मासिक पाळीत मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात असलेल्या सॅनिटरी नॅपकिनबाबत एक रिसर्च समोर आला आहे. नवीन समोरच आलेल्या अभ्यासात दिसून आलं की व्यापक प्रमाणात सॅनिटरी पॅड्समध्ये कॅन्सर निर्माण करणारी रसायनं असतात. खासकरून भारतात चारपैकी जवळपास ३ किशोवस्थेतील मुली सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात.(New study reveals cancer infertility causing harmful chemicals found in sanitary pads in india)
डॉ अमित, पर्यावरण एनजीओ टॉक्सिक्स लिंकचे कार्यक्रम समन्वयक आणि अन्वेषक म्हणाले की, सामान्यतः उपलब्ध असलेल्या सॅनिटरी उत्पादनांमध्ये इतकी हानिकारक रसायने सापडणे धक्कादायक आहे. यामध्ये कार्सिनोजेन, प्रजननक्षम विष, अंतःस्रावी विघटन करणारे आणि ऍलर्जीन सारख्या विषारी रसायनांचा समावेश आहे.
माध्यमांच्या रिपोर्टनुसार एनजीओद्वारे करण्यात आलेल्या या अभ्यासात भारतातील जवळपास १० ब्रॅण्डचे परिक्षण करण्यात आले आणि नमूने थॅलेट आणि कार्बनिक पदार्थ असल्याचं दिसून आलं. प्रदुषित केमिकल्समध्ये कॅन्सरच्या पेशी तयार करण्याची क्षमता असते.
या प्रकरणातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे सॅनिटरी पॅड्सद्वारे हानिकारक रसायने शरीराद्वारे शोषली जाण्याची शक्यता जास्त असते. डॉ. आकांक्षा मेहरोत्रा, टॉक्सिक्स लिंकच्या कार्यक्रम समन्वयक, ज्या अभ्यासाचा भाग होत्या, त्या म्हणाल्या की, योनी शरीराच्या इतर त्वचेपेक्षा जास्त रसायने स्राव आणि शोषू शकते.
संरक्षणासाठी स्वच्छतेच्या मार्गांचा अवलंब करण्यासह भारतीय महिलांना सुरक्षित सॅनिटरी पॅड वापरण्यास सांगितले जात आहे. कार्सिनोजेन्ससह हानिकारक रसायनांचा समावेश हा महिलांना धोका पोहोचवू शकते. युरोपीय देशांमध्ये कडक नियम आहेत पण सॅनिटरी पॅडची रचना, निर्मिती आणि वापर याबाबत भारतात कठोर नियम नाहीत. अलिकडेच करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 15-24 वयोगटातील सुमारे 64 टक्के महिला सॅनिटरी पॅड वापरतात.