मासिक पाळी ही महिलांचे आरोग्य दर्शवते. जर ती नियमितपणे येत असेल तर आरोग्य काही प्रमाणात उत्तम समजले जाते. (Causes of delayed periods in women) परंतु, मासिक पाळीदरम्यान काही अडचणी येत असतील तर त्याविषयी डॉक्टरांचा सल्ला आपल्याला घ्यावा लागतो.(Is a delayed period a sign of pregnancy) मासिक पाळीतील ४ ते ५ दिवस महिलांसाठी फार महत्त्वाचे असतात. या काळात पोटदुखी, क्रॅम्प्स आणि अतिरक्तस्त्राव किंवा रक्ताच्या गाठी यांसारख्या समस्या उद्भवतात. (Period delay and pregnancy symptoms) अनेकदा महिलांना PCOS, PCOD सारख्या समस्या असल्याने मासिक पाळी वेळेवर येत नाही. (Health problems that affect your menstrual cycle) अनेकदा मासिक पाळीची तारीख चुकल्यानंतर स्त्रियांना वाटते की, गर्भधारणा झाली आहे. परंतु, २-३ ते महिन्याचा काळ उलटून गेल्यानंतरही प्रेग्नेंसी नसेल तर इतर काही कारणांमुळे मासिक पाळीचे चक्र बिघडते. (When to worry about a late period) वजनात बदल होणे, हार्मोनल अनियमितता आणि रजोनिवृत्ती सारख्या समस्या देखील असतात. परंतु, ही समस्या सतत होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. महिलांमध्ये मासिक पाळी उशीरा येण्याची कारणे कोणती जाणून घेऊया. (How stress affects your period cycle)
1. थायरॉईड
थायरॉईडमुळे मासिक पाळी वेळेवर येण्यात अडचणी येतात. यात असणारे संप्रेरकांचे प्रमाण जास्त किंवा कमी झाल्यास मासिक पाळीचे चक्र बिघडते. थायरॉईडच्या आजारामुळे महिलांना वेळेवर पाळी येत नाही. तसेच पाळी अधिक काळ थांबवून ठेवली जाते. ज्याला अमेनोरिया असेही म्हणतात.
2. उच्च प्रोलॅक्टिन पातळी
आपल्या मेंदूतील पिट्यूटरी ग्रंथीमधून प्रोलॅक्टिन हार्मोन स्त्रावित होतो. हा हार्मोन्स स्तनपान, स्तनाच्या ऊतींचा विकास आणि बाळाला दूध मिळण्यासाठी प्रोत्साहित करतो. परंतु रक्तातील प्रोलॅक्टिनची पातळी वाढल्यास मासिक पाळी वेळेवर येत नाही. सतत घेतली जाणारी औषधे, संसर्ग आणि तणाव यामुळे प्रोलॅक्टिनची पातळी वाढते.
3. रक्ताची कमतरता
शरीरात रक्ताची कमतरता झाल्यावर एंडोमेट्रियच्या वाढीवर परिणाम होतो. यामुळे मासिक पाळीचे चक्र बिघडते. शरीरात रक्ताची, लोहाची कमतरता झाल्यास मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या समस्या होतात. जर दोन ते तीन महिने मासिक पाळी आली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
4. अति लठ्ठपणा
जास्त वजन किंवा लठ्ठपणा हा आपल्या मासिक पाळीवर परिणाम करु शकतो. जर वजन जास्त असेल तर शरीरात जास्त प्रमाणात इस्ट्रोजन तयार होऊ शकते. हे महिलांमधील प्रजनन क्षमतेच्या नियमन करणाऱ्या संप्रेरकांपैकी एक आहे. त्याची वाढ झाल्यास मासिक पाळीवर थेट परिणाम होतो. यासाठी शरीराला पुरेसे पोषक तत्व न मिळणे हे देखील असते. शरीरात खूप बदल झाले तर मासिक पाळीवर परिणाम होतो.
5. ताण किंवा संसर्ग
आपल्या कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम आपल्या मासिक पाळीवर होतो. परंतु, ताप आल्यावर UTI मुळे मासिक पाळीत विलंब होऊ शकतो. यूटीआयमुळे शरीरावर येणारा ताण मासिक पाळीवर परिणाम करु शकतो. जर आपण अधिकचा ताण घेतला तर शरीरातील कॉर्टिसोलचे उत्पादन वाढते. यामुळे मासिक पाळीत विलंब होतो.