Join us   

पिरिअड पॅण्ट हा प्रकार काय असतो? महिलांना आरोग्याच्या दृष्टीने ते वापरणे फायद्याचे की तोट्याचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 6:26 PM

Here Is All You need To Know About Period Panties मासिक पाळीत डाग पडू नये म्हणून अनेकजणी पिरिअड पॅण्ट वापरतात, पण ते वापरणे योग्य की चूक?

मेन्स्ट्रुएशन हायजीन हा मुद्दा फार महत्वाचा आहे. गेल्या काही वर्षात मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत अनेक प्रॉडक्ट्स बाजारात आले आहेत. मात्र, सॅनिटरी पॅड्स हे प्रॉड्कट अधिक करून वापरले जाते. सॅनिटरी पॅड्स व्यतिरिक्त मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पन्स यासह पिरीअड पॅण्ट, असे प्रॉडक्ट देखील बाजारात मिळतात. पीरियड्सबद्दल जागरुकता वाढली आहे, पण तरीही काही महिला इतर प्रॉडक्ट्स वापरण्यात संकोच बाळगतात.

यासंदर्भात हर जिंदगी या वेबसाईटवर, मदरहूड हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजू गुप्ता यांनी पिरीअड पॅण्टचा वापर, फायदे, वापरण्याची पद्धत, व साफ करण्यासाठी टिप्स. याबाबतीत माहिती दिली आहे(Here Is All You need To Know About Period Panties).

पिरीअड पॅण्ट म्हणजे काय? हे अंडरवेअर घातल्यानंतर पॅडची गरज भासते का?

मासिक पाळीच्या दरम्यान, महिलांना अधिक आराम मिळावा, यासाठी पिरीअड पॅण्टची निर्मिती करण्यात आली आहे. मुळात ती सामान्य पॅण्टीसारखी दिसते, पण त्यात मायक्रोफायबर पॉलिस्टर फॅब्रिक असते. जे योनीतून मासिक पाळीचे रक्त शोषून घेते. ही पॅण्टी घातल्यानंतर सॅनिटरी पॅड्सची गरज कमी भासते. परंतु जर खूप रक्तस्त्राव होत असेल तर, त्यासोबत कापडी पॅडही लावता येईल. हायजिनच्या दृष्टीने अनेक महिला या अंडरवेअरला प्राधान्य देत आहेत.

पिरीअड पॅण्टचे फायदे

पिरीअड पॅण्ट ओलावा शोषण्यात अधिक प्रभावी आहे, यासह इतर संक्रमणाचा धोकाही कमी होतो.

पर्यावरणासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सॅनिटरी पॅड्समुळे कापसाचा देखील अधिक वापर होतो.

हे पॅण्टी स्वच्छ करण्यास खूप सोपे आहे. हे प्रॉडक्ट सुमारे ३ ते ५ वर्ष आरामात टिकू शकतात.

मासिक पाळी दरम्यान, रक्तस्त्रावाची काळजी घ्यावी लागणार नाही, प्रवास करताना याचा अधिक चांगला वापर करता येईल. 

मासिक पाळीतील दुर्गंधीपासून सुटका होते.

टॅम्पन्स वापरताना बर्‍याच स्त्रियांना, टॉक्सिक शॉक सिंड्रोमचा धोका असतो. परंतु पिरीअड पॅण्ट वापरण्याचा कोणताही धोका नाही.

मासिक पाळीच्या चार दिवसात शारीरिक संबंध ठेवावेत का? डॉक्टर सांगतात, आरोग्यसाठी योग्य काय...

पिरीअड पॅण्ट कशा पद्धतीने काम करते?

ज्या महिलांना मासिक पाळीच्या काळात अधिक रक्तस्त्राव होतो, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही अंडरवेअर घातल्यानंतर पॅड लावण्याचीही गरज भासत नाही. तसेच काही महिलांना व्हाईट डिस्चार्ज अथवा युरिन लिकची समस्या असते. ते देखील या प्रॉडक्टचा वापर करू शकतात. ही अंडरवेअर वापरल्यानंतर ओलेपणाचा भास होत नाही.

पिरीअड पॅण्टचा वापर कसा करावा?

पिरीअड पॅण्टमध्ये लिक्विड शोषून घेण्याची अधिक क्षमता असते. त्याच्या आतमधून पॅड लावण्यात आलेले असते. जे स्ट्रिप्सच्या मदतीने टिकून राहाते. पिरियड अंडरवेअरवर मुलायम कापड लावण्यात येते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात योनीमार्गाजवळ रॅशेस होत नाहीत. याचा सामान्य अंडरवेअरप्रमाणेच वापर करता येतो. त्यातून रक्त बाहेर येण्याचा धोकाही राहत नाही.

पिरीअड पॅण्ट किती वेळानंतर बदलावे?

पिरीअड पॅण्ट जास्तीत जास्त १२ तास घालू शकता. त्यात अतिरिक्त प्रतिजैविक थर असते, जे दुर्गंधी शोषून घेते. आपण आपल्या सोयीनुसार फॅब्रिकचा फिट, आकार, निवडू शकता.

मेनस्ट्रुअल कप वापरण्याचे फायदे कोणते? सॅनिटरी नॅपकिन वापरण्यापेक्षा कप वापरणं सोयीचं का असतं?

पिरीअड पॅण्टची स्वच्छता कशी करावी?

पिरीअड पॅण्ट साफ करण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत नाही. सर्वप्रथम, पिरीअड पॅण्ट थंड पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सौम्य डिटर्जंटने धुवून काढा. पिरीअड पॅण्ट वॉशिंग मशीनमध्ये धुवा नका. पॅण्ट धुतल्यानंतर नैसर्गिकरित्या वाळत घाला.

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यमहिलाहेल्थ टिप्स