'मासिक पाळी' हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी येण्याचा काळ हा त्या मुलीच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण विशेष (Why Are Young Girls Getting Their First Periods Early) असा एक टप्पा असतो. साधारणतः एखाद्या मुलीला मासिक पाळी येण्याचे वय हे ११ ते १४ वर्षांच्या दरम्यान असते. परंतु सध्या यात बदल होऊन आजकाल काही मुलींना(6 Surprising Reasons for Early Menarche;) वयाच्या ११ वर्षांच्या आतच मासिक पाळी यायला सुरुवात होते. यालाच 'Early Menarche' म्हणजेच मासिक पाळी लवकर येणे असे म्हटले जाते. अशाप्रकारे मासिक पाळी लवकर आल्याने त्या मुलीमध्ये फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनात्मक परिणाम देखील फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात(Causes Of Early Menarche & Prevention Tips).
अनेकदा मुलींना मासिक पाळी म्हणजे काय? ती कशी, कधी आणि का येते? याबद्दल फारशी माहिती नसते किंवा काहीवेळा अर्धवट माहिती माहित असते. अशा न कळत्या किंवा योग्य समज नसलेल्या वयातच मुलींना मासिक पाळी येऊ लागली तर त्यांना काहीवेळा या सगळ्या गोष्टी समजावणे कठीण होऊन बसते. एवढंच नव्हे तर असा अचानक एकदम मोठा शारीरिक बदल आपल्यात होत आहे हे समजल्यावर त्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. साई पॉलीक्लिनिकच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विभा बन्सल यांनी ओन्ली माय हेल्थला दिलेल्या मुलाखतीनुसार, लहान मुलींमध्ये मासिक पाळी लवकर येण्याची कारणे कोणती? आणि ती रोखण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ते पाहूयात.
लहान मुलींमध्ये कमी वयातच मासिक पाळी येण्याची कारणं ?
१. असंतुलित आहार आणि लठ्ठपणा :- आजकाल लहान मुलं जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि हाय कॅलरीयुक्त आहार जास्त प्रमाणात घेत आहेत, ज्यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. जास्त लठ्ठपणामुळे शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी वाढू शकते, ज्यामुळे लहान मुलींना वयाच्या आधीच मासिक पाळी येऊ शकते.
२. हार्मोनल असंतुलन :- कधीकधी शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळी लवकर येऊ शकते. हार्मोनल असंतुलन हे पर्यावरणीय कारणांमुळे, अनुवांशिक घटकांमुळे किंवा जीवनशैलीतील बदलांमुळ होऊ शकते.
सुटलेली ढेरी आत जात नाही? करा ३ सोपे एक्सरसाइज, जिम - डाएट न करताही पोट होईल सपाट...
३. पर्यावरणीय परिणाम :- आधुनिक जीवनशैली आणि प्लास्टिकमध्ये असलेले बिस्फेनॉल ए (बीपीए) सारखी रसायने, जी प्लास्टिकमध्ये पॅकिंग केलेले अन्नपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांमध्ये आढळतात. ही रसायने आपल्या शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडवू शकतात आणि यामुळे लवकर मासिक पाळी येऊ शकते.
४. ताण आणि मानसिक दबाव :- आजच्या काळातील सततची वाढती स्पर्धा, शिक्षणाचा वाढता दबाव, कुटुंबातील समस्या किंवा सामाजिक ताणतणाव यांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण हा आपल्या शरीरातील हायपोथालेमस ग्रंथीवर परिणाम करतो, जो हार्मोनल बदल ही मासिक पाळी नियंत्रित करते, यामुळे देखील लवकर मासिक पाळी येऊ शकते.
मासिक पाळीत खूप जास्त व्यायाम करताय? थांबा, वजन कमी करण्याच्या नादात...
५. अनुवांशिक कारणे :- जर कुटुंबातील कोणत्याही महिलेला लवकर मासिक पाळी आली असेल, तर ही समस्या पुढच्या पिढीतील मुलींमध्येही दिसून येते. मासिक पाळी लवकर येण्यामध्ये अनुवांशिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.
६. शारीरिक हालचालींचा अभाव :- आजकाल मुले शारीरिक हालचालींमध्ये कमी भाग घेतात आणि बहुतेक वेळ हा मोबाईल, टीव्ही आणि संगणकासमोर घालवतात. शारीरिक हालचालींचा अभाव चयापचय दर कमी करतो आणि लठ्ठपणा वाढवतो, ज्यामुळे मासिक पाळी लवकर येऊ शकते.
कमी वयातच लवकर मासिक पाळी येऊ नये म्ह्णून...
१. मुलींना संतुलित आणि पौष्टिक आहार देणे खूप महत्वाचे आहे. त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या, फळे, सुकामेवा, प्रथिनेयुक्त पदार्थ आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
२. मुलांना खेळ आणि शारीरिक व्यायामात भाग घेण्यास प्रोत्साहित करा. नियमित व्यायाम केल्याने हार्मोन्स संतुलित राहतात आणि लठ्ठपणा नियंत्रित राहतो. योग आणि ध्यानधारणा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास देखील मदत करू शकते.
३. मुलांना प्लास्टिकच्या बाटल्या आणि पॅकिंग केलेले अन्न[पदार्थ खायला देऊ नये. याउलट,ताजे आणि घरगुती अन्नपदार्थ तसेच ऑरगॅनिक पदार्थ खायला द्यावेत. याचबरोबर ते रसायनयुक्त अन्नपदार्थ खात नाहीत ना याची खात्री करुन पाहावी.
४. अभ्यासामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे मुलांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला, सकारात्मक वातावरण निर्माण करा आणि त्यांना पुरेशी विश्रांती घेऊ द्या.