Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीत कमी रक्तस्त्राव होतो, हा आजार आहे का? ५ गोष्टी खा - तब्येत सुधारेल आणि..

मासिक पाळीत कमी रक्तस्त्राव होतो, हा आजार आहे का? ५ गोष्टी खा - तब्येत सुधारेल आणि..

Less Bleeding During Periods: Why It Happens; eat 5 things : त्या चार दिवसात कमी रक्तस्त्राव होतो किंवा कमी दिवस होती, असे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 03:31 PM2024-07-30T15:31:54+5:302024-07-30T15:33:45+5:30

Less Bleeding During Periods: Why It Happens; eat 5 things : त्या चार दिवसात कमी रक्तस्त्राव होतो किंवा कमी दिवस होती, असे का?

Less Bleeding During Periods: Why It Happens; eat 5 things | मासिक पाळीत कमी रक्तस्त्राव होतो, हा आजार आहे का? ५ गोष्टी खा - तब्येत सुधारेल आणि..

मासिक पाळीत कमी रक्तस्त्राव होतो, हा आजार आहे का? ५ गोष्टी खा - तब्येत सुधारेल आणि..

महिलांसाठी ते ४ दिवस अत्यंत महत्वाचे असतात (Menstrual Cycle). साधारपणपणे २८ ते ३० दिवसांनी महिलांची मासिक पाळी येते. ४ ते ७ दिवस रक्तस्त्राव हा नॉर्मल होतो (Healthy food). पण काहींना नियमित मासिक पाळी येत नाही. हार्मोनल बदल, वाढतं वजन, खाण्यापिण्यात बदल, योग्य आहार न घेणे, यामुळे पाळी वेळेवर येत नाही (Health care).

तर काहींना पाळी आल्यावर कमी किंवा फक्त २ दिवस रक्तस्त्राव होतो. अशा परिस्थितीत वेळीच ही समस्या सोडवणं गरजेचं आहे. अन्यथा ही समस्या आणखीन वाढू शकते. जर ही समस्या वाढू नये असे वाटत असेल तर, त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यासह काही घरगुती उपाय आपण करून पाहू शकता(Less Bleeding During Periods: Why It Happens; eat 5 things).

आलं

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, 'मासिक पाळीदरम्यान कमी रक्तस्रावाची समस्या आल्याचे सेवन केल्याने दूर होऊ शकते. आपण गुळासोबत आलं किंवा आल्याचा चहा तयार करून पिऊ शकता. यातील गुणधर्म मासिक पाळीची अनियमितता, अस्वस्थता, वेदना यापासून आराम मिळू शकेल.

तल्लख बुद्धी - उत्तम स्मरणशक्तीसाठी खा ४ पदार्थ; साठीतही राहील सगळं लक्षात; ब्रेन बनेल संगणक

पपई

मासिक पाळीच्या वेळी कमी रक्तस्रावाची समस्या दूर करण्यासाठी पपई खूप उपयुक्त ठरू शकते. पपईमध्ये कॅरोटीन असते जे इस्ट्रोजेन हार्मोन उत्तेजित करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आपण कच्चे किंवा पिकलेली पपई खाऊ शकता.

हळद

मासिक पाळीतील वेदना आणि रक्तस्त्रावाची समस्या दूर करण्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकता. यात दाहक-विरोधी आणि अँटी-स्पास्मोडिक गुणधर्म असतात. यामुळे मासिक पाळीच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. यासाठी कोमट पाण्यात हळद घालून प्या. किंवा कोमट दुधात हळद आणि मध मिसळून प्या.

बडीशेप

बडीशेप फक्त मुखवास म्हणून नसून, मासिक पाळीतील समस्या दूर करण्यासही मदत करू शकते. यात अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात. जे वेदनादायक मासिक पाळी आणि कमी रक्तस्त्रावाची समस्या दूर करण्यासही मदत करते.

मासिक पाळी सतत अनियमित? ४ प्रकारची फळं नेहमी खा, मासिक पाळी नियमित यायला हवी तर..

मेथी दाणे

मेथी दाण्यांमुळे मासिक पाळीदरम्यान कमी रक्तस्रावाची समस्या दूर होऊ शकते. मेथीच्या दाण्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यास मदत करते. यासाठी पाण्यात मेथी दाणे उकळवत ठेवा, नंतर मेथी दाण्यांचा चहा तयार करून प्या. यामुळे नक्कीच फायदा होईल.

Web Title: Less Bleeding During Periods: Why It Happens; eat 5 things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.