Join us   

सॅनिटरी नॅपकिन इनरवेअरमधून सटकते-लिक होते? १ सोपा उपाय- पाहा पॅड ठेवण्याची योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2023 6:39 PM

Sanitary pad hacks to prevent leakage during periods सॅनिटरी नॅपकिनही लिक होण्याची भीती वाटते, तसे होऊ नये म्हणून खास उपाय

महिन्यातून नियमित येणारे ४ दिवस महिलांसाठी फार त्रासदायक ठरतात. या दिवसात महिलांची फार तारांबळ उडते. मासिक पाळीच्या दिवसात काही महिला सॅनिटरी पॅड्स, टॅम्पॉन्स, किंवा मेन्स्ट्रुअल कपचा वापर करतात. तर आजही काही महिला सॅनिटरी पॅड्स वापरण्यास प्राधान्य देतात. परंतु, सॅनिटरी पॅड्स काही वेळेला पॅन्टीमधून निसटतात, किंवा लिकेजची समस्या निर्माण होते. अशा स्थितीत आपण योग्य पद्धतीने सॅनिटरी पॅड्सचा वापर करत आहोत ना? हे तपासून घेणं गरजेचं आहे(Sanitary pad hacks to prevent leakage during periods).

सध्या बाजरात सॅनिटरी पॅड्समध्ये देखील प्रकार आले आहेत. ज्यात महिलावर्ग विंग्स सॅनिटरी पॅड्सचा वापर जास्त करतात. विंग्स सॅनिटरी पॅड्स वापरण्याची देखील योग्य पद्धत आहे, विंग्स अनेकदा पॅन्टीला चिटकत नाही. सॅनिटरी पॅड्स पॅन्टीमधून निसटू नये, असे वाटत असेल तर, ही ट्रिक नक्की वापरून पाहा.

एकमेकांचे उष्टे खाल्ल्याने प्रेम नाही आजार वाढतात, तज्ज्ञ सांगतात, उष्टे खाण्याचे दुष्परिणाम

सॅनिटरी पॅड्स वापरण्यासाठी भन्नाट हॅक

सॅनिटरी पॅड्सचा वापर अनेक महिला करतात. याचा वापर वर्षानुवर्षे महिला करीत आल्या आहेत. प्रत्येक महिलेच्या साईजनुसार सॅनिटरी पॅड्स मिळतात. काही महिला विंग्स सॅनिटरी पॅड्स वापरतात. काही वेळेला विंग्स सॅनिटरी पॅड्स पॅन्टीला व्यवस्थित चिटकत नाही. ज्यामुळे सॅनिटरी पॅड्स पॅन्टीमधून निसटतात, किंवा लिकेजची समस्या निर्माण होते. अशा स्थितीत आपण या हॅकचा वापर करून पाहू शकता.

सायंकाळी चहा पिणं धोक्याचं, ऑफिसातून आल्या आल्या १ कप गरम चहा पीत असाल तर सावधान..

यासाठी पॅन्टीवर ज्याप्रमाणे आपण सॅनिटरी पॅड लावतो, त्याच प्रमाणे लावायचे आहे. परंतु, पॅड लावताना विंग्स पॅन्टीच्या मागच्या बाजूस चिटकवू नका. एक कात्री घ्या, व विंग्सला मधोमध कापून दोन भाग करा. त्यानंतर त्यावरील कव्हर काढून पॅन्टीच्या मागील बाजूस चिटकवा. यामुळे सॅनिटरी पॅड पॅन्टीवरून निसटणार नाही.

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यहेल्थ टिप्सआरोग्य