पाळीचं चक्र बिघडल्यास, पाळी अनियमित झाल्यास डाॅक्टरांकडे जाणं जेवढं गरजेचं तितकंच आपल्या सवयींकडे लक्ष पुरवून त्या जर चुकीच्या असतील तर दुरुस्त करणं आवश्यक आहे. मासिक पाळीचं चक्र सुरळीत असेल तर त्याचा चांगला परिणाम आरोग्यावरही होतो. पण मासिक पाळीचं चक्र बिघडलं तर मात्र अनेक आरोग्यविषयक समस्या आणि अस्वस्थता यांचा सामना महिलांना करावा लागतो. मासिक पाळीचं चक्र बिघडणं-आरोग्य समस्या निर्माण होणं आणि आरोग्य समस्या निर्माण झाल्यानं पाळीचं चक्र बिघडणं असा परस्परसंबंध आढळतो. असाच एक संबंध अभ्यासकांना चुकीच्या सवयी आणि बिघडलेलं मासिक पाळीचं चक्र यात आढळून आलं आहे. आरोग्यास असलेला धोका टाळण्यासाठी आपल्या सवयी सुधारुन पाळीचं चक्र सुरळीत करणं हा उत्तम उपाय असल्याचं अभ्यासक सांगतात. पाळीचं चक्र बिघडल्यास, पाळी अनियमित झाल्यास डाॅक्टरांकडे जाणं जेवढं गरजेचं तितकंच आपल्या सवयींकडे लक्ष पुरवून त्या जर चुकीच्या असतील तर दुरुस्त करणं आवश्यक आहे.
Image: Google
पाळी आणि सवयी
1. प्रमाणापेक्षा अती झोपणं यामुळे शरीरातील हार्मोन्स वर परिणाम् होवून पाळीचं चक्र बिघडतं. याबाबत अमेरिकन माॅडेल राचेल फिंच हिचा अनुभव पुरेसा बोलका आहे. ती म्हणते की करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला 12 तास झोपण्याची सवय लागली होती. ही सवय चुकीची असल्यानं त्याचा प्रभाव तिच्या जीवनशैली आणि आरोग्यावर पडला. त्याच परिणामांचा एक भाग म्हणजे तिची पाळी नेहमीपेक्षा खूप उशिरानं येवू लागली. डाॅक्टरांनी तिला पाळीचं चक्र सुरळीत करण्यासाठी झोपेच्या वेळेपत्रकात आरोग्यदायी बदल करण्यास सांगितले.
2. वजनात जर खूप बदल झाला तर त्याचा थेट परिणाम पाळीवर होतो असं तज्ज्ञ म्हणतात. वजन एकदम कमी होणं किंवा वजन एकदम वाढणं याचा दुष्परिणाम पाळीच्या चक्रावर होतो. खूप व्यायाम केल्यानं वजन कमी होत असल्यास किंवा खाणं पिणं आणि व्यायाम याकडे पूर्ण दुर्लक्ष होवून वजन वाढत असल्यास त्याचा परिणाम पाळीच्या नियमिततेवर होवून पाळी अनियमित होतो.
3. सुदृढ आरोग्यासाठी डाएट जसा महत्वाचा असतो तसाच योग्य डाएटचा परिणाम पाळीच्या चक्रावरही होत असतो. डाएट जर योग्य नसेल तर त्याचे दुष्परिणाम आरोग्यास भोगावे लागतात. संतुलित आहाराची कास सोडून जंक त्याचा थेट परिणाम पाळीच्या नियमिततेवर होतो. पाळी अनियमित होण्यास खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी कारणीभूत ठरतात.
Image: Google
4. गर्भधारणा टाळण्यासाठी अनेकजणी स्वत:च्या मर्जीनं गर्भनिरोधक गोळ्या घेत राहातात. गर्भ निरोधक गोळ्यांमुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. त्याचाच परिणाम हा पाळीच्या चक्रावर होवून पाळी अनियमित होते.
5. मानसिक तणावामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. दैनंदिन जीवनात ताणतणावाचं प्रमाण जास्त असल्यास पाळीचं चक्र बिघडतं. पाळीचं चक्र सुरळीत राहावं यासाठी ताण घेण्याचा स्वभाव बदलणं, ताणाचं व्यवस्थापन करता येणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.