Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीदरम्यान ४ त्रास कायम होतात? वाचा तज्ज्ञांचा सल्ला, तब्येतीकडे दुर्लक्ष धोक्याचे

मासिक पाळीदरम्यान ४ त्रास कायम होतात? वाचा तज्ज्ञांचा सल्ला, तब्येतीकडे दुर्लक्ष धोक्याचे

Menstrual Health: मासिक पाळीमध्ये प्रत्येकीला थोडा- फार त्रास होतच असतो. पण या काळात जाणवणाऱ्या या काही आरोग्य समस्यांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2022 08:38 AM2022-10-30T08:38:09+5:302022-10-30T08:40:02+5:30

Menstrual Health: मासिक पाळीमध्ये प्रत्येकीला थोडा- फार त्रास होतच असतो. पण या काळात जाणवणाऱ्या या काही आरोग्य समस्यांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

You should not ignore these 4 health issues during menstrual periods | मासिक पाळीदरम्यान ४ त्रास कायम होतात? वाचा तज्ज्ञांचा सल्ला, तब्येतीकडे दुर्लक्ष धोक्याचे

मासिक पाळीदरम्यान ४ त्रास कायम होतात? वाचा तज्ज्ञांचा सल्ला, तब्येतीकडे दुर्लक्ष धोक्याचे

Highlights मासिक पाळीदरम्यान थोड्या- फार प्रमाणात होणारा त्रास समजण्यासारखा आहे. पण या वेदनांची तिव्रता मात्र खूपच जास्त असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे

मासिक पाळी ( menstrual periods) हा अनेकींसाठी खरोखरच त्रासदायक विषय असतो. कुणाला या काळात खूपच ब्लिडिंग (heavy bleeding during menstruation) होतं, तर कुणाचं खूपच जास्त पोट दुखतं. कुणाच्या पायात गोळे येतात तर कुणाला खूपच उलट्या आणि मळमळ असा त्रास होतो. काही जणींना हा त्रास सहन होतो, तर काही जणींसाठी या वेदना असह्य असतात. मासिक पाळीदरम्यान थोड्या- फार प्रमाणात होणारा त्रास समजण्यासारखा आहे. पण या वेदनांची तिव्रता मात्र खूपच जास्त असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे (Don't ignore these 4 health issues during periods), असं भोपाळ येथील जेपी हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुधा अस्थाना यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना सांगितलं. 

 

मासिक पाळीदरम्यान असा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
१. खूप ब्लिडिंग होणे

मासिक पाळीदरम्यान जर कुणाला ७- ८ दिवस रक्तस्त्राव होत असेल, तर ते धोकादायक आहे. किंवा ५ दिवसच ब्लिडिंग होते, पण दिवसाला ४- ५ पॅड बदलावे लागतात, असा त्रास असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण यामुळे ब्लड लॉस होऊन आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

 

२. पाळीची अनियमितता
मासिक पाळीचे चक्र नियमित असणं हे उत्तम आरोग्याचं एक लक्षण आहे. बऱ्याच जणींना त्यांची पुढची पाळी कधी येणार याचा बरोबर अंदाज येतो. पण काही जणींना मात्र असा अंदाज घेताच येत नाही कारण त्यांची पाळी कधी लांबते तर कधी लवकर येते. पाळीची अनियमितताही धोकादायक ठरू शकते.

 

३. कमालीचे मूडस्विंग
मासिक पाळीच्या आधी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरॉन estrogen and progesterone हार्मोन्सच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे मुडस्विंगचा त्रास अनेकींना होतो. पण हा त्रास खूपच जास्त असेल आणि स्वत:वर नियंत्रण ठेवणे, अगदीच अशक्य असेल, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

पाहिलाय असा जादुचा ड्रेस? उन्हात गेलं की एकदम बदलतो रंग, दिसतो कमाल.. बघा व्हायरल व्हिडिओ

४. खूप जास्त पोटदुखी
पाळीदरम्यान पोटदुखीचा त्रास सगळ्यांनाच होतो. पण या काळात रोजच किंवा सुरुवातीचे तिन्ही दिवस जर दोन- तीन पेन किलर घ्याव्या लागत असतील, तर ते आरोग्याच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. 

 

Web Title: You should not ignore these 4 health issues during menstrual periods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.