Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखतं, असह्य वेदना होतात? ५ आसनं रोज करा, पाळीचा त्रास कमी..

मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखतं, असह्य वेदना होतात? ५ आसनं रोज करा, पाळीचा त्रास कमी..

5 Best Yoga Poses To Soothe Your Period Cramps: मासिक पाळीच्या चार दिवसात अनेकींना पोटदुखण्याचा, पोटरीत गोळे येण्याचा त्रास होतो त्यावर हा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2023 06:36 PM2023-03-25T18:36:09+5:302023-03-25T18:57:08+5:30

5 Best Yoga Poses To Soothe Your Period Cramps: मासिक पाळीच्या चार दिवसात अनेकींना पोटदुखण्याचा, पोटरीत गोळे येण्याचा त्रास होतो त्यावर हा उपाय...

Yoga Poses For Menstrual Cramps, 5 Positions For Natural Pain Relief | मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखतं, असह्य वेदना होतात? ५ आसनं रोज करा, पाळीचा त्रास कमी..

मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखतं, असह्य वेदना होतात? ५ आसनं रोज करा, पाळीचा त्रास कमी..

मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. मुलगी वयात आली की तिला मासिक पाळी सुरु होते. दर महिन्यात चार ते पाच दिवस मासिक पाळीचा रक्तस्त्राव होतो. बहुतेक महिलांसाठी हा काळ खूपच त्रासदायक असतो. काहीजणींना या मासिक पाळीचा खूप त्रास होतो तर काहींना अजिबात वेदना होत नाहीत. काही महिलांना पोटात दुखणे, क्रॅम्प्स, मूड स्विंग आणि ब्लोटिंग अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण ही एक नैसर्गिक आणि गरजेची प्रक्रिया असून मासिक पाळी येणं ही चांगली गोष्ट मानली जाते.

परंतु मासिक पाळीदरम्यान पोटात दुखून येणारे क्रॅम्प्स यामुळे जीव नकोसा होतो. अशावेळी काही स्त्रिया पोटात दुखणे किंवा येणारे क्रॅम्प्स थांबवण्यासाठी काही गोळ्या घेतात. या गोळ्या खाणे शरीरासाठी हानीकारक ठरु शकते. म्हणूनच मासिक पाळीच्या दरम्यान पोटात दुखणे किंवा क्रॅम्प्स येणे यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही सोपे योगा प्रकार समजून घेऊ(Yoga Poses For Menstrual Cramps, 5 Positions For Natural Pain Relief).     

नक्की कोणती आसन करावीत ?

१. बालासन (Child's Pose) :- बालासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनाची अवस्था घेऊन योगा मॅटवर किंवा सतरंजीवर बसा. त्यानंतर पायाचे तळवे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करा. गुडघे शक्य होतील तेवढे एकमेकांपासून दूर करा. आता कंबरेतून खाली वाका आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये तुमचे पोट, छाती असेल, अशा पद्धतीने शरीराची अवस्था घ्या. डोके खाली जमिनीवर टेकवा आणि हात समोरच्या बाजूने सरळ रेषेत पसरवा.

२. तितली आसन (Butterfly Pose) :- दोन्ही पाय समोर ठेवून बसा. पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना चिकटतील असे ठेवा. हात गुडघ्यावर ठेवून गुडघे वरच्या बाजूला उचला. त्यानंतर गुडघे खाली घेऊन जा आणि जमिनीला पायांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे चार-पाच वेळा करा. यानंतर हातांनी पायांचे तळवे पकडा. आता गुडघे वेगानं वर-खाली करत राहा. म्हणजे फुलपाखरांचे पंख जसे वर-खाली होत असतात तसेच. श्वासोच्छ्वासाची गती सामान्य ठेवत आठ ते दहा वेळा ही क्रिया करा.

३. जनू शीर्षासन (Head To Knee Pose) :- पाठीचा कणा ताठ ठेऊन दोन्ही पाय समोर लांब सोडून जमिनीवर बसून घ्या. आत्ता डावा पाय घडी करून उजव्या मांडीजवळ ठेवावे, डावी मांडी जमिनीला चिकटून ठेवावी. श्वास आंत घेत दोन्ही हात डोक्यावर घेऊन वर ताठ करावेत. शरीर कंबरेतून थोडेसे उजवीकडे वळवून घ्यावे. श्वास सोडत कणा ताठ ठेवत हनुवटी पावलांकडे करत कंबरेतून पुढे वाकावे. शक्य असल्यास पायची पावले हाताने पकडत हाताचे कोपर जमिनीवर चिकटून ठेवत पायावर खाली वाका. अंतिम स्थितीत दीर्घ श्वसन घेत स्थिर रहा. त्यानंतर श्वास घेत वर उठा आता श्वास सोडत हात बाजूला खाली घ्यावेत. आता उजवा पाय घेऊन हे आसन परत करावे. 

४. आनंद बालासन (Happy Baby Pose) :- योगा मॅटवर सरळ रेषेत पाठ जमिनीला चिकटवून झोपून घ्यावे. श्वास आत घेत आपले दोन्ही पाय वर उचला. दोन्ही पाय आकाशाच्या दिशेनं सरळ स्थितीत असावे. गुडघ्यांमध्ये पाय मोडू नका. आता आपल्या दोन्ही हातांनी पायांची बोटे पकडा. आपल्या क्षमतेनुसारच हे आसन करावे. आपले कोपर आणि गुडघे छातीजवळ आणावे आणि पाय किंचितसे दूर आकाशाकडे वर न्यावेत. आपली हनुवटी छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करा, पण डोके आणि कंबर जमिनीवरच राहील याची काळजी घ्यावी.

५. सुप्त बंध कोनासन (Reclining Bound Angle Pose) :- तुमचे पाय तुमच्या समोर पसरवून जमिनीवर बसून या आसनाला सुरुवात करावी. आता तुमच्या पायाचे तळवे आपल्या ,मांड्यांच्या बाजूला आता एकत्र आणा आणि तुमचे गुडघे बाहेरच्या बाजूला खाली येऊ द्या. तुमचे तळवे एकमेकांना चिकटवून आणि गुडघे खाली जमिनीला चिकटवून ठेवून तुमचे शरीर हळूहळू तुमच्या पाठीवर मागे नेऊन खाली झोपा. आपले हात आपल्या बाजूला बाहेरच्या दिशेने पसरवून ठेवा आणि हातांचे तळवे वरच्या बाजूला तोंड करुन ठेवा. आता आपले संपूर्ण शरीर आरामाच्या अवस्थेत असताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.

 

Web Title: Yoga Poses For Menstrual Cramps, 5 Positions For Natural Pain Relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.