आजकाल पाळी वेळेवर न येणं किंवा महिनोंनहिने पुढे जाणं ही समस्या फार वाढत चालली आहे. यामागे अनेक कारणे आहेत.(taking pills to delay your period? Read this) त्यापैकी एक म्हणजे पाळी पुढे जाण्यासाठी किंवा लवकर यावी म्हणून घेतल्या जाणाऱ्या गोळ्या. जुन्या काळातल्या महिलांना विचारल्यावर त्या सांगतात की, पाळी येण्याच्या वेळेचे गणित नैसर्गिक आहे. त्याच्याशी छेडछाड न केलेलेच चांगले.(taking pills to delay your period? Read this) पण आजकाल मुली विविध कारणांसाठी या गोळ्या घेतात. याविषयी डॉ. अंजली कुमार यांनी त्यांच्या मैत्री या यूट्यूब चॅनलवर छान माहिती दिली आहे. त्या म्हणतात शक्यतो गोळ्या नका घेऊ. घ्यायच्याच असतील तर स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतील त्यानुसार घ्या.(taking pills to delay your period? Read this)
त्या सांगतात, आता पाळी पुढे ढकलण्याच्या, लवकर यावी यासाठी, बर्थ कंट्रोलसाठी, पीसीओडीसाठी, पाळी येत नसेल तर येण्यासाठी, वय उलटल्यावरही थांबत नसेल तर थांबवण्यासाठी अशा विविध कारणांसाठी गोळ्या मिळतात.(taking pills to delay your period? Read this) डॉक्टरांशी बोलल्याशिवाय अशा गोळ्या कधीच घेऊ नका.(taking pills to delay your period? Read this) अतिप्रमाणात अशा गोळ्या घेतल्या गेल्या तर गर्भधारणेवर परिणाम होतो. गोळ्या घेत्यानंतर तुमच्या मासिक पाळीचे वेळापत्रक बदलून जाईल.(taking pills to delay your period? Read this) पुढच्या महिन्यात पाळी उशीरा येणार. सतत पाळी येते म्हणून पाळी उशीरा येण्याच्या गोळ्या आणि पाळी येत नाही म्हणून लवकर येण्यासाठी गोळ्या घेऊ नका. अशा समस्यांसाठी डॉक्टरांकडे जा. ते देतील त्या गोळ्या घ्या.
त्या असं सांगतात, या गोळ्या हार्मोन्सवर परीणाम करतात त्यानुसार त्या काम करतात. त्याचे तसे काही दुष्परिणाम नाहीत. पण प्रत्येकीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे उगाच गोळ्या घेणे चुकीचे आहे. या गोळ्या जास्त वेळा घेतल्यास नक्कीच हानिकारक ठरतील. या गोळ्या अतिप्रमाणात घेतल्यास ब्रेकथ्रू ब्लीडिंग होऊ शकते. ज्यामुळे गर्भाशयाचा श्लेष्मल (endometrium ) मधोमध तुटतो. थांबवलेला स्त्राव त्याचा मार्ग बनवतो. त्यामुळे महत्त्वाच्या कारणासाठीच गोळ्या वापरा. शक्यतो वापरूच नका.