Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीत खूप जास्त व्यायाम करताय? थांबा, वजन कमी करण्याच्या नादात...

मासिक पाळीत खूप जास्त व्यायाम करताय? थांबा, वजन कमी करण्याच्या नादात...

Reasons To Avoid Heavy Workout During Periods Ayurvedic Expert Tells : Exercises To Do and Avoid While Working Out During Your Period : Exercise and Your Menstrual Cycle : Periods and Exercise: How to Stay Active During Menstruation : मासिक पाळीत वर्कआऊट करावा की करु नये ? डॉक्टर सांगतात नेमकं कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2025 18:58 IST2025-01-20T18:44:49+5:302025-01-20T18:58:13+5:30

Reasons To Avoid Heavy Workout During Periods Ayurvedic Expert Tells : Exercises To Do and Avoid While Working Out During Your Period : Exercise and Your Menstrual Cycle : Periods and Exercise: How to Stay Active During Menstruation : मासिक पाळीत वर्कआऊट करावा की करु नये ? डॉक्टर सांगतात नेमकं कारण...

Reasons To Avoid Heavy Workout During Periods Ayurvedic Expert Tells Exercises To Do and Avoid While Working Out During Your Period How to Stay Active During Menstruation | मासिक पाळीत खूप जास्त व्यायाम करताय? थांबा, वजन कमी करण्याच्या नादात...

मासिक पाळीत खूप जास्त व्यायाम करताय? थांबा, वजन कमी करण्याच्या नादात...

मासिक पाळी ही महिलांना दर महिन्याला येणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या दरम्यान, महिलांमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव व्यतिरिक्त, पोटदुखी, पेटके येणे आणि मूड बदलणे (Reasons To Avoid Heavy Workout During Periods Ayurvedic Expert Tells) यासारख्या समस्या देखील होतात. मासिक पाळीचे (Exercises To Do and Avoid While Working Out During Your Period) ते चारपाच दिवस महिलांसाठी फार त्रासदायक असतात. यावेळी त्यांना मानसिक आणि अनेक (Exercise and Your Menstrual Cycle) शारीरिक त्रास होत असतो. आज महिला घर आणि नोकरी अशी दुहेरी भूमिका सांभाळतात. मग अशावेळी हा त्रास तिला अनेकवेळा अडथळा होतो. काही महिलांना पाळी येण्यापूर्वीच त्रास व्हायला सुरुवात होते. मासिक पाळीमध्ये महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो(How to Stay Active During Menstruation).

आजकाल सगळेच आपल्या फिटनेसची अधिक काळजी घेतात. यासाठी जिम, योगा, डाएट, एक्सरसाइज असे अनेक उपाय करून पाहिले जातात. परंतु मासिक पाळीचे किमान ५ दिवस हलके - फुलके एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला जातो. एरवी आपण कार्डिओ, हेव्ही एक्सरसाइज, इंटेन्स वर्कआऊट, वेट ट्रेंडिंग असे अनेक प्रकारचे एक्सरसाईज करतो. परंतु मासिक पाळीचे ५ दिवस हेव्ही एक्सरसाइज किंवा इंटेन्स वर्कआऊट, वेट ट्रेंडिंग न करण्याचा सल्ला दिला जातो. मासिक पाळीच्या या ५ दिवसांत हलके - फुलके एक्सरसाइज करण्यावर अधिक भर दिला जातो. याबाबत अधिक माहिती देताना एमडी आयुर्वेद डॉ. नितिका कोहली यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  

मासिक पाळी दरम्यान हेव्ही एक्सरसाइज, इंटेन्स वर्कआऊट का करु नये? 

डॉक्टरांच्यामते, आयुर्वेदात पीरियड्समध्ये हेव्ही एक्सरसाइज किंवा इंटेन्स वर्कआऊट करण्यास मनाई आहे. विशेषतः पहिल्या ४ दिवसात शरीरावर कोणताही जास्तीचा ताण येऊ नये. कारण पीरियड्स दरम्यान आपले शरीर डिटॉक्स होत असते. अशा स्थितीत शरीर आधीच क्षमतेपेक्षा जास्त काम करत असते. अशा परिस्थितीत जड व्यायाम केल्यास शरीरावर ताण येतो. हे कारण भविष्यात आपल्या शारीरिक समस्या वाढण्याचे मुख्य कारण बनू शकते. 

मासिक पाळी दरम्यान हेव्ही एक्सरसाइज, इंटेन्स वर्कआऊट करणे हानिकारक... 

मासिक पाळी दरम्यान, आपल्या शरीरात वात प्रवृत्ती अधिक वाढते. या वाढलेल्या वात वात प्रवृत्तीला सामान्य करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत पुरेशी विश्रांती घेणे आणि गरम अन्नपदार्थ खाणे यामुळे पुरेसा आराम मिळतो. पण या काळात जर हेव्ही एक्सरसाइज केला गेला किंवा स्ट्रेस घेतला गेला तर भविष्य काळात अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे मासिक पाळीत ब्लड फ्लो कमी होणे किंवा मासिक पाळीत जास्त वेदना होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

सुटलेली ढेरी आत जात नाही? करा ३ सोपे एक्सरसाइज, जिम - डाएट न करताही पोट होईल सपाट...


रोजच्या आहारात ‘या’ ३ प्रकारे वाढवा लिंबाचं प्रमाण, वाढलेलं वजन कमी करण्याचा घ्या सोपा उपाय...

मासिक पाळी दरम्यान नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ? 

१. पिरिएडस दरम्यान असे कोणतेही काम करू नका ज्याचा तुमच्या मनावर किंवा शरीरावर भविष्य काळात वाईट परिणाम होईल. 

२. मासिक पाळीच्या काळात सकस आहार घ्या. तुमच्या आहारात अधिक लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत राहील.

३. वेदना झाल्यास, कोमट पाण्याचा शेक घ्यावा आणि दिवसभर कोमट पाणी प्यावे. यामुळे तुमच्या शरीराला खूप आराम मिळेल.

४. मासिक पाळी दरम्यान जंक फूड खाणे टाळा. कारण त्यात असलेले तेल आणि मसाले शरीराला हानी पोहोचवू शकतात.

५. थंड अन्नपदार्थ खाण्याऐवजी या ५ दिवसांत फक्त गरम अन्नपदार्थ खा. यामुळे शरीराला खूप आराम मिळेल.

६. जर तुम्ही रोज एक्सरसाइज करत असाल तर मासिक पाळीत फक्त वॉकिंग किंवा हलके - फुलके एक्सरसाइज करा.

Web Title: Reasons To Avoid Heavy Workout During Periods Ayurvedic Expert Tells Exercises To Do and Avoid While Working Out During Your Period How to Stay Active During Menstruation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.