Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीत पायात गोळे, खूप पोट दुखतं? ५ पदार्थ खाणं टाळा, पाळीचा त्रास कमी

मासिक पाळीत पायात गोळे, खूप पोट दुखतं? ५ पदार्थ खाणं टाळा, पाळीचा त्रास कमी

Avoid These Food During Periods: मासिक पाळीच्या दिवसांत आहाराचे काही नियम पाळले, काही पदार्थ खाणे टाळले तर नक्कीच पाळीचा त्रास कमी करता येतो, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 04:16 PM2022-07-02T16:16:49+5:302022-07-02T16:18:18+5:30

Avoid These Food During Periods: मासिक पाळीच्या दिवसांत आहाराचे काही नियम पाळले, काही पदार्थ खाणे टाळले तर नक्कीच पाळीचा त्रास कमी करता येतो, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

Menstrual cramps, a lot of stomach pain? Avoid 5 food items to reduce menstrual cramps | मासिक पाळीत पायात गोळे, खूप पोट दुखतं? ५ पदार्थ खाणं टाळा, पाळीचा त्रास कमी

मासिक पाळीत पायात गोळे, खूप पोट दुखतं? ५ पदार्थ खाणं टाळा, पाळीचा त्रास कमी

Highlightsवेगवेगळे त्रास कमी करायचे असतील तर पाळीच्या दिवसांत आहाराची काही पथ्ये पाळा असं आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी सांगत आहेत.

मासिक पाळी (menstruation) ही अनेकींसाठी मोठी त्रासदायक असते. कुणाला या दिवसांत खूपच ब्लिडिंग होतं, तर कुणाचं खूप जास्त पोट दुखतं (menstrual cramps). पोट दुखण्याचं प्रमाण तर काही जणींमध्ये इतकं जास्त असतं की त्यामुळे त्यांना एखाद्या दिवसाची सुटीच घ्यावी लागते. पाळी येण्याच्या काही दिवस आधी आणि पाळीदरम्यान अनेकींच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येतात. तर कुणाला ब्लोटींगचा (bloating during periods) त्रास होतो. म्हणजेच पाळीच्या दिवसांत काही जणींना शरीरावर सुज आल्यासारखी वाटते, पोट जड झाल्यासारखं, फुगल्यासारखं वाटतं. (avoid these mistakes during menstruation) असे वेगवेगळे त्रास कमी करायचे असतील तर पाळीच्या दिवसांत आहाराची काही पथ्ये पाळा असं आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी (Manjiri Kulkarni) सांगत आहेत. (Food items that should not eat during menstruation)

 

मासिक पाळीमध्ये होणारे वेगवेगळे त्रास कमी करण्यासाठी....
१. पोटदुखी

मासिक पाळीमध्ये अनेक जणींचं पोट खूप दुखतं. यामागचं कारण म्हणजे आपल्या शरीरातील प्रोस्टाग्लॅण्डिन हा घटक वाढलेला असतो. त्यामुळे पाळीच्या आधी दोन- तीन दिवस आणि पाळीचे ४ दिवस प्रोस्टाग्लॅण्डिन असणारे अन्नपदार्थ खाणं टाळलं पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने रेड मीट आणि इतर मांसाहारी पदार्थांचा सहभाग आहे. खूप मसालेदार पदार्थ, बेक्ड फूड खाणंही यादिवसांत टाळावं. संत्री, मोसंबी, लिंबू यासारखे आंबट फळे खाणे टाळावे. या फळांचे सेवन केल्याने मासिक पाळीचा त्रास वाढू शकतो.

 

२. ब्लोटिंग
अंगावर सूज येणं, अंग जड वाटणं किंवा सुजल्यासारखं वाटणं, पोट मोठं वाटणं असा त्रास पाळीच्या दिवसांत अनेकींना होतो. यालाच ब्लोटिंग असं म्हणतात. ही समस्या होण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे वॉटर रिटेन्शन. याचाच अर्थ असा की शरीरात पाणी साचून राहिल्यामुळे हा सगळा त्रास हाेतो. हा त्रास कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे पाळीचे २ दिवस आधी, पाळीचे ४ दिवस आणि त्यानंतरचे २ दिवस आहारातील मिठाचे प्रमाण एकदम कमी करून टाकावे. यामुळे वाॅटर रिटेन्शनचा त्रास होत नाही आणि शरीर सुजत नाही.

 

३. पायात येणारे गोळे
हा त्रास देखील खूप जणींना होतो. पाळी येण्याच्या आठवडाभर आधीपासून काही  जणींच्या पायात रात्री गोळे येतात. पाळीच्या  २ दिवसांत तर हा त्रास खूपच वाढलेला असतो. हा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन ई सप्लिमेंट सुरू कराव्या. दही, आईस्क्रीम, रायता किंवा ताक यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. असे केल्याने तुमच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

 

४. मुडस्विंग
पाळीच्या दिवसांत किंवा पाळी जवळ आली की अनेक जणींच्या वागणुकीत बदल झालेला जाणवतो. चिडचिडेपणा खूप जास्त वाढतो. स्वत:वर किंवा समोरच्या व्यक्तीवर उगाच रागराग केला जातो. असे मुडस्विंगचे त्रास कमी करण्यासाठी या पाळीच्या आधी आणि पाळीदरम्यान मेंदूला उत्तेजित करणारे पदार्थ घेणं टाळलं पाहिजे. यासाठी कॉफी घेण्याचं प्रमाण अगदी कमी करा. मुडस्विंगचा त्रास होणार नाही.  पीरियड्सच्या काळात महिलांना गोड खाण्याची क्रेविंग होते. तुमच्यासोबतही असेच होत असेल तर मिठाई किंवा पेस्ट्रीऐवजी सफरचंद, डाळिंब यासारखे फळे खा. असे केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. याशिवाय मूड स्विंग आणि चिडचिडेपणा कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटही घेता येते.


 

Web Title: Menstrual cramps, a lot of stomach pain? Avoid 5 food items to reduce menstrual cramps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.