वाढत्या कोरोनाच्या प्रसारात आता काळ्या बुरशीनंतर पांढऱ्या बुरशीचा आजार वेगाने पसरत आहे. हा आजार काळ्या बुरशी पेक्षा जास्त जीवघेणा असल्याचं समोर आला आहे. साधारणपणे काळ्या बुरशीच्या आजारात व्यक्तीच्या अवयवांचे गंभीर नुकसान होते. संक्रमणाची तीव्रता वाढल्यास अवयव काढावे लागू शकतात किंवा मृत्यूचा सामना करावा लागू शकतो.
पांढरी बुरशी या विषयाबाबत स्किनफाईन क्लिनिकचे विशेषज्ज्ञ डॉक्टर अभिनव सिंह यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ''पांढऱ्या बुरशीला वैद्यकिय परिभाषेत Candidiasis असं म्हणतात. साधारणपणे सगळ्यांच्या शरीरात अशा प्रकारची बुरशी असते. पण ज्यावेळी इम्यूनिटी कमकुवत होते तेव्हा या आजारानं लोक प्रभावित होतात. काळ्या बुरशीच्या तुलनेत पांढरी बुरशी शरीरात वेगानं वाढते. ''
मेदांता रुग्णालयातील चेस्ट सर्जन डॉक्टर अरविंद कुमार यांच्या म्हणण्यानुसार पांढरी बुरशी आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करते. पांढर्या बुरशीपेक्षा काळी बुरशी अधिक धोकादायक आहे. कारण काळ्या बुरशीचा वेगाने शरीराच्या इतर भागावर परिणाम होतो. परंतु पांढऱ्या बुरशीचा असा प्रभाव पडत नाही. अशा परिस्थितीत काळ्या बुरशीचे प्रमाण अधिक घातक असते. कारण काळ्या बुरशीचा हा बुरशीचा प्रकार हा एक आक्रमक प्रकार आहे आणि तो लोकांना फार लवकर वेढून घेतो आणि बहुतेक औषधे त्यावर कार्य करत नाहीत. त्यावर फक्त अॅम्फोटोरसिन काम करते.
त्वचेवर पांढरी बुरशी कसा परिणाम करते?
डॉक्टर अभिनव म्हणतात की जर आपण त्वचेबद्दल बोलाल तर त्याचा तोंडाच्या भागावर जास्त परिणाम होतो. त्याच वेळी, शरीराचा असा भाग जेथे ओलावा असतो, तिथे जास्त संसर्ग होण्याची शक्यता असते.
फुफ्फुसांवर काय परिणाम होतो?
पांढरी बुरशी श्वासांच्या माध्यमातून फुफ्फुसांना संक्रमित करते. त्यामुळे रुग्णांना निमोनियाच्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो. फुफ्फुसात बुरशीचे गोळे तयार होऊ शकतात. अशा पद्धतीनं पांढरी बुरशी फुफ्फुसांमध्ये पसरते.
हा आजार का धोकादायक आहे?
डॉक्टर अभिनव म्हणतात की लोक पांढरी बुरशी अधिक धोकादायक म्हणत आहेत. कारण ते ओळखणं थोडं आहे. इतर बुरशीजन्य संसर्गांमुळे वेगवान ताप येतो, जे ओळखणे सोपे आहे. परंतु पांढऱ्या बुरशीत अशी लक्षणं जाणवतात जी दिसून येत नाहीत. म्हणूनच, त्याचे उपचार थोडं उशीरा सुरू होतात. अनेकदा उपचार सुरू होईपर्यंत संक्रमण वाढण्याची शक्यता असते.
पांढऱ्या बुरशीची लक्षणं
खोकला येणं
ताप येणं
श्वास घ्यायला त्रास होणं
निमोनिया
कारणं
शरीरावर ओलसरपणा असणं
रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असणं
स्टेरॉईड्सचा जास्त प्रमाणात वापर
डायबिटीसचा आजार असणं
दीर्घकाळ एंटीबायोटिक्सचा वापर
ब्लड कल्चर टेस्ट, कफची फंगल कल्चर टेस्ट, त्वचेवरील KOH फंगस असणं या मार्गांनी या बुरशीची चाचणी केली जाते. पांढऱ्या बुरशीच्या बाबतीत, रुग्णाला अँटी-फंगस औषधांचे डोस दिले जातात. हा डोस वेळेवर रुग्णांना देणे फार महत्वाचे आहे. जर अॅन्टीफंगल डोस वेळेत न दिला तर ते देखील प्राणघातक ठरू शकते. शरीरात पांढर्या बुरशीचे प्रमाण वाढण्यामुळे फूड पाईपवर परिणाम होतो. डॉ. अभिनव सिंह स्पष्ट करतात की जेव्हा आपल्या रक्तामध्ये त्याचा परिणाम होतो तेव्हा त्याचा मेंदू आणि मूत्रपिंडावरही परिणाम होतो. इतकेच नाही तर फुफ्फुसांमध्येही संसर्ग होऊ शकतो.
असा करा बचाव
शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवा
दीर्घकाळ एंटीबायोटिक्सचा वापर करू नका
स्टेरॉईड्सचे कमीत कमी, गरज असेल तरच सेवन करा.
चांगला आहार घेऊन नेहमीच डायबिटीस नियंत्रणात ठेवा
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, लक्षणं दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.