प्रत्येक आईसाठी मुलगी मोठी करणं आणि तिला समाज आणि कुटुंबातील नियम शिकवणे हे खूप जबाबदारीचं काम असतं. मुलगी मोठी झाल्यावर तिची मासिक पाळी येण्याचीही तयारी असते. ऐनवेळी मुलीचा गोंधळ होऊ नये म्हणून मुलीच्या पहिल्या मासिक पाळीसाठी आईने तिला तयार केले पाहिजे. जर तुमची मुलगी देखील तारुण्याच्या वयात आली असेल आणि अद्याप तिची पाळी सुरू झाली नसेल तर अनेक मातांना टेंशन येतं किंवा आपल्या बरोबरच्या मुलींना पाळी आली आपल्याला अजून आलेली नाही असं वाटून मुली विचारात असतात. अशावेळी नेमकं काय करायचं, कोणाशी बोलायचं? आपली समस्या कोणाला सांगायची हे कळत नाही. याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.
काय सांगतात तज्ज्ञ
बेंगळुरूच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील ज्येष्ठ प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात की, ''मुलीच्या पहिल्या पाळीला मेनार्चे म्हणतात. मेनर्चेचे अचूक वय नाही परंतु पूर्वी १४ ते १६ वर्षे वयात पाळी यायची. आता मुलींना केवळ १२ ते १३ वर्षांच्या वयातच पाळी येते. त्याचबरोबर काही मुलींमध्ये कमी वयातच त्यांची पाळी येते. लवकर पाळी येण्याचे कारण सामाजिक, भावनिक आणि आरोग्याच्या घटकांवर अवलंबून असते.
यशोदा हॉस्पिटल, हैदराबाद येथील सल्लागार प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉ. शारदा एम म्हणतात की .''आता मेनार्चे चे वय कमी झाले आहे. जर एखाद्या मुलीने वयाच्या 14 व्या वर्षापासून पिरिएड्स सुरू झाले नाहीतर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही चाचण्या केल्या पाहिजेत. जर एखाद्या मुलाला वयाच्या 8 व्या वर्षाआधीच पाळी सुरू झाली तरीही त्वरित डॉक्टरांशी बोलायला हवं.''
पाळी वेळेवर का येत नाही?
मुलीच्या पहिल्या पाळीच्या वयावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. आईच्या मेनार्चेच्या वयाचा मुलीच्या पाळी येण्याच्या वयाशी संबंध असतो. ओव्हर वेट मुलींना पाळी येण्यास उशीर होऊ शकतो तर अंडर वेट असलेल्या मुलींची पाळी लवकर सुरू होऊ शकते. ज्या मुली व्यवस्थित व्यायाम करतात, फिजिकली एक्टिव्ह असतात. जंक फूड कमी प्रमाणात खातात त्यांची पाळी वेळेवर येऊ शकते. या ऊलट व्यायाम करत नसलेल्यांमध्ये पाळी वेळेवर येत नाही. प्रोटीन्स, फायब्रस आणि पोषक आहार घेतल्यासही पाळी वेळेवर सुरू होते.
पालकांनी काय करायला हवं?
जर तुमच्या मुलीची पाळी वेळेवर सुरू झाली नसेल तर तुम्ही गायनेकोलोजिस्टशी बोलायला हवं. कारण मासिक पाळीनंतर मुलीला आपल्या शरीरात होत असलेल्या मोठ्या बदलांसाठी तयार राहावं लागत असतं. भारतातील सुमारे 71% मुलींना त्यांच्या पहिल्या पाळीच्यावेळेबद्दल माहिती नसते. यामुळे, जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा मुलींना मानसिक ताणतणावातून जावे लागते. म्हणूनच, पीरियड्स सुरू होण्याच्या वयात आईने आपल्या मुलीला याबद्दल माहिती दिली पाहिजे.
मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. यावेळी वैयक्तीक स्वच्छतेची काळजी न घेतल्यास संसर्ग होऊ शकतो. म्हणून मुलीला आधीच सर्व गोष्टींबाबत कल्पना द्यायला हवी. तुमच्या मुलीनं न घाबरता या नवीन बदलांचा सामना करावा असं वाटत असेल तर नेहमीच योग्य मार्गदर्शन देणं हे तुमचं पहिलं काम आहे.