Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > कपड्यांवर डाग पडायचे, वेदनेने मी हैराण! श्रुती हसन सांगते शाळकरी वयात मासिक पाळीचा त्रास

कपड्यांवर डाग पडायचे, वेदनेने मी हैराण! श्रुती हसन सांगते शाळकरी वयात मासिक पाळीचा त्रास

Shruti Hasan About Period pain in school days : शाळकरी वयात मासिक पाळीचा त्रास किती भयानक होता याविषयी श्रुती हसन मोकळेपणानं सांगते की आपण बोललोच नाही तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 05:59 PM2023-12-22T17:59:40+5:302023-12-22T18:01:40+5:30

Shruti Hasan About Period pain in school days : शाळकरी वयात मासिक पाळीचा त्रास किती भयानक होता याविषयी श्रुती हसन मोकळेपणानं सांगते की आपण बोललोच नाही तर..

Shruti Hasan About Period pain in school days : Stains on the clothes, I was shocked by the pain! Shruti Haasan tells about Menstrual Trouble in School Age | कपड्यांवर डाग पडायचे, वेदनेने मी हैराण! श्रुती हसन सांगते शाळकरी वयात मासिक पाळीचा त्रास

कपड्यांवर डाग पडायचे, वेदनेने मी हैराण! श्रुती हसन सांगते शाळकरी वयात मासिक पाळीचा त्रास

मुलगी वयात आली म्हणजे १३ ते १४ वर्षाची झाली की तिला मासिक पाळी येते. या काळात आपण साधारण सातवी ते नववीमध्ये असतो आणि शाळेत जात असतो. मासिक पाळी रजा किंवा मासिक पाळीत महिलांना होणारा त्रास याविषयी सध्या बरीच चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन हिनेही आपल्याला मासिक पाळी सुरू झाली तेव्हा कसा त्रास व्हायचा आणि त्यावेळी शाळेत असताना आपण या गोष्टीचा कसा सामना करायचो याविषयी मोकळेपणाने भाष्य केले आहे (Shruti Hasan About Period pain in school days). 

पाळी सुरू झाली तेव्हा आपल्याला डिसमोनोरीयाचा त्रास झाला. या समस्येत प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्त्राव होतो, तसेच वेदनाही खूप जास्त होतात. दर एक महिन्याआड मला हा त्रास व्हायचा आणि माझ्या संपूर्ण शाळेला कळायचे की माझी पाळी आली.श्रुती सांगते, या काळात इतका जास्त त्रास व्हायचा की मला शाळेतून एकतर घरी किंवा दवाखान्यात पाठवले जायचे. माझे पाळीचे ४ दिवस अमुक आहेत हे मी टीनएजर असताना सगळ्यांना माहित असायचे.  पण काही काळाने पाळी म्हणजे काहीतरी वेगळे हा स्टीग्मा लोकांच्या मनातून दूर झाला. 


माझे मित्र, शिक्षक मला म्हणायचे काळजी करु नकोस, आज फिजिकल अॅक्टीव्हीटीज करु नकोस आणि आराम कर. त्यामुळे त्यांना माझी अवस्था कळते हे पाहून मला खूपच धीर किंवा आधार मिळायचा असा श्रुतीच्या बोलण्याचा टोन होता. एकूणच सुरुवातीच्या काळात मुलींना मासिक पाळी ही गोष्टी शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या समजून घेणं खूप मोठी गोष्ट असते. अशा काळात आपल्याला शाळेतून उत्तम आधार मिळाल्याचे श्रुती म्हणते. त्यामुळे हा प्रवास सोपा होण्यास मदत झाली असे तिच्या सांगण्यातून प्रतित होताना दिसते. 

Web Title: Shruti Hasan About Period pain in school days : Stains on the clothes, I was shocked by the pain! Shruti Haasan tells about Menstrual Trouble in School Age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.