रात्री लवकर झोप न येण्याची समस्या लहानपणापासूनच असेल तर मोठेपणीही ही सवय कायम राहू शकते. जीवनशैलीत काही सोपे बदल करून तुम्ही मुलांची ही समस्या टाळू शकता. अनेकदा झोपण्यासाठी मुलांच्या मागे लागावं लागतं. मुलं लवकर झोपावीत यासाठी शारीरिक मानसिक आरोग्यावर लक्ष देणं ही तितकंच महत्वाचं आहे. (Parenting best 5 habits for children)
- रायझिंग चिल्ड्रनच्या मते, दररोज एकाच वेळी झोपण्याचा दिनक्रम निश्चित करा. असे केल्याने शरीर वेळ येताच झोपायला तयार होते. जर तुमच्या मुलांनी झोपण्याची वेळ वारंवार बदलली तर त्यांना झोपेचा त्रास होऊ शकतो. (Parenting best 5 habits for children to get better sleep)
- झोपण्याआधी मुलांना रिलॅक्स करण्याची सवय ठेवली तर त्यांना चांगली झोप येते. यासाठी रात्री अंघोळ करण्याची, पुस्तकं वाचण्याची, चांगली गाणी ऐकण्याची सवय ठेवा.
- जर तुमचं मूल ५ वर्षांपेक्षा मोठे असेल तर दुपारी झोपण्याची सवय लावू नका. दिवसा २० मिनिटं दरी झोप घेतली तरी तब्येतीवर परिणाम होतो आणि रात्री लवकर झोप येत नाही.
- मुलं झोपली असतील तेव्हा खोलीत आवाज नसावा. आरामदायक वातावरणात बेडवर मुलांना झोपवा. त्यांच्या खोलीत लॅपटॉप, मोबाईलचा आवाज किंवा उजेड असेल तर झोप व्यवस्थित लागत नाही.
पोट, मांड्याचा घेर दिवसेंदिवस वाढतोय? घरीच २ व्यायाम करा; पटापट कॅलरी बर्न होतील, स्लिम दिसाल
- मुलांनी रात्रीचे जेवण घेतल्यानंतर 2 तासांनी झोपी जावे. जर ते खाल्ल्यानंतर लगेच झोपायला गेले तर त्यांना झोपायला मदत होणार नाही. या सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर मुलं हळूहळू योग्य वेळी झोपायला शिकतील.