Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीत वजन वाढतं? 5 नियम, वजन राहील कायम नियंत्रणात

मासिक पाळीत वजन वाढतं? 5 नियम, वजन राहील कायम नियंत्रणात

खाण्या पिण्याचे आणि व्यायामाचे नियम पाळून मासिक पाळीत वाढणारं वजन (how to control weight in period) आटोक्यात ठेवता येतं. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 06:51 PM2022-06-22T18:51:41+5:302022-06-22T18:55:02+5:30

खाण्या पिण्याचे आणि व्यायामाचे नियम पाळून मासिक पाळीत वाढणारं वजन (how to control weight in period) आटोक्यात ठेवता येतं. 

Weight gain in period? 5 rules to control weight in period | मासिक पाळीत वजन वाढतं? 5 नियम, वजन राहील कायम नियंत्रणात

मासिक पाळीत वजन वाढतं? 5 नियम, वजन राहील कायम नियंत्रणात

Highlightsमासिक पाळीत शरीरात हाम्रोन्समध्ये बदल होतात. त्याचा परिणाम वजनावर होतो. 

मासिक पाळीत वजन (weight gain in period)  वाढण्याची समस्या अनेकजणींना भेडसावते. मासिक पाळीपूर्वी डाएट आणि व्यायाम याद्वारे कमी केलेलं, आटोक्यात ठेवलेलं वजन मासिक पाळीच्या काळात वाढतं. मासिक पाळीत होणाऱ्या वेदना आणि रक्तस्त्राव यामुळे अनेकजणी व्यायाम करु शकत नाही. तसेच मासिक पाळीच्या काळात खाण्याचा मोह वाढतो. खाण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळेस वजन (how to control weight in period) आटोक्यात कसं ठेवावं हा मोठा प्रश्न असतो.  यासाठी 5 नियमांचं काटेकोर पालन केल्यास ( rules for control weight in period) वजन नियंत्रणात राहातं.

Image: Google

मासिक पाळीत वजन का वाढतं?

मासिक पाळीत शरीरात हार्मोन्स बदलतात. शरीरात ॲस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीर फुगल्यासारखं, जड जड वाटतं. ॲस्ट्रोजन सोबतच प्रोजेस्ट्रेराॅनचं प्रमाणही वाढतं. हार्मोन्समध्ये झालेल्या या बदलांमुळे भूक जास्त लागते. सतत भूक लागल्यासारखं वाटतं. मासिक पाळीच्या काळात एकीकडे खाणं वाढतं आणि व्यायामाचं प्रमाण मात्र कमी होतं , त्याचा थेट परिणाम वजन वाढण्यावर होतो.

 Image: Google

मासिक पाळीत वजन नियंत्रणत ठेवण्यासाठी

1. मासिक पाळीत वजन कमी ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. फायबरयुक्त पदार्थांमुळे भूक नियंत्रणात राहाते. फायबरचं पचन करताना शरीरातील चरबी वितळते, तसेच चयापचयाचा वेगही वाढतो. फायबरयुक्त आहारामुळे वजन नियंत्रणात राहातं.

2. मासिक पाळीच्या काळात पाणी भरपूर प्यावं. पुरेसं पाणी प्याल्यानं शरीरात ओलसरपणा राहातो. भूक नियंत्रणात राहाते तसेच पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

Image: Google

3. मासिक पाळीत होणारा खाण्याचा मोह टाळायला हवा. मासिक पाळीच्या काळात ध्यानधारणा केल्यास या काळात बदलणारे मूड आणि खाण्याचा होणारा मोह आटोक्यात ठेवता येतो. मासिक पाळीच्या काळात मन शांत ठेवून आरोग्यदायी पदार्थांच्या सेवनावरच भर द्यावा. 

4.  मासिक पाळीत अनेकजणी काही विशेष त्रास होत नसतानाही मासिक पाळीत व्यायाम करायचा नाही हा समज बाळगून व्यायाम करत नाही. पण मासिक पाळीत  हलका फुलका व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. थोडा व्यायाम करुन मासिक पाळीत शरीराचा वाटणारा जडपणा कमी करता येतो. 

5. मासिक पाळीच्या काळात मनाची अस्वस्थता वाढते. त्यामुळे चहा, काॅफी पिण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीरातील कोरडेपणा वाढतो. याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो. त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान चहा काॅफी पिण्यावर नियंत्रण ठेवून वजन आटोक्यात ठेवता येतं. 
 

Web Title: Weight gain in period? 5 rules to control weight in period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.