मासिक पाळी (Periods) येणार म्हटली की आपल्याला टेन्शन येते. कारण कंबर दुखणे, पायात क्रँम्प येणे, पोटात कळा येणे हे पाळीच्या आधी आणि दरम्यान ओघानेच आले. अनेकदा पाळीच्या आधी, पाळीच्या दरम्यान डोकेदुखी, मळमळ यांसारख्या तक्रारीही उद्भवतात. या सगळ्यामुळे आपण पार थकून जातो. या काळात शरीराला आरामाची आवश्यकता असते. इतकेच नाही तर या काळात रक्तस्राव होत असल्याने शरीराचे योग्य पद्धतीने पोषण होणेही आवश्यक आहे. उत्तम आहाराच्या माध्यमातून हे पोषण होते. केवळ पाळीदरम्यानच नाही तर पाळीच्या आधी आणि नंतरही शरीराचे पोषण होण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ मिनाक्षी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे.
शरीरात दर महिन्याला होणारे बदल सामान्य असले तरी ते वेदनारहित होतील यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करु शकतो. पाळीमुले शरीरातील फोलिकल स्टीम्यूलेटींग हार्मोन्स कमी होण्याचा त्रास होतो. असे झाल्यामुळे पोटात कळा येणे, मळमळणे, डोके दुखणे, खूप थकवा जाणवणे अशा समस्या निर्माण होतात. तसेच पाळीच्या काळात बऱ्याचदा आपले मूड स्विंगही होतात. अशावेळी काही गोष्टींचा आहारात समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूयात पाळीच्या आधी, दरम्यान आणि नंतर कोणते पदार्थ असायला हवेत याविषयी...
पाळी येण्याआधी
काय खायला हवे
१. डार्क चॉकलेट
२. फायबर असलेले अन्नघटक
३. प्रथिने
४. फॅटी अॅसिड
५. भरपूर पाणी पिणे
काय टाळायला हवे
१. जास्त मीठ असलेले पदार्थ
२. अति खाणे
३. मसालेदार पदार्थ
पाळीच्या काळात
काय खायला हवे
१. लोह आणि मॅग्नेशियम जास्त असलेले पदार्थ
२. सगळ्या प्रकारची धान्ये
३. डार्क चॉकलेट
४. दही
५. आलं
६. पाणी
पाळीनंतर
या काळात अंडे तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि १२ ते १४ दिवसांपर्यंत अंडे तयार होते. या काळात शरीराचे उत्तम पोषण होणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे या काळात अतिशय चांगला आहार घेणे गरेजेचे आहे.
काय खायला हवे
१. बी व्हिटॅमिन
२. प्रथिने
३. कॅल्शियम
४. लोह असलेले पदार्थ
५. दुग्धजन्य पदार्थ