Join us   

मासिक पाळीतली पोटदुखी कमी करण्यासाठी दर महिन्याला गोळ्या घेता? तज्ज्ञ सांगतात असं कराल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2024 9:18 AM

Health Tips To Reduce Menstrual Pain: मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी मनानेच गोळ्या घेणाऱ्या एका तरुणीचा नुकताच मृत्यू झाला.. बघा याविषयी तज्ज्ञ काय सांगतात...(side effects of taking pain killer during menstruation without any medical guidance)

ठळक मुद्दे डॉक्टरांना न विचारताच मनानेच कोणतीही पेनकिलर घेणे पूर्णपणे टाळले पाहिजे.

मासिक पाळीमध्ये अनेक मुलींना खूप जास्त त्रास होतो. साधारणपणे बऱ्याच महिलांच्या बाबतीत पहिल्या बाळंतपणानंतर मासिक पाळीचा त्रास कमी झालेला दिसतो. पण किशोरवयीन मुलींना पाळीचा खूप त्रास होतो. अनेक जणींना तर एवढा त्रास होतो की त्यांना शाळा, ट्युशन बुडवून घरीच थांबवावे लागते. अशावेळी मग दर महिन्यातच त्रास सहन होत नसल्याने त्या प्रत्येकवेळी मनानेच पेनकिलर घेतात. पण असं करणं कितपत योग्य आहे?(side effects of taking pain killer during menstruation without any medical guidance)

काही दिवसांपूर्वी तामिळनाडू येथील एका १८ वर्षीय मुलीचा मासिक पाळीदरम्यान खूप जास्त प्रमाणात पेनिकिलर घेतल्यामुळे मृत्यू झाल्याची बातमी होती.

हनुवटीखालची, गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहरा जाड दिसतो? डबल चीन कमी करण्यासाठी ५ सोपे व्यायाम

त्यानंतर तिच्या मृत्यूविषयी देण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालात असं सांगण्यात आलं होतं की ती तरुणी मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी दर महिन्यात बऱ्याच प्रमाणात पेन किलर घ्यायची. यासाठी तिने कधीही कोणत्याही डॉक्टराचा सल्ला घेतलेला नव्हता. खूप जास्त प्रमाणात वारंवार गोळ्या घेतल्याने तिच्या शरीरांतर्गत भागावर परिणाम होत गेला आणि त्यामुळे तिचा मृत्यू ओढवला.  

 

याविषयी डॉक्टर चेतना यांनी ओन्ली माय हेल्थला दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांना न विचारताच खूप जास्त प्रमाणात कोणत्याही पेन किलर घेणे आरोग्यासाठी घातकच आहे. शिवाय त्या मुलीने असे वारंवार केले.

झटपट वजन कमी करायचं? मग दुपारच्या जेवणात तुमच्या ताटात 'हे' पदार्थ असायलाच पाहिजेत

पेनकिलरच्या अतिसेवनामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होत जातात. जर तुम्ही कुठलीही पेनकिलर कोणत्याही वैद्यकिय सल्ल्याशिवाय खूप जास्त प्रमाणात घेत असाल तर त्यामुळे पोटामध्ये अल्सर होणे, आतल्याआत ब्लिडिंग होणे, किडनी, लिव्हर खराब होणे, नर्व्हस सिस्टिमवर परिणाम होणे असेही त्रास होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांना न विचारताच मनानेच कोणतीही पेनकिलर घेणे पूर्णपणे टाळले पाहिजे.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य