खजूर पोषण देणारे असल्याने थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी खजूर आवर्जून खाल्ले जातात. खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिन आणि लोह वाढते, ताकद वाढण्यास मदत होते, थकवा दूर होण्यास उपयोग होतो इत्यादी फायदे आपण अनेकदा ऐकतो. त्यानुसार लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळींप्रमाणे सगळेच आवर्जून खजूराचे सेवन करतात. नुसते खजूर खाण्यासोबतच खजूराचे लाडू, रोल, खीर असे बरेच प्रकार केले जातात. उपवासाच्या काळात तर खजूर आवर्जून खाल्ले जातात. फायबर, व्हिटॅमिन, प्रोटीन्स आणि कॅल्शिअम, पोटॅशियम हे मुबलक प्रमाणात असते (neurologist recommends reducing your date consumption because).
पण खजूरामध्ये असणारे गुणधर्म आपल्याला पूर्णपणे माहित असतातच असे नाही. खजूर उष्ण आणि ऊर्जा देणारे असतात इतकंच आपण ऐकून असतो. पण खजूर आरोग्यासाठी अपायकारकही असू शकतात याची आपल्याला कल्पना असतेच असं नाही. हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये न्यूरॉलॉजिस्ट असलेले डॉ. सुधीर कुमार खजूराविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. ट्विटरवर त्यांनी याविषयी पोस्ट केली असून नेटीझन्सकडून कमेंटमध्ये आलेल्या प्रश्नांनाही त्यांनी यात उत्तरे दिली आहेत.
१. खजूरामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. या कॅलरीजमुळे वजनवाढ होण्याची शक्यता असल्याने वजन कमी करायचे असल्यास आपण कॅलरीजचे आहारातील प्रमाण कमी करण्यास सांगतो. १०० ग्रॅम खजूरामध्ये २५० ग्रॅम कॅलरीज असतात, त्यामुळे तुम्ही उपाशी असाल तरच खजूर खा नाहीतर खजूर टाळला तरी चालेल असे जॉ. कुमार सांगतात.
२. खजूर हा लोहाचा उत्तम स्त्रोत आहे त्यामुळे खजूर खाल्लेला चांगला असे म्हटले जाते. पण खजूरापेक्षा लोहाचे इतरही अनेक उत्तम स्त्रोत आहेत. त्यामुळे लोह मिळवायच्या नादात आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण त्यामुळे वाढण्याची शक्यता असते. अशावेळी गूळ खाणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे खजूर खाऊन लोह मिळवण्याच्या नादात शुगर असे एकावर एक फ्रि गोष्ट मिळवायचा नाद नको असे डॉ. कुमार विनोदाने म्हणतात.
३. कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात खाणे आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही जास्त चांगले. त्याचप्रमाणे खजूराच्या १ किंवा २ बिया एकावेळी खाणे ठिक आहे. पण त्यापेक्षा जास्त खजूर खाल्ल्यास कॅलरीज वाढणे, शुगर वाढणे, दात खराब होणे अशा समस्या होतात. तसेच केवळ खजूर खातो म्हणून आपण ठणठणीत आहोत हा समज चुकीचा असून
खजूर केव्हा आणि कसे खावेत ?
Dates are not as healthy as they are thought to be
— Dr Sudhir Kumar MD DM (@hyderabaddoctor) December 5, 2023
Dates are rich in calories- 100 grams of dates provide about 280 calories. So, if you are starving, please have dates; otherwise, better to avoid or minimize consuming dates. https://t.co/dGaPGB9HdM
१. सुरुवातीला तुम्ही १ खजूर खाऊ शकता, मात्र तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर २ ते ३ खजूर खाल्ले तरी चालतील.
२. सकाळी रीकाम्या पोटी, मधल्या वेळेचा स्नॅक म्हणून किंवा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा एखादा खजूर खाणे ठिक आहे.
३. साधारणपणे खजूर रात्री झोपताना ८ ते १० तासांसाठी भिजवल्यास ते पचायला हलके होतात.
४. लहान मुलांमध्ये तब्येत सुधारण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मुलांना आवर्जून खजूर द्यायला हवेत.