Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > नेहा भसीनला जगणं मुश्किल करणारा PMDD आजार नेमका आहे काय? मासिक पाळीचं भयंकर दुखणं...

नेहा भसीनला जगणं मुश्किल करणारा PMDD आजार नेमका आहे काय? मासिक पाळीचं भयंकर दुखणं...

Neha Bhasin Suffering From PMDD, Causes, Symptoms : Neha Bhasin Shares Her Struggle With Premenstrual Dysphoric Disorder: Everything You Need To Know : Singer Neha Bhasin Reveals Her Struggle With PMDD: Know All About Symptoms, Causes, And Remedies : PMDD म्हणजे काय? हा त्रास होत असेल तर काय कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 06:28 PM2024-11-27T18:28:45+5:302024-11-27T18:51:50+5:30

Neha Bhasin Suffering From PMDD, Causes, Symptoms : Neha Bhasin Shares Her Struggle With Premenstrual Dysphoric Disorder: Everything You Need To Know : Singer Neha Bhasin Reveals Her Struggle With PMDD: Know All About Symptoms, Causes, And Remedies : PMDD म्हणजे काय? हा त्रास होत असेल तर काय कराल?

Neha Bhasin Shares Her Struggle With Premenstrual Dysphoric Disorder: Everything You Need To Know Neha Bhasin Suffering From PMDD, Causes, Symptoms | नेहा भसीनला जगणं मुश्किल करणारा PMDD आजार नेमका आहे काय? मासिक पाळीचं भयंकर दुखणं...

नेहा भसीनला जगणं मुश्किल करणारा PMDD आजार नेमका आहे काय? मासिक पाळीचं भयंकर दुखणं...

'स्वॅग से करेंगे सबका स्वागत', 'हीरिए', 'धुनकी', 'मेरा लौंग गवाचा' यांसारखी बॉलिवूडमधील हटके गाणी गाणारी नेहा भसीन (Singer Neha Bhasin) सध्या फारच चर्चेत आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड आणि पंजाबी गायिका नेहा भसीनने स्वत: च्या सोशल मिडिया अकाउंटवरून तिला झालेल्या आजाराविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे.  नुकतीच नेहाने  ती एका गंभीर आजाराशी झुंज देत असल्याची माहिती तिच्या सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. नेहाने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिला प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर( पीएमडीडी) या आजाराने ग्रासले असल्याचे ती सांगत आहे(Neha Bhasin Suffering From PMDD, Causes, Symptoms).

गायिका नेहाला या आजारामुळे होणारा त्रासही (Singer Neha Bhasin Reveals Her Struggle With PMDD: Know All About Symptoms, Causes, And Remedies) तिने सांगितला आहे. हा आजार तिला आता नाही तर तिच्या लहानपणापासून असल्याचंही तिने सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिच्या आजारामुळे तिचं वजन वाढत असल्याचं ती म्हणाली. त्याचप्रमाणे वाढत्या वजनावरुन तिला भरपूर प्रमाणांत ट्रोल देखील केले होते. नेहाला झालेला प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर हा आजार नेमका काय असतो, ते पाहूयात(Neha Bhasin Shares Her Struggle With Premenstrual Dysphoric Disorder: Everything You Need To Know).

१. प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर म्हणजे काय ? 

प्रीमेनस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (PMDD) हा प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) चा एक गंभीर प्रकार आहे. काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वीच्या काही दिवसांमध्ये हा त्रास जाणवतो. यामुळे मासिक पाळीच्या आधी किंवा दोन आठवड्यांपूर्वी त्या स्त्रीमध्ये शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही प्रकारचे अनेक बदल दिसून येतात. पीएमएसमुळे सूज येणे, डोकेदुखी आणि स्तन हळवे होणे यांसारखी लक्षण दिसून येतात. PMDD ची अनेक लक्षणे साधारणपणे मासिक पाळी सुरू होण्याच्या एक ते दोन आठवड्यांपूर्वी दिसतात आणि मासिक पाळी सुरू झाल्यानंतर लगेचच कमी होतात. 

मासिक पाळीत रक्ताच्या गाठी जास्त? टेंशन घेऊ नका, डॉक्टर सांगतात मासिक पाळीत असं होतं कारण...

२.  प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डरची लक्षणं कोणती आहेत ? 

१. तीव्र चिडचिडेपणा आणि राग
२. चिंता आणि पॅनिक अटॅक 
३. नैराश्य आणि आत्महत्येचे विचार येणे
४. कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे
५. तीव्र थकवा
६. फूड क्रेविंग्स आणि खाण्या - पिण्याच्या सवयींमध्ये लक्षणीय बदल
७. डोकेदुखी आणि निद्रानाश 

पाळीत पोट दुखतं-क्रॅम्स येतात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते ५ आसनं, त्रास कमी!

३.  आजाराबद्दल सांगताना नेहा आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, 

नेहा भसीने या पोस्टमध्ये लिहलंय, "मला तुमच्यासोबत खूप काही बोलायचं आहे ,पण कुठून सुरुवात करु मलाच कळत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून मला गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या २० वर्षांपूर्वीच मला या आजाराचा त्रास होत आहे. पण वैद्यकिय तपासणीनंतर या आजाराबद्दल आता ते निष्पण्ण झालं आहे. या आजाराबद्दल समजताच माझं मानसिक संतुलन बिघडलं".


शिवाय या पोस्टमध्ये तिने या आजाराच्या लक्षणांबाबतही माहिती दिली आहे. "थकवा, शारिरिक वेदना, मानसिक त्रास, ताणतणाव तसेच चिंता यांसारख्या लक्षणांमुळे मी त्रस्त आहे. यामुळे मला व्यवस्थित झोपही लागत नव्हती, काम करावसं वाटत नव्हतं. गेल्या काही वर्षापासून मी या आजाराशी ठामपणे लढा देत असल्याचंही तिने या पोस्टमध्ये लिहलंय. शिवाय या आजारातून लवकर बरी होण्यासाठी नेहा वेगवेगळ्या थेरीपी तसेच  योगासनांचा आधार घेते असंही तिने म्हटलं आहे. ताण-तणावावर नियंत्रण आणण्यासाठी मी जास्त कामही करत नाहीये. यामुळे ज्या लोकांवर प्रेम करते त्यांच्या भेटीगाठी करणं हे  सगळं मी करत होते. या सगळ्या गोष्टी आपल्याला आरामदायक वाटतात पण हाच आराम तुम्ही किती थकलेले आहात याची जाणीव करुन देतो. मी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे".


Web Title: Neha Bhasin Shares Her Struggle With Premenstrual Dysphoric Disorder: Everything You Need To Know Neha Bhasin Suffering From PMDD, Causes, Symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.