Lokmat Sakhi >Health > वाढलेलं युरीक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर सांगतात ४ सोपे उपाय, युरीन-किडनीच्या समस्या होतील दूर

वाढलेलं युरीक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर सांगतात ४ सोपे उपाय, युरीन-किडनीच्या समस्या होतील दूर

natural ways to control or reduce uric acid : वैद्यकीय उपचार सुरू करण्याआधी युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात याविषयी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2024 05:35 PM2024-10-20T17:35:37+5:302024-10-20T18:29:12+5:30

natural ways to control or reduce uric acid : वैद्यकीय उपचार सुरू करण्याआधी युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात याविषयी..

natural ways to control or reduce uric acid : 4 Simple Remedies to Control High Uric Acid Levels, Urine-Kidney Problems Get Rid of | वाढलेलं युरीक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर सांगतात ४ सोपे उपाय, युरीन-किडनीच्या समस्या होतील दूर

वाढलेलं युरीक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर सांगतात ४ सोपे उपाय, युरीन-किडनीच्या समस्या होतील दूर

आपल्याला एकाएकी सांधेदुखी, थकवा, पाठदुखी असे त्रास उद्भवतात. याशिवाय वारंवार मूत्रविसर्जनास जावे लागणे, मुतखडा अशाही समस्या भेडसावतात. शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याची ही महत्त्वाची लक्षणे असू शकतात. मात्र आपल्याला ते लक्षात येत नाही आणि आपण काहीतरी घरगुती उपाय करुन या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत राहतो. मात्र समस्या जास्तच वाढली तर रक्ततपासणीतून  युरीक ॲसिडचे प्रमाण नेहमीच्या पातळीपेक्षा वाढल्याचे समजते. किडनीच्या कार्यात अडथळे आल्यास रक्तातील युरिक ॲसिडची पातळी वाढायला लागते. युरीक ॲसिड वाढण्यामागे बरीच कारणे असतात (natural ways to control or reduce uric acid). 

(Image : Google)
(Image : Google)

पण काही वेळा मांसाहारी पदार्थ, मद्य, तसेच काही भाज्यांचे अतिसेवन ही महत्त्वाची कारणे ठरु शकतात. पालक, मशरूम, फ्लॉवर अशा काही अन्नपदार्थांमध्ये 'प्युरीन' नावाचा घटक असतो. याशिवाय काही फळांमध्येही प्युरीन्स आढळतात. शरीराकडून प्युरीन्स पचवले जात असताना तयार होणारा टाकाऊ पदार्थ म्हणजे युरिक ॲसिड. हे युरिक ॲसिड वेळोवेळी किडनीद्वारे शरीराबाहेर फेकले जाते, शरीरामध्ये ही प्रक्रिया नियमितपणे घडत असते. प्युरीन्सचा समावेश असलेले घटक जेव्हा अधिक प्रमाणात सेवन केले जातात तेव्हा ही युरिक ॲसिडची पातळी वाढते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते. पण लगेचच वैद्यकीय उपचार सुरू करण्याआधी युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. डॉ. स्मिता भोईर-पाटील यांनी हे उपाय सांगितले असून ते कोणते पाहूया...

उपाय काय ?

१. लिंबू पाण्याच्या सेवनाने वाढलेले युरीक ॲसिड नियंत्रणात येऊ शकते. लिंबू पाण्यातील सिट्रिक ॲसिडची प्रक्रिया होऊन युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रणात राहते.

(Image : Google)
(Image : Google)

२. ॲपल सायडर व्हिनेगरमधील ॲसिटिक ॲसिड युरिक ॲसिडला शरीराबाहेर फेकायला मदत करते. एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घालून नियमित प्यायल्यास पातळी कमी होण्यास फायदा होतो.  

३. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त उपयोग करायला हवा. भाज्या, सॅलेड, सुकामेवा यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, नियमितपणे हे सगळे आहारात घेतले तर युरीक ॲसिडची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

४. आपण सतत चहा पितो, त्याऐवजी ग्रीन टी घेतला तर तो आरोग्याच्या विविध समस्यांसाठी उपयुक्त ठरतो. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंटस असल्याने त्याचाही युरीक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास फायदा होतो. 

युरिक ॲसिड वाढण्याचा त्रास अनेक वर्षांपासून असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करायला हवेत. 


Web Title: natural ways to control or reduce uric acid : 4 Simple Remedies to Control High Uric Acid Levels, Urine-Kidney Problems Get Rid of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.