कोणत्याही महिलेचं आरोग्य तिच्या मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) चक्रावर अवलंबून असतं. ज्याचे संतुलन तिच्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीशी संबंधित समस्या वेगवेगळ्या असतात (Periods). काहींना यादरम्यान, पोटदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, यासह इतर समस्या निर्माण होतात (Healthy Lifestyle).
मुख्य म्हणजे बिघडलेल्या जीवनशैलीमुळेही मासिक पाळीमध्ये अनियमितता किंवा रक्तस्त्राव कमी होण्याची समस्या निर्माण होते. यासाठी आपण ५ सवयी सोडायला हवेत. त्या नक्की कोणत्या सवयी आहेत, याची माहिती आयुर्वेदिक डॉक्टर वरलक्ष्मी यनमंद्र यांनी दिली आहे(Why Your Periods Aren't Coming Regularly (for Teens)).
कोणत्या सवयींमुळे मासिक पाळी अनियमित होते?
उपवास करणे
उपवास आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, परंतु आयुर्वेदानुसार दीर्घकाळ उपवास केल्यास शरीराला हानी पोहोचते. यामुळे वात दोष वाढू शकतो. या असंतुलनामुळे शरीरात बरेच बदल घडतात. हार्मोनल संतुलनासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात उर्जेची आवश्यकता असते, त्यामुळे जास्त वेळ अन्न न खाल्ल्याने शरीरात बदल घडतात आणि याचा फटका मासिक पाळीला होतो.
कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय
अधिक व्यायाम करणे
अतिव्यायाम प्राण वायुमध्ये व्यत्यय आणू शकतो आणि हायपोथालेमिक-पिट्यूटरी-ओव्हेरियनवर परिणाम होऊ शकतो. जे प्रजनन हार्मोनला कंट्रोल करतात. यासह शारीरिक तणाव वाढल्यामुळेही महिलांना अनियमित मासिक पाळीचा सामना करावा लागतो.
वेट लॉस फुड्स
वेट लॉस फुड्समध्ये कॅलरीजचे प्रमाण फार कमी असतात. ज्यामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे उत्पादनमध्ये व्यत्यय येऊ शकते. ज्यामुळे अनियमित मासिक पाळी होऊ शकते.
चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल
क्रोनिक स्ट्रेस
तणावाची पातळी वाढल्याने महिलांच्या शरीरात कोर्टिसोल वाढते, जे प्रजनन हार्मोनवर परिणाम करून, मासिक पाळीचं चक्र बिघडवू शकतात.
झोपचं चक्र बिघडणे
कमी झोप किंवा झोपेचा अभाव, यामुळे मेलाटोनिन आणि कॉर्टिसॉलसह शरीराच्या हार्मोनल संतुलनावर परिणाम होतो. त्यामुळे झोपेचं चक्र बिघडल्याने मासिक पाळीमध्ये अनियमितता येते.