मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. मासिक पाळीचा हा ४ ते ५ दिवसांचा काळ स्त्रीसाठी अतिशय नाजूक असतो. या दिवसांत स्त्रीच्या शरीरात खूप बदल होत असतात. याचबरोबर खूप हार्मोनल चेंजेस देखील होताना दिसतात. या काळात त्या स्त्रीला शारीरिक व मानसिक आरामाची फार गरज असते. मासिक पाळीत जसे तिच्या शरीरात (Skin and the cycle: how hormones affect your skin) बदल घडून येतात तसेच याचा परिणाम थोड्याफार प्रमाणात स्किनवर देखील होतो(The menstrual cycle and the skin).
मासिक पाळी (The menstrual cycle impacts your skin) दरम्यान स्किनमध्ये अनेक बदल होतात. परंतु या बदलानुसार स्किन कधी चांगली दिसते तर कधी स्किनच्या समस्या निर्माण होतात. काहीवेळा स्किन खूप चमकदार आणि मुलायम दिसते, तर कधी रुक्ष, निस्तेज काळी पडल्यासारखी दिसते. एवढेच नव्हे तर स्किनचे अनेक प्रॉब्लेम्स देखील होतात. पुरळ येणे, स्किन लालसर होणे, स्किनवर काळे पॅच येणे, काळे डाग पडणे अशा अनेक समस्या होतात. मासिक पाळीच्या चार वेगवेगळ्या फेजेस असतात, या प्रत्येक फेजनुसार स्किनमध्ये काही ना काही बदल होतच असतात. या प्रत्येक फेजमध्ये स्किनची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेणे गरजेचे असते. मासिक पाळी दरम्यान स्किनमध्ये होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना स्किनची कशी काळजी घ्यावी, याबद्दल अधिक माहिती घेऊयात(What Happens to Your Skin During Your Menstrual Cycle).
मासिक पाळी दरम्यान स्किनची काळजी कशी घ्यावी ?
१. फॉलिक्यूलर फेज :- पहिल्या दिवसांपासून ते तेराव्या दिवसांपर्यंतच्या काळाला 'फॉलिक्युलर फेज' म्हणतात. या काळात इस्ट्रोजेन हार्मोनमध्ये हळूहळू वाढ होते. त्यामुळे या दिवसांमध्ये स्किन सुरुवातीला खूप कोरडी वाटते, कारण इस्ट्रोजन हार्मोन कमी प्रमाणात बाहेर टाकले जाते. पण हळूहळू त्याची पातळी वाढू लागते आणि स्किन कोरडी दिसू लागते. यावेळी जर आपली स्किन इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे कोरडी आणि निर्जीव दिसत असेल तर हायलुरोनिक ऍसिड वापरावे. यामुळे स्किनला खूप मदत होते त्याचबरोबर सौम्य क्लिन्झर वापरणे फायदेशीर ठरेल.
२. ओव्यूलेशन फेज :- ओव्हुलेशन सायकलच्या १४ व्या ते १६ व्या दिवसाच्या दरम्यान होते, म्हणजेच अंडाशय तयार करते. या काळात, गर्भाशय गर्भधारणेसाठी तयार होते आणि इस्ट्रोजेनची लेव्हल ही जास्त असते. त्यामुळे या दिवसात स्किन चमकदार आणि मुलायम दिसते. यावेळी, स्किनच्या फारशा समस्या उद्भवत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर एक अप्रतिम चमक दिसू लागते. या टप्प्यात स्किनचे आरोग्य पूर्णपणे चांगले राहते. म्हणून, यावेळी आपण आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सौम्य क्लिन्झर, कोलेजन बूस्टिंग मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरावे.
योनीमार्गात प्रचंड कोरडेपणा, सतत आग - जळजळ होण्याची ५ कारणं, त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...
३. ल्युटल फेज :- ल्युटल फेजमध्ये इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ लागते आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढू लागते. या हार्मोनमुळे स्किनचा तेलकटपणा वाढू लागतो. त्यामुळे मुरुम, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स यासारख्या समस्या उद्भवू लागतात. यामध्ये त्वचा बऱ्यापैकी तेलकट होते. अशावेळी सॅलिसिलिक ॲसिडसारख्या तेल कमी करणाऱ्या उत्पादनांचा वापर करावा. त्वचेला एक्सफोलिएट आणि मॉइश्चरायझ करावे.
४. मासिक पाळी :- या टप्प्यात मासिक पाळी सुरू होते, जी ३ ते ५ दिवस राहते. यावेळी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या दोन्हींची पातळी कमी होऊ लागते. या काळात स्किन बऱ्यापैकी निस्तेज दिसते. यावेळी त्वचेची संवेदनशीलताही वाढते. त्यामुळे पुरळ आणि लालसरपणाची समस्या उद्भवू शकते. या काळात पुरळ येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सॅलिसिलिक ॲसिड, टी ट्री ऑइल इत्यादींचा वापर करा. याचबरोबर त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळेल याची काळजी घ्यावी.