Join us

पपई खाल्ल्याने खरंच मासिक पाळी लवकर येते? काय खरं-काय खोटं? तज्ज्ञ सांगतात पपई कधी आणि कशी खावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2023 18:12 IST

Papaya for Periods: Can Papaya induce Early Periods : पीरियड्सची डेट पुढे गेली की, बऱ्याच महिला पपई खातात. पण यामुळे खरंच मासिक पाळी वेळेत येते का?

अनियमित मासिक पाळी (Irregular Periods) ही अनेक महिलांची समस्या आहे. अनियमित पीरियड्समुळे शरीरात इतर गंभीर आजार निर्माण होतात. काही महिलांची मासिक पाळी ही लेट येते, किंवा महिनोमहिने येत ही नाही. यावर उपाय म्हणून काही महिला तज्ज्ञांना दाखवून औषधोपचार करतात. तर काही महिला घरगुती उपाय करून पाहतात. मासिक पाळीची डेट निघून गेली की, महिलांना स्ट्रेस येतो. शिवाय वजन वाढणे, चिडचिडपणा, काही वेळेला मूड स्विंग देखील होते. मासिक पाळी वेळेत येण्यासाठी बरेच महिला पपई खातात (Papaya).

आपणही ऐकलं असेल की, पीरियड्स यायला उशीर झाला तर, पपई खाल्ल्याने लवकर येते. मात्र, हे किती खरं आहे? पपई खाल्ल्यानंतर खरंच मासिक पाळी लवकर येते का?(Women's Health) मासिक पाळी लवकर येण्यासाठी पपई कच्चा खावा की पिकलेला?(Papaya for Periods: Can Papaya induce Early Periods?).

यासंदर्भात, फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नुपूर गुप्ता सांगतात, 'मासिक पाळी लवकर येत नसेल तर, कच्चे पपई खाणं फायदेशीर ठरू शकते. आपण पिकलेली पपई देखील खाऊ शकता. यामध्ये असलेले कॅरोटीन इस्ट्रोजेन हार्मोनला उत्तेजित करते. शिवाय यातील हिटिंग गुणधर्मामुळे मासिक पाळी लवकर येते. यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए देखील असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते'.

छातीत कफ, सर्दी-खोकल्यामुळे हैराण? तज्ज्ञ सांगतात करून पाहा ४ सोपे उपाय, कफ आणि त्रास होईल कमी

पपई खाण्याचे इतर फायदे

पपईमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फोलेटसारखे गुणधर्म आढळतात. जे हृदय आणि हाडांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याशिवाय तणाव कमी करण्यासही फायदेशीर ठरते.

स्वयंपाकासाठी सूर्यफुलाचे तेल वापरणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? तज्ज्ञ सांगतात सनफ्लॉवर ऑईल वापरत असाल तर..

- पपई जास्त खाणे आरोग्यासाठी चांगले की अपायकारक हे आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने ठरवा. स्वतःवर प्रयोग करू नका. नियमित मासिक पाळी येण्यासाठी डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्या.

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यहेल्थ टिप्सआरोग्यमहिला