Join us   

पावसाळ्यात मासिक पाळीचे ४ दिवस शिक्षा वाटते, खाज-आग -इन्फेक्शन होते? डॉक्टर सांगतात उपाय..

By भाग्यश्री कांबळे | Published: July 28, 2023 7:21 PM

Female hygiene tips you must follow during monsoon season पावसाळ्यात मासिक पाळीच्या दिवसात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

भाग्यश्री कांबळे

मासिक पाळीचे चार दिवस आधीच नाजूक, त्यात पावसाळ्यात तर मासिक पाळीच्या दिवसात बरीच तारांबळ होते. आधीच सगळीकडे पावसाने चिकचिक, त्यात ओले कपडे, भिजणे, स्वच्छता गृहांची सोय नसणेे, ओलं राहिल्याने मांड्या घासल्या जाऊन होणारी आग, हे सगळं खूप छळतं. पावसाळ्यात मासिक पाळीच्या दिवसात इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. हे सारे त्रास कसे टाळायचे? फॅमिली फिजिशयन डॉक्टर गीता वडनप यासंदर्भात माहिती देतात(Female hygiene tips you must follow during monsoon season).

कशी घ्यायची काळजी?

डॉ. गीता वडनप सांगतात..

१.पावसाळ्यात मासिक पाळीच्या दिवसात ज्यांना हेवी फ्लो होतो, त्यांनी या ४ दिवसात रेग्युलर, सॅनिटरी पॅड्स, टॅम्पॉन्स, किंवा मेन्स्ट्रुअल कपचा वापर करावा.ते दिवसातून नियमित बदलणं गरजेचं. जास्त वेळ ठेवलं तर त्यामुळे खाज सुटण्याची शक्यता असते. पावसाळ्यात ईनरवेअर्स शक्यतो कॉटनच्या वापराव्या.

२. पावसाळ्यात कपडे ओले लगेच होतात, त्यामुळे घरी आल्यानंतर लगेच कपडे बदलावे, ओलेपणामुळे इन्फेक्शनचा धोका जास्त वाढतो. यासह बाहेर जाताना एक्स्ट्रा सॅनिटरी पॅड सोबत ठेवावा.'

नाकावरच्या रागाचं कारण काय? संशोधन सांगते, तिखट आणि मिरच्या खाण्याचे परिणाम, राग कमी करायचा तर..

३. पावसाळ्यात नाजूक जागी रॅशेजचा त्रास होतो, अशावेळी आपण अँटीअलर्जिक क्रिमचा वापर करू शकता. जर आपल्याला स्किनच्या निगडीत काही समस्या असतील तर स्किन स्पेशालीस्टचा सल्ला घ्यावा. यासह वेळच्या वेळी सॅनिटरी पॅड्स चेंज करणं अत्यंत गरजेचं आहे.

४. ४-५ दिवस सतत पॅड लावल्याने मांड्यांवर, किंवा आसपासच्या भागावर लाल रंगाचे पुरळ येतात. हे पुरळ टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. नाजूक जागा नेहमी स्वच्छ करायला हवी. केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर न करता कोमट पाण्याने नाजूक जागा स्वच्छ करावी.

५. जिथे खाज येत असेल त्या ठिकाणी मॉइश्चरायजर किंवा खोबरेल तेल लावावे. बाजारात सुगंधी सॅनिटरी पॅड उपलब्ध आहेत. परंतु, हे पॅड न वापरता साधे पॅड वापरावे. यामुळे पुरळ येण्याचा धोका कमी होतो. जर आपल्याला वारंवार पुरळचा त्रास किंवा रॅशेजचा त्रास होत असेल तर, ही इन्फेक्शनची लक्षणं आहेत. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

रात्रीचे जेवण बंद केल्यानं खरंच वेटलॉस होतो? जेवण बंद करुनही वजन वाढले तर?

६. मासिक पाळीदरम्यान, अनेकांना पोटदुखीचा त्रास होते, त्यामुळे जे पचायला हलके आहे, असे पदार्थ खावे. जास्त पाणी प्यावे. पावसाळ्यात जी उपलब्ध असतात, ती फळं खावी. यासह ड्रायफ्रुट्स खावे. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, तिखट पदार्थ टाळावे. हलका व्यायाम करावा, चालणं देखील  गरजेचं आहे.

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यमहिलाहेल्थ टिप्सआरोग्यपावसाळा आणि पावसाळी आजारपण