नियमित मासिक पाळी येणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. मासिक पाळी शरीरातील अनेक गोष्टींचे सूचक आहे, हार्मोनल संतुलन आणि असंतुलन ते मानसिक आरोग्यासाठी मासिक पाळी वेळेवर येणं गरजेचं असतं. पण खाण्यापिण्यातील अनियमितता, हार्मोन्सचं संतुलन बिघडणं या कारणांमुळे अनेक स्त्रियांना पाळी वेळेवर येत नाही.
भारतात स्त्रिया या वेदना आणि समस्या शांतपणे सहन करतात. अनियमित मासिक पाळी असलेल्या स्त्रिया बऱ्याचदा याला काही रोगाचे लक्षण म्हणूनही बघत नाहीत आणि त्यांना वाटते की ते सामान्य आहे. सत्य हे आहे की अनियमित पाळी हे पीसीओएसचे निदान करण्यात मदत करणारी प्रमुख लक्षणे आहेत. चेहऱ्यावरील पुरळ आणि जास्तीचे केस दिसल्यास स्त्रियांनी सावध व्हायला हवं.
फोर्टिस ला फेमे हॉस्पिटल, रिचमंड रोड, बेंगलोर येथील संचालक आणि हृदयरोग तज्ञ डॉ. राजपाल सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, पीसीओएस हा चयापचय सिंड्रोमचा एक भाग आहे ज्यामध्ये इंसुलिन प्रतिकार आणि पुरुष एन्ड्रोजन हार्मोनची पातळी जास्त असते.
यामुळे अनियमित पाळी, वजन वाढणे, असामान्य लिपिड प्रोफाईल आणि डायबिटीस होतो. गतिहीन जीवनशैली, नैराश्याची सुरुवात आणि उच्च रक्तदाब यांच्याशी देखील संबंध आहे. भारतात, बाळंतपणाच्या वयोगटातील जवळजवळ 25-30 टक्के स्त्रिया पीसीओएस किंवा (पीसीओडी) ग्रस्त आहेत; महिलांमधील वंध्यत्वाचे हे एक सामान्य कारण आहे, ”असंही त्यांनी सांगितले.
कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत असू शकतात त्वचेतील हे बदल; गंभीर आजार वाढण्याआधीच सावध व्हा
डॉक्टरांच्या मते, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी दृष्टिकोनातून, चयापचयाचे संतुलन बिघडणं हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोकचा धोका जवळजवळ दुप्पट करते. म्हणूनच, पीसीओएसच्या लक्षणांवर लवकर लक्ष देणे महत्वाचे आहे. जीवनशैलीत बदल हा व्यवस्थापनाचा पाया आहे. वजन कमी झाल्यास किंवा वाढल्यास नियमित शारीरिक व्यायाम, धूम्रपान बंद करणे आणि पीसीओएसमध्ये विशेष स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
या आजाराच्या उपचारात मेटाफॉर्मिन, एसीई/एआरबी इनहिबिटर, एस्पिरिन आणि स्टेटिन यासारख्या औषधांचा वापर केला जातो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कार्डियाक किंवा न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसल्यास अनुभवी इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टशी संपर्क साधावा,"