Join us   

नोकरी करणाऱ्या महिलांना आता मासिक पाळीची सुटी, महिला आता हक्काने सुटी घेऊ शकणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:57 AM

Sikkim High Court Allows Menstrual Leave For Women : सिक्कीम हायकोर्टाने महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देण्याची घोषणा केली आहे.

प्रत्येक महिलेला मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो. मासिक पाळीच्या वेदना जाणवत असतील तरी घरातील इतर काम करावी लागतात याशिवाय बाहेरच्या कामांची जबाबदारीसुद्धा पार पाडावी लागते. मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना ३ ते ४ दिवसांसाठी कार्यायलीन कामांपासून आराम मिळावा अशा चर्चा अनेक राज्यांमध्ये आहेत. (Sikkim High Court Allows Menstrual Leave For Women Emloyees)

सिक्कीम हायकोर्टाने महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देण्याची घोषणा केली आहे. मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या पूर्वसंध्येला न्यायालयाचा हा निर्णय आला असून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश विश्वनाथ सोमदार यांनी मंजूरी मिळाल्यानंतर मंगळवारी  याबाबत अधिसूचना जारी केली आहे. 

कॅल्शियम हवंय पण दूध आवडत नाही ? ५ पदार्थ रोज खा, पोलादी शरीर-मजबूत होतील हाडं

यात महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून 2-3 दिवसांची मासिक रजा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ़  सिक्कीम हे एक लहान हिमालयीन राज्य आहे जे विद्यार्थिनींचे आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यात आघाडीवर आहे. तसेच, मातांना सक्षम बनवण्यात आणि वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना IVF द्वारे मूल होण्यास मदत करण्यात ती आघाडीवर आहे. या निर्णयानंतर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

याबाबतची अधिसूचना सिक्कीम उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल प्रज्वल खतिवडा यांनी जारी केली आहे. यानुसार आता हायकोर्ट रजिस्ट्रीतील महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून दोन ते तीन दिवसांची मासिक रजा घेता येणार आहे. पण, त्यांना प्रथम उच्च न्यायालयाशी संलग्न वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा लागेल. यानंतर, अशा रजेसाठी शिफारस पत्र प्राप्त करावी लागेल. यासंबंधीच्या अधिसूचनेमध्ये 'अशा रजा घेतल्याने तुमच्या उर्वरित सुट्यांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही,' असे म्हटले आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलमासिक पाळी आणि आरोग्य