मासिक पाळीचे ते चारपाच दिवस महिलांसाठी फार त्रासदायक असतात. यावेळी त्यांना मानसिक आणि अनेक शारीरिक त्रास होत असतो. आज महिला घर आणि नोकरी अशी दुहेरी भूमिका सांभाळतात. मग अशावेळी हा त्रास तिला अनेकवेळा अडथळा होतो. काही महिलांना पाळी येण्यापूर्वीच त्रास व्हायला सुरुवात होते. मासिक पाळीमध्ये महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो, सॅनिटरी नॅपकिन वापरुनसुद्धा काहीवेळा रक्तस्त्राव लिकेज होतो ही एक सर्वात मोठी समस्या आहे.
मासिक पाळी ही महिलांना दर महिन्याला येणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या दरम्यान, महिलांमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव व्यतिरिक्त, पोटदुखी, पेटके येणे आणि मूड बदलणे यासारख्या समस्या देखील होतात. मासिक पाळीत रक्तस्त्राव होणे हे सामान्य आहे परंतु जर जास्त रक्तस्त्राव होत असेल तर खूप त्रास होतो. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने दिवसातून अनेक वेळा सॅनिटरी नॅपकिन बदलावे लागतात. अनेकदा महिलांना मासिक पाळी येण्याची भीती असते. विशेषत: जर आपल्याला ही जास्त रक्तस्त्राव होत असेल तर मासिक पाळी दरम्यान पॅड लीक होण्याची शक्यता जास्त असते, पॅड लिकेज झाल्यामुळे काहीवेळा कपड्यांमध्ये डाग लागतात. मासिक पाळीत होणारा रक्तस्त्राव पॅडमधून लिकेज होऊन कपड्यांना डाग पडू नयेत म्हणून काही सोप्या टिप्स फॉलो करुयात(These 5 period hacks will ensure you never stain your clothes ever again).
मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन लिकेज होऊन इतर कपड्यांना डाग लागू नयेत म्हणून....
१. सॅनिटरी नॅपकिन बरोबर मध्यभागी लावा :- मासिक पाळी दरम्यान लिकेज टाळण्यासाठी पॅड योग्यरित्या लावणे खूप महत्वाचे आहे. यासाठी नेहमी इनरवेअरच्या बरोबर मध्यभागी पॅड चिटकवावे. पॅड इनरवेअरवर चिटकवताना ते खूप जास्त वरच्या बाजूला किंवा अगदीच खालच्या बाजूला चिटकवणे टाळावे. कापडी पॅड वापरल्याने लिकेज होण्याची अधिक शक्यता असते. यासाठी कापडी पॅडऐवजी सामान्य पॅड वापरा.
२. सॅनिटरी नॅपकिनची साईझ :- मासिक पाळीदरम्यान होणारे लिकेज टाळण्यासाठी नेहमी योग्य साईज व शेपचे सॅनिटरी नॅपकिन वापरावे. काहीवेळा आपल्यापैकी काहीजणी अतिशय कमी रक्तस्त्राव होतो म्हणून अगदी छोट्या साईजचे पॅड वापरतात. परंतु ही चूक अजिबात करु नये. नेहमी मोठ्या साईजचे पॅड वापरावे. यामुळे आपल्याला जास्तीचे कव्हरेज मिळून रक्तस्त्राव लिकेज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचबरोबर नेहमी सॅनिटरी नॅपकिन्सना विंग्स असणारे पॅड वापरावे. या विंग्समुळे पॅड इनरवेअरला व्यवस्थित चिकटून बसते. त्यामुळे लिकेज होत नाही.
मासिक पाळीत खूप पोट दुखते? करा ४ उपाय, पोटदुखी होईल कमी...
पिरिएड ट्रॅकर अॅप्स काय असतात? खरंच त्यांचा उपयोग करुन पाळीच्या दिवसात योग्य काळजी घेता येते का?
३. पँटी लाइनर वापरा :- जर आपल्याला मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन लिकेज होण्याची भीती वाटत असेल तर आपण पँटी लाइनरचा वापर करु शकता. आपण ते पॅडच्या बाजूला, मागच्या भागाजवळ आणि तळाशी लावू शकता. यामुळे अतिरिक्त कव्हरेज मिळेल आणि डाग पडण्याची भीती राहणार नाही. आपण आपल्या इच्छेनुसार, पँटी लाइनरचा वापर करू शकता.
४. पिरियड पॅन्टी वापरा :- जर आपल्याला मासिक पाळी दरम्यान लिकेजची समस्या टाळायची असेल तर आपण पीरियड पॅन्टी वापरू शकता. ही सामान्य पँटीपेक्षा पूर्णपणे वेगळी असते आणि तिच्या आतील बाजूस कापडाचे तीन थर असतात. या पँटीज जरा महाग असतात पण त्यांची शोषकता जास्त असते. या पँटीमध्ये असणाऱ्या तीन थरांमुळे जरी कधी चुकून लिकेज झालेच तर या जाड कापडामुळे अतिरिक्त रक्तस्त्राव शोषला जातो.
इनरवेअर्सचा आतला भाग पांढरा -कडक कशाने होतो? कारणं आणि ४ सोपे उपाय...
५. सॅनिटरी नॅपकिन ऐवजी इतर पर्याय :- मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरुन जर आपल्याला लिकेजची समस्या उद्भवत असेल तर सॅनिटरी नॅपकिन ऐवजी इतर पर्यायांचा वापर करावा. आपण सॅनिटरी नॅपकिन ऐवजी टॅम्पॉन, मेन्स्ट्रुअल कप यांसारख्या इतर पर्यायांचा देखील वापर करु शकता.