Lokmat Sakhi >Health > मासिक पाळीत होतात असह्य वेदना? प्या ओव्याचा चहा, पाहा कसा करायचा..

मासिक पाळीत होतात असह्य वेदना? प्या ओव्याचा चहा, पाहा कसा करायचा..

Period pain? Try this ajwain tea for instant relief मासिक पाळीच्या काळात पोटात दुखणे, पायात गोळे यावर एक घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 07:09 PM2023-03-18T19:09:16+5:302023-03-18T19:10:44+5:30

Period pain? Try this ajwain tea for instant relief मासिक पाळीच्या काळात पोटात दुखणे, पायात गोळे यावर एक घरगुती उपाय

Period pain? Try this ajwain tea for instant relief | मासिक पाळीत होतात असह्य वेदना? प्या ओव्याचा चहा, पाहा कसा करायचा..

मासिक पाळीत होतात असह्य वेदना? प्या ओव्याचा चहा, पाहा कसा करायचा..

मासिक पाळीतील दिवस महिलांसाठी कठीण जातात. मासिक पाळीमध्ये वेदना होणे सामान्य आहे. मात्र, या वेदना खूप होणे किंवा सतत होत राहणे ही चिंतेची बाब ठरू शकते. या काळात वेदना, मूड बदलणे, अशक्तपणा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. या वेदना मुख्य म्हणजे, हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होतात. या वेदना कमी करण्यासाठी पेन किलर घेतल्यास काही काळ आराम मिळेलही,परंतु हार्मोन्सचे असंतुलन आणखी वाढू शकते. पीरियड क्रॅम्प्स दूर करण्यासाठी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट, मुनमुन गणेरीवाल यांनी ओवापासून तयार एक पेय शेअर केला आहे. ज्यामुळे मासिक पाळीतील वेदना कमी होण्यास मदत मिळेल.

ओवा हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात आढळतो. याच्या वापरामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ओव्यामध्ये अँटिस्पास्मोडिक आणि कार्मिनेटिव्ह गुणधर्म आहेत. ज्यामुळे पचनसंस्था नीट होते. मासिक पाळीच्या समस्येवरही ओव्याची मदत होते. ओव्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट आणि अनेक प्रकारचे खनिजे असतात(Period pain? Try this ajwain tea for instant relief).

स्तनाग्रांवर बारीक फोड किंवा पूरळ आली आहे? हा त्रास लपवू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या..

ओव्याचा वापर करून बनवा चहा

३०० मिली पाणी उकळवा.

त्यात एक चमचा ओव्याचे दाणे टाका.

मंद आचेवर पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा.

गॅस बंद करा. चहाच्या गाळणीने पाणी वेगळे काढा.

आपल्याला हा चहा गोड हवे असल्यास आपण त्यात, साखर कँडी घालू शकता.

पिरिअड पॅण्ट हा प्रकार काय असतो? महिलांना आरोग्याच्या दृष्टीने ते वापरणे फायद्याचे की तोट्याचे?

वेदना जाणवल्यास आपण हा चहा गरम पिऊ शकता.

दिवसातून कितीवेळा हा चहा प्यावा?

ओवा हा गरम मसाला आहे, उन्हाळ्याच्या दिवसात याचा चहा दिवसातून एकदाच प्यावा. मासिक पाळीतील तीन ते चार दिवस आपण याचे सेवन करू शकता. हिवाळ्यात आपण या चहाचे सेवन दिवसातून दोन ते तीनवेळा करू शकता.

मासिक पाळीच्या चार दिवसात शारीरिक संबंध ठेवावेत का? डॉक्टर सांगतात, आरोग्यसाठी योग्य काय...

ओव्याचे फायदे

मासिक पाळीच्या काळात बहुतांश महिलांना अपचन, गॅस, पचनसंस्थेचा त्रास होतो. जर आपल्याला देखील असे होत असेल तर, हा चहा खास तुमच्यासाठी आहे. मासिक पाळीच्या काळात आपल्याला असहय्य वेदना होतात, जे हार्मोनल असंतुलन किंवा इतर काही आरोग्याच्या निगडीत समस्या असू शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.

Web Title: Period pain? Try this ajwain tea for instant relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.