Join us   

Menstrual Hygiene Day: मासिक पाळीतल्या स्वच्छतेबाबत ८० टक्के महिला अजूनही निष्काळजीच, अस्वच्छतेनं वाढणारे आजार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 4:08 PM

Menstrual Hygiene: मासिक पाळीत शरीराची स्वच्छता कशी करायची, याबाबत अजूनही अनेक जणींना व्यवस्थित माहितीच नाही.. शहरी मुलीही याला अपवाद नाहीत.. म्हणूनच तर २८ मे रोजी जगभर साजरा केला जातो Menstrual Hygiene Day..

ठळक मुद्दे ५ दिवसांची पाळी आणि तिचे मासिक चक्र २८ दिवसांचे. यामुळेच २८ मे म्हणजेच २८- ५ हा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून पाळला जाऊ लागला. 

युनिसेफच्या आकडेवारीनुसार जगभरात १.८ बिलियन महिलांना मासिक पाळी येते. हा आकडा प्रचंड मोठा असून जगाच्या एकूण लोकसंख्येच्या २६ टक्के आहे.. असं असतानाही मासिक पाळी म्हणजे अजूनही चारचौघात न बोलण्याचा किंवा गुपचूप एकमेकींच्या कानात सांगण्याचा विषय आहे. 'माझे पिरेड्स (periods) आले आहेत', ही गोष्ट अजूनही बायका चौरचौघांत सांगू शकत नाहीत.. हा विषय अजूनही इतका अबोल असल्याने आणि योग्य माहिती मिळत नसल्याने Menstrual Hygiene च्या बाबतीत अनेक जणींकडून चुका होतात आणि त्यामुळेच त्यांना भविष्यात अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो..

 

मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने बोलता यावं. त्या ४ दिवसांत प्रत्येकीकडूनच योग्य स्वच्छता राखली जावी आणि त्याद्वारे होणाऱ्या आजारांचा धोका टळला जावा, यासाठी जर्मनीच्या WASH युनायटेड या संस्थेतर्फे २०१३ पासून Menstrual Hygiene Day पाळला जातो. ५ दिवसांची पाळी आणि तिचे मासिक चक्र २८ दिवसांचे. यामुळेच २८ मे म्हणजेच २८- ५ हा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून पाळला जाऊ लागला. 

 

काय आहे यावर्षीची थीम? Theme of Menstrual Hygiene Day 2022 कोणता तरी उद्देश घेऊन दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. त्यानुसार यावर्षीची थीम आहे की 2030 पर्यंत मासिक पाळी हा जीवनातला एक नॉर्मल भाग व्हावा. आजही पुरेशा सोयी- सुविधा नसल्याने अनेक मुली मासिक पाळी आली की शाळा- कॉलेज बुडवून घरी बसतात. यामुळे त्यांच्या शिक्षणावर, करिअरवर परिणाम होतो. त्यामुळेच 2030 पर्यंत सर्वत्र अशी परिस्थिती निर्माण व्हावी की मासिक पाळी या एका कारणासाठी कोणतीही मुलगी मागे राहू नये... पाळी आली म्हणून आत्मविश्वास गेला, असं कुणाच्या बाबतीत होऊ नये आणि सध्या मासिक पाळीबद्दल जो टॅबू आहे, तसा न राहता मुलींना त्यांच्या मासिक पाळीची लाज वाटू नये, अशा समाजाची निर्मिती करणे, ही या वर्षीची संकल्पना आहे.

 

मासिक पाळीतली स्वच्छता  - पाळीच्या दिवसांत योग्य स्वच्छता राखली गेली नाही तर प्रजनन संस्थेला तसेच युरीन ट्रॅकला संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त असतो. - युनिसेफच्या आकडेवारीनुसार विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये केवळ २७ लोकांकडे या काळातील स्वच्छतेसाठी घरी साबण आणि पाणी उपलब्ध आहे. - सॅनिटरी नॅपकीन वापरणाऱ्या महिलांमध्ये मागील काही वर्षांच्या तुलनेत वाढ झालेली असली तरी भारतात मासिक पाळीतल्या अस्वच्छतेमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारात ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे भारतात अजूनही ८० टक्के महिला नॅपकीनऐवजी जुने कपडे, पालापाचोळा, कागद, लाकडाचा भुसा अशा गोष्टींचा वापर करतात. 

 

टॅग्स : आरोग्यमासिक पाळीचा दिवसमासिक पाळी आणि आरोग्यमहिला