळी वेळेवर न येणे, कमी रक्तस्त्राव होणे यांसारख्या समस्या होत असतील तर आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरु होतात. पाळी येण्यापूर्वी आपल्या पोटात प्रचंड वेदना सुरु होतात.(Cramps During Menstruation) आई-आज्जी किंवा आजूबाजूला ऐकल्याप्रमाणे हे दुखणं साहाजिकच आहे असं म्हटलं जातं. परंतु, पाळीत पोटात दुखणं, अति रक्तस्त्राव होणं ही सामान्य गोष्ट नाही. याबाबतची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

पाळीत असह्य पोट दुखतं, रक्तस्त्राव कमी होतो? वजन कमी करण्याचं फॅड पडेल महागात! पाहा परिणाम...

डॉक्टर म्हणतात की, मासिक पाळीत पोटात दुखणं ही सामान्य गोष्ट नाही. याविषयी अनेकदा महिलांच्या मनात लहानपणापासून रुजवलं जातं की, मासिक पाळीतील दुखणं ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, याविषयी अनेक स्त्रियांना पुरेशा प्रमाणात माहिती नाही. या काळात महिलांच्या पोटात दुखू लागलं की, त्या अनेक औषधे घेतात. पण अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेच आहे. डॉक्टर म्हणतात की, पोटात दुखणं म्हणजे काय? तर महिलांना त्या वेदना सहनच न होणं, नीट चालता न येणं, उठता-बसता न येणं किंवा आज माझ्याकडून काम होतंच नाहीये, असं वाटणं. शाळा-कॉलेज किंवा ऑफिसला सुट्टी घेणं. महिलांना त्रास होतं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. 

अनेक वेळा या काळात महिला किंवा मुली चार-पाच दिवस शाळेत, कॉलेजला जात नाही. अशावेळी डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी. याबाबत डॉक्टर आपल्याला काही तपासणी सांगितील. ज्यावरुन महिलांच आरोग्य सुदृढ आहे का हे समजणं सोप होतं. या वेदनेकडे दुर्लक्ष केल्यास महिलांना आई होण्याच्या प्रक्रियेत अडथळ्यांच्या सामना करावा लागू शकतो. एंडोमेट्रिओसिस या आजाराविषयी अनेक महिलावर्गांना माहित नाही. सगळ्याच मुलींना पोटदुखीच्या समस्या होतील असं नाही. हे आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते. 

">

सध्याची बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आरोग्यावर परिणाम होतो. पीसीओडी, पीसीओएस सारख्या समस्या देखील अनेक महिलांना माहित नाही. डॉक्टर म्हणतात की, मासिक पाळीच्या काळात वेदना होणं ही पोटदुखीच असेल असं नाही. याचे कारण महिलांच्या किडनीवर सूज येणं किंवा त्यासंबंधीत इतर आजार असणं ही देखील आहे. डाव्या बाजूच्या युरेटिअला सूज येणं. किडनीपासून ते लघवीच्या जागेपर्यंत पोहचणारी नळी त्याला सूज येणं. अशावेळी काही तपासण्या केल्यानंतर समजते की, किडनी किती योग्य प्रकारे फंक्शन करु शकते. त्यासाठी सामान्य वाटणारं पाळीतील पोटात दुखण्याकडे महिलांनी दुर्लक्ष करु नका, योग्यवेळी डॉक्टरांकडे जा.  

Web Title: Is Period Pain Normal women health issue Endometriosis kidney functional problem menstrual cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.