Join us

मासिक पाळीच्या दिवसात प्रचंड मूड स्विंग्ज का होतात? सतत रडू येतं, चिडचिड होते ती कशाने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2023 18:23 IST

Mood Swings on Periods मासिक पाळीदरम्यान, मुड स्विंग होणे नॉर्मल असले तरी वारंवार हा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मासिक पाळी येण्यापूर्वी अनेकदा मूड स्विंग्ज होतात. काही कारण नसताना मूड खराब होतो. चिडचिड होते. रडू येतं. कामात मन लागत नाही. हे सारे नक्की कशाने होते? मासिक पाळी, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती दरम्यान होणाऱ्या  हार्मोनल चढउतारांमुळे देखील महिलांमध्ये मूड स्विंग होऊ शकतो. ९०% पेक्षा जास्त स्त्रियांना मासिक पाळीच्या आधी प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमचे (PMS) लक्षणे दिसतात, ज्यामध्ये मूड बदलण्याचा देखील समावेश आहे.

जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ निसर्गोपचार डॉ श्रीविद्या नंदकुमार यांच्या म्हणण्यानुसार, "अनेक स्त्रियांच्या बाबतीत असे घडताना दिसून येते, की त्यांचे मुड कालांतराने अचानक बदलते. इच्छा नसतानाही ते थोडेसे चिडखोर, यासह उदास राहतात. या वागण्याला मूड स्विंग्स असे म्हटले जाते. जर मूड स्विंग खूप जास्त होत असेल तर, त्याचा मानसिक परिणाम व्यक्तीवर होऊ शकतो, अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक."

मुड स्विंग दरम्यान काय करावे?

कॅफिनयुक्त पेय टाळा

अल्कोहोल, कॅफिन आणि साखरयुक्त पेय आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवू शकतात. ज्यामुळे अंडाशयांच्या कार्यावर परिणाम होतो. मासिक पाळी दरम्यान, तहान लागल्यास साधे पाणी किंवा नारळाचे पाणी प्या. एनर्जी हवी असेल तर ग्रीन टी प्या. याने पोटाला काहीसा आराम मिळतो यासह एनर्जेटिक देखील वाटते.

धूम्रपान सोडणे

तंबाखूमुळे अनेक हार्मोन्सवर वाईट परिणाम होतात. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तंबाखूच्या वापरामुळे थायरॉईडची पातळी बिघडते, पिट्यूटरी संप्रेरक उत्तेजित होते आणि कोर्टिसोल वाढते, ज्यामुळे स्त्रियांमधील अधिक मूड बदलू लागतो. धूम्रपाणामुळे कॅन्सरचा धोका वाढतो, त्यामुळे वेळीच सोडणे उत्तम ठरेल.

तणावाखाली जगू नका

अनेकदा आपण तणावाखाली राहून आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, बाहेरील प्रक्रिया केलेले पदार्थ खातो आणि पुरेशी झोप घेत नाही. ज्याने तणाव आणखी वाढतो, याचा थेट आपल्या मनावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते आणि आपली चिडचिड होऊ लागते. मन स्थिर ठेवण्यासाठी दुसरीकडे वळवा. विविध ॲक्टिविटी करा.

आवडीचे काम करा

मासिक पाळीमध्ये मेंदूला चांगल्या गोष्टीकडे परावर्तित करा. यासाठी आवडीच्या गोष्टी, छंदाला वेळ द्या. जसे लिखाण, पेंटिंग, गाणे गा किंवा आवडीच्या कामात स्वतःला वेळ द्या. यामुळे आपल्याला आनंद आणि समाधान मिळेल आणि तुमचा मूडही चांगला होईल. विश्रांतीचा मूडवर सकारात्मक प्रभाव पडतो. तुम्ही श्वासोच्छवासाचे व्यायाम, योगासने किंवा मसाज करून स्वतःला आराम देऊ शकता.

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यमहिलाहेल्थ टिप्सआरोग्य