Join us

पॅड नको, टॅम्पॉन वापरू असा विचार करत आहात? पर्याय चांगला पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2024 16:14 IST

Thinking of using tampons? : टॅम्पॉन वापरायला घाबरता का ?

सध्याच्या अधुनिक काळात विविध नवीन गोष्टींचा वापर आपण करत असतो.(Thinking of using tampons?) नवनवीन वस्तूंचा वापर करण्याआधी आपण त्याविषयी माहिती गोळा करतो.(Thinking of using tampons?) जर प्रतिसाद सकारात्मक असेल तरच आपण ती वस्तू वापरतो. पण जर आपल्याला असे जाणवले की प्रतिसाद काही फारचा चांगला  नाही, तर आपण माघार घेत त्या वस्तूचा नाद सोडतो. खास करून स्कीनकेअर प्रॉडक्टस वापरताना सावध राहणे गरजेचे आहे.(Thinking of using tampons?) चुकीच्या गोष्टी वापरणे त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते. पण एवढा विचार आपण पाळीसाठी पॅड, कप किंवा टॅम्पॉन वापरताना करतो का? पाळीसाठी आता कोणी कापड वापरत नाही. आता जगभरात जास्त करून पॅड वापरले जाते. पॅडच्या मागोमाग आता महिला टॅम्पॉन वापरायला लागल्या आहेत. पण बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की, ते वापरणे धोकादायक तर नाही ना? 

असा प्रश्न पडणे सहाजिकचं आहे. कारण टॅम्पॉन पॅडसारखे शरीराबाहेर वापरले जात नसून, ते योनीच्या आत टाकावे लागते. रक्तस्त्राव होण्याच्या जागेत टॅम्पॉन व्यवस्थित इन्सर्ट करावे लागते. त्यामुळे ते वापरावेत का? असा प्रश्न पडतो. एफ.डी.ए(FDA-Food And Drug Administration) ने सांगितले आहे की, टॅम्पॉन वापरायचे असेल तर निर्धोकपणे वापरा.(Thinking of using tampons?) फक्त ते कसे वापरायचे याची योग्य माहिती घेऊन नंतरच ते वापरावे. टॅम्पॉन वापरणाऱ्या महिलांची संख्या फार मोठी आहे. बाजारात रियुजेबल टॅम्पॉन मिळतात ते मात्र वापरणे टाळा.  एक टॅम्पॉन एकदाच वापरावे. वापरलेले टॅम्पॉन परत वापरल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. 

टॅम्पॉन हे कॉटन, रेयॉन यांच्या मिश्रणातून बनवले जाते. त्यात कोणतेही हानिकारक पदार्थ नसतात. अनेक महिला खेळाडू टॅम्पॉन वापरतात. जरी टॅम्पॉन वापरणे सोयीस्कर सिद्ध झाले असले, तरी एकदा फॅमिली डॉक्टरला विचारून घेणे योग्य ठरेल. पाळीच्या काळात कम्फर्टची कल्पना प्रत्येकीची वेगवेगळी असते. त्यामुळे तुमची मैत्रिण टॅम्पॉन वापरते म्हणून तुम्ही वापरू नका. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला जो पटेल तोच पर्याय निवडा.   

टॅग्स : महिलामासिक पाळी आणि आरोग्यआरोग्यस्त्रियांचे आरोग्य