Join us

महिलांना पिरिएड लिव्ह मिळावी का? मासिक पाळीचे ४ दिवस सुटी, कार्यक्षमतेला मारक ठरेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2025 17:42 IST

Should women get period leave? : मासिक पाळीचा त्रास काही महिलांना जास्त होतो, काहींना कमी- सुटी हा त्यावरचा उपाय ठरेल का?

महिलांचे अधिकार, महिलांचे हक्क अशा विषयांना धरून समाजात सुधारणा होत आहेत.(Should women get period leave?) अर्थात एकीकडे बलात्कार, अनिष्ट रूढींसाठी महिलांचा बळी घेणारा समाज आहे. समाज आहे. आणि दुसरीकडे महिलांच्या हक्कांसाठी, सुविधांसाठी झुंजणारा समाज आहे. महिलांना रोजगाराचा अधिकार मिळविण्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करावी लागली.(Should women get period leave?) मात्र आता हळूहळू सर्व क्षेत्रात महिला अग्रस्थानी दिसायला लागल्या आहेत. स्त्री-पुरुष समानताबरोबरच आहे, पण निसर्गानेच निर्माण केलेल्या असमानतेचं काय?

पिरिएड लिव्हसाठी आजकाल जागोजागी मागणी सुरू आहे. या मागणीला काहीजण दुजोरा देत आहेत. काही जणांचे म्हणणे असे आहे की, पाळी या विषयाचा उगाच बाऊ केला जात आहे.(Should women get period leave?) पाळीच्या दिवसात महिला कोणत्या दिंव्यातून जातात हे शब्दात मांडणे कठीणच. प्रत्येकाचे पिरिएड लिव्ह बद्दल मत वेगवेगळे आहे.

युपीएससीची मुलाखत चालू असताना असद झुबेरीला पिरिएड लिव्ह द्यावी की देऊ नये? जर पिरिएड लिव्ह दिली तर मग कार्यक्षमतेवर परिणाम होईल का?? असे विचारले असता त्याने फार सुंदर उत्तर दिले. तो म्हणाला, "आपण एका वैविध्यपूर्ण वातावरणात काम करतो. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाची शरीर रचना वेगळी आहे. महिलांनी प्रत्येक हक्क मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. पिरिएड लिव्ह नक्कीच गरजेची आहे. महिन्यातून काही दिवस सुट्टी घेतल्याने त्या महिलेचे कर्तृत्व कमी होत नाही. पिरिएड लिव्ह मॅनेजेबल आहे. पाळीच्या दिवसात होणारा त्रास आपण समजून घेणे गरजेचे आहे. आजपर्यंत त्या पिरिएड लिव्हशिवाय काम करत आल्या. म्हणून त्यांनी पुढेही करत राहावे हा विचार योग्य नाही. बदल घडायला वेळ लागतो. बदल गरजेचा आहे. 

पाळीचा त्रास काही महिलांना कमी होतो, काहींना जास्त होतो. बऱ्याच जणींचे कामाचे ठिकाण घरापासून लांब असते. काही जणींना होणारा रक्तस्त्राव खूप जास्त असतो. पाळीत बीपी वर-खाली होणाऱ्या महिला देखील असतात. अशा परिस्थितीत पिरिएड लिव्ह द्यावी का देऊ नये? हा सध्या वादाचा विषय बनला आहे. बरेच जण मग घरीच बसा. अशी टिपण्णी देखील करत आहेत. तर काही जण वर्क फ्रॉम होम द्या, सुट्टी नको. असा सल्ला देत आहेत. तुम्हाला काय वाटते? याचा नक्की विचार करा.

 

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यकेंद्रीय लोकसेवा आयोग