Join us  

Mucormycosis : तुमच्या घरातही लपलेला असू शकतो जीवघेणा ब्लॅक फंगस; वेळीच बचावासाठी अशी 'घ्या' काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 11:47 AM

Mucormycosis The black fungus : घरात असलेल्या  ब्लॅक फंगसला कसे ओळखाचे. या संक्रमणापासून कसा बचाव करायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ठळक मुद्दे स्वयंपाकघरात जास्त दिवस ठेवलेले ब्रेड किंवा सडलेली फळे, भाज्या हे देखिल ब्लॅक फंगसचे कारण ठरू शकते.  म्हणून, या सर्व गोष्टी पूर्णपणे स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगसचे संक्रमण वेगानं पसरत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या फंगसला न घाबरता सावध राहण्याची गरज आहे. कारण हा आजार काही नवीन नाही. ब्लॅक फंगसनं याआधीसुद्धा लोकांना संक्रमित केलं होतं. सध्या या आजराच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण ब्लॅक फंगसप्रमाणे काही बुरशीजन्य घटक तुमच्या घरातही लपलेले असू शकतात.

१) घरात असलेल्या  ब्लॅक फंगसला कसे ओळखाचे. या संक्रमणापासून कसा बचाव करायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. संक्रमणापासून बचावासाठी  कोणती सावधगिरी बाळगायची हे  लक्षात घेणं गरजेचं आहे.  चाइल्डकेयर हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. राजन गांधी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

२) तज्ञ म्हणतात की ब्लॅक फंगस आर्द्र ठिकाणी वेगाने पसरते. हे बहुतेक घराच्या आतील ओलसर भिंतींवर लागू होते आणि भिंतीवर बुरशीचे वावर होण्यापूर्वी ओलसरपणाचा वास सुरू होतो. म्हणून लक्षात ठेवा, घराच्या भिंती वारंवार स्वच्छ करत राहा. घाण साचू देऊ नका. 

३) घराच्या स्वयंपाकघरात जास्त दिवस ठेवलेले ब्रेड किंवा सडलेली फळे, भाज्या हे देखिल ब्लॅक फंगसचे कारण ठरू शकते.  म्हणून, या सर्व गोष्टी पूर्णपणे स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे. भाज्या धुतल्यानंतरच वापरा आणि खराब होत असलेल्या भाज्या लगेच फेकून द्या.

४) तज्ञ म्हणतात की ब्लॅक फंगसचे प्रमाण आर्द्रतेत वेगाने पसरते. म्हणून लक्षात ठेवा, घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडा आणि ताजी हवा आत येऊ द्या आणि घराच्या आत उपस्थित आर्द्र हवा बाहेर काढण्यासाठी क्रॉस वेंटिलेशन वापरा. याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फर्निचर वगैरे भिंतीजवळ न ठेवणे.

५)  जर आपण घरात उपस्थित कोणत्याही प्रकारच्या बुरशीचा शोध घेत असाल तर मग मास्क आणि ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे आणि शक्य असल्यास सेफ्टी गॉगल देखील वापरा. ब्लॅक फंगसचे परीक्षण करताना मास्क, ग्लोव्हज आणि सेफ्टी गॉग्लस पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. लक्षात घ्या की घराच्या भिंतींवर किंवा इतरत्र फारच बुरशीचे वातावरण असल्यास, ते काढण्यासाठी एखाद्या प्रोफेशनल व्यक्तींची मदत घ्या.

बचावाचे उपाय

धूळ असलेल्या ठिकाणी मास्कचा वापर करा

माती, धूळ अशा ठिकाणी जाताना पायात बुट, सॉक्स, पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घाला.वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष द्या. 

डायबिटीस कंट्रोल, इम्यूनोमॉड्यूलेटिंग ड्रग किंवा स्टेरॉयड्सचा कमीत कमी वापर करून तुम्ही याआजारापासून लांब राहू शकता.

ब्लॅक फंगसची लक्षणं

ब्लॅक फंगसच्या लक्षणांबाबत प्रत्येकालाच माहित असायला हवी. वेळीच उपचार केल्यास या आजारपासून सुटका मिळवता येऊ शकते. जीभ आणि हिरड्यांमध्ये त्रास होणं, तोंडाला सूज येणं, सर्दीमुळे नाक गळणं, डोळे जड झाल्याप्रमाणे वाटणं, डोकेदुखी, दृष्टी कमी होणं

घाणेरड्या मास्कमुळे पसरू शकतो ब्लॅक फंगस

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क घातला जातो. मात्र याच मास्कमुळे ब्लॅक फंगसचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेस मास्कच्या माध्यमातूनही ब्लॅक फंगसचा धोका आहे. ब्लॅक फंगस डोळ्यांमधून प्रवेश करत नाही. तो नाकावाटे शरीरात जातो. तिथून तो डोळ्यांवर, मेंदूंवर परिणाम करतो, अशी माहिती मॅक्स हेल्थकेअरच्या औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. निशेष जैन यांनी दिली.

ब्लॅक फंगस नाकावाटे पुढे सरकतो. डोळे, मेंदूवर आघात करत असल्यानं तो जीवघेणा ठरतो. ब्लॅक फंगस नाकावाटे प्रवेश करत असल्यानं मास्कबद्दल संशय व्यक्त होत आहे. एकच मास्क बरेच दिवस वापरणं ब्लॅक फंगसला निमंत्रण ठरू शकतं, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. एकच मास्क बरेच दिवस स्वच्छ न करता वापरल्यास त्यात फंगस तयार होतं. ही बुरशी अतिशय सूक्ष्म असल्यानं ती डोळ्यांना दिसत नाही. त्यासाठी मायक्रोस्कोपची आवश्यकता असते, असं डॉ. जैन यांनी सांगितलं.

टॅग्स :म्युकोरमायकोसिसहेल्थ टिप्सआरोग्यकोरोना वायरस बातम्या