Join us   

मेनस्ट्रुअल कप वापरण्याचे फायदे कोणते? सॅनिटरी नॅपकिन वापरण्यापेक्षा कप वापरणं सोयीचं का असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 7:41 PM

Menstrual Cup: Usage, Benefits, Advantages सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे काही तोटेही आहेत, त्यामुळे कपसारख्या नव्या पर्यायाचाही वापर करायला हवा.

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. महिलांना महिन्यातील त्या ४ दिवसात स्वतःची अधिक काळजी घ्यावी लागते. जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा महिला सॅनिटरी नॅपकिन्स आणि टॅम्पॉन्सचा वापर जास्त करतात. मात्र, त्याहुन जास्त महिला सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात.  मेन्स्ट्रुअल कप वापरण्याची अनेकींना भीती वाटते.  मात्र नीट शास्त्रीय माहिती घेतली तर आपण हे कप वापरु शकतो.

मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय

मासिक पाळीचा कप हा रबर, सिलिकॉन किंवा लेटेक्सपासून तयार केला जातो. हा कप मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रिया  योनीमध्ये ठेवतात. ज्यामध्ये मासिक पाळीचे सर्व रक्त त्यात जमा होते. मासिक पाळीच्या कपमध्ये सॅनिटरी पॅड आणि टॅम्पॉन्सच्या तुलनेत अधिक रक्त जमा होते. ज्यामुळे ते अनेक स्त्रियांसाठी अधिक उपयुक्त बनते.

मेन्स्ट्रुअल कपचा वापर कसा करावा

सर्वप्रथम मासिक पाळीचा कप सी-आकारात दुमडा, नंतर योनीमध्ये ठेवा. त्यानंतर ते तुमच्या योनीच्या बाहेरील थरात बसते. म्हणजेच ते तुमची योनी पूर्णपणे सील करते. यानंतर कप आपल्या हाताने हलके फिरवण्याचा प्रयत्न करा. जर ते चांगले बसवले गेले असेल तर ते सहजपणे फिरते. एकदा वापल्यानंतर, ते १२ तास बदलण्याची गरज नाही.

मुख्य म्हणजे कपड्यांवर डाग पडण्याची देखील भीती नसते. वापर झाल्यानंतर कपला गरम पाण्याच्या मदतीने धुवून घ्या. अशा प्रकारे हे कप आपण पुन्हा वापरू देखील शकता. यामुळे आपल्या सॅनिटरी नॅपकिन्सचा खर्च देखील वाचला जाईल. हे कप साईजनूसार बाजारात उपलब्ध आहेत.

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यहेल्थ टिप्सस्त्रियांचे आरोग्य