नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी राखी सावंत सध्या मात्र तिच्या तब्येतीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. राखी मागील काही दिवसांपासून या त्रासाने त्रस्त होती. पण २ दिवसांपुर्वी ती जेव्हा इस्पितळात दाखल झाली त्यावेळी तिच्या आजारपणाबद्दलची माहिती समोर आली. राखीच्या गर्भाशयात ट्यूमर (Uterine fibroids) असल्याचं म्हणजेच फायब्रॉईडच्या गाठी असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं असून तो लवकरच शस्त्रक्रिया करून काढण्यात येणार आहे (Rakhi sawant is suffering from uterine fibroids). पण हा आजार नेमका का होतो, काय त्याची लक्षणं याबाबतची चर्चा मात्र तिच्या चाहत्यांमध्ये आणि एकंदरीतच महिला वर्गामध्ये सुरू आहे... म्हणूनच त्याविषयी थोडी माहिती घेऊया.... (what are the symptoms and causes of uterine fibroids?)
गर्भाशयात फायब्राॅईडच्या गाठी का होतात?
mountsinai.org यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक ५ पैकी एका महिलेच्या गर्भाशयात फायब्रॉईडच्या गाठी असतातच. आफ्रिकन आणि अमेरिकन महिलांमध्ये फायब्रॉईडच्या गाठी असण्याचं प्रमाण तर खूप जास्त आहे.
वाढणाऱ्या वजनाचं टेंशन आलं? ९-१ चा हा घ्या सोपा फॉर्म्युला, महिनाभरात घटेल चरबी
त्या गाठी शरीरात असतातच. त्या लहान असतात, तेव्हा त्यांचा त्रास नसतो. पण बऱ्याचदा हार्मोन्सचे असंतुलन किंवा अनुवंशिकता यांच्यामुळे या गाठी वाढतात आणि मग राखीला जसा त्रास झाला, तसा त्रास होतो. त्यांचे आकारमान कमी असल्यास त्या औषध- गोळ्यांचा उपचारही त्यांच्यावर करता येतो. पण मोठ्या झाल्या तर मात्र शस्त्रक्रिया करून काढून टाकाव्या लागतात.
गर्भाशयात फायब्राॅईडच्या गाठी असण्याची लक्षणं
१. दोन मासिक पाळीदरम्यान मधेच कधीतरी ब्लिडिंग होणे.
२. पिरेड्स दरम्यान खूप जास्त रक्तस्त्राव होणे, तसेच रक्ताच्या गाठी जाणे...
स्वयंपाक चविष्ट करता पण अन्नातलं पोषणच गायब? ICMR सांगते, तुम्हीही 'या' चूका करताय..
३. मासिक पाळीमध्ये ५ ते ६ दिवसांपेक्षा अधिककाळ रक्तस्त्राव होणे.
४. वारंवार लघवीला जावे लागणे.
५. मासिक पाळीदरम्यान खूप पोट दुखणे.
६. ओटीपोट जड झाल्यासारखे वाटणे.
७. शारिरीक संबंधांच्यावेळी त्रास होणे.