Join us  

युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी प्रायव्हेट पार्टसच्या स्वच्छतेची 'कशी' काळजी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 3:03 PM

Personal Hygiene tips : अनेकदा प्यूबिक एरियात अडकलेले पाण्याचे थेंब तुमच्या अंडरवेअरमध्ये पडतात. त्यामुळे कधी दुर्गंध येतो किंवा आपले आतले कपडे  लवकर खराब होतात.

ठळक मुद्देअनेकदा प्यूबिक एरियात अडकलेले पाण्याचे थेंब तुमच्या अंडरवेअरमध्ये पडतात. त्यामुळे कधी दुर्गंध येतो किंवा आपले आतले कपडे  लवकर खराब होतात.

लघवी केल्यानंतर योनी साफ करण्याची वेळ येते. तेव्हा पाण्याचा वापर करायचा की टिश्यू पेपर असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. अनेक महिलांना आपले प्रायव्हेट पार्ट्स कसे स्वच्छ करायचे याबाबत कल्पना नसते. अनेकदा प्यूबिक एरियात अडकलेले पाण्याचे थेंब तुमच्या अंडरवेअरमध्ये पडतात. त्यामुळे कधी दुर्गंध येतो किंवा आपले आतले कपडे  लवकर खराब होतात. वारंवार असा प्रकार होत राहिल्यानं बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यातून यूरिनरी ट्रॅक्ट संक्रमण (UTI) धोका वाढू शकतो. लघवी केल्यांतर ती जागा साफ केल्यानं हा धोका टाळता येऊ शकतो. 

टिश्यू पेपरनं पुसणं योग्य ठरतं का?

परदेशात नेहमीच महिला स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी टॉयलेट पेपरचा उपयोग करतात. ओलसरपणा शोषून घेण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.  कारण ओलसरपणामुळे बॅक्टेरियांची वाढ होऊ शकते. लघवी केल्यानंतर योनी स्वच्छ सुकी ठेवायची असेल तर टॉयलेट पेपर हा एक उत्तम पर्याय आहे. अनेकदा टॉयलेट पेपरच्या वापरामुळे जास्त प्रमाणात घर्षण होते. त्वचेवर सतत कागद लावल्यानं काहीवेळा त्वचेवर जळजळ आणि त्वचेची संवेदनशीलता कमी झाल्याचे जाणवते. ही बाब बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढण्याचं कारण ठरू शकते. म्हणून योग्य प्रकारे वापर करणं गरजेचं आहे. 

लघवी केल्यानंतर पाण्यानं स्वच्छ करणं कितपत योग्य ठरतं?

प्रायव्हेट पार्ट्स साफ करण्यासाठी पाण्याचा वापर उत्तर पर्याय आहे. पाण्यानं स्वच्छ केल्यास बॅक्टेरियाजचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं. प्रत्यक्ष हाताचा संपर्कही पाण्याच्या वापरानं टाळता येऊ शकतो म्हणून हे अधिक सुरक्षित आहे. पण मुत्र असो किंवा पाणी अंगावरच्या कोणत्याही भागाला ओलसर ठेवणं योग्य नाही. त्यामुळे बॅक्टेरियांची वाढ होऊन आजारांचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही लघवी केल्यानंतर पाण्यानं स्वच्छ करत असाल तर लगेचच टॉवेलनं पुसून घ्या.

टिश्यू आणि पाण्याच्या वापरानं होणारे फायदे, तसंच घ्यायची काळजी तुम्हाला माहीत असल्यास योग्य पर्यायाचा निवड करा. टॉयलेट पेपर आणि पाणी स्वतःच्या प्रायव्हेट पार्ट्सना स्वच्छ ठेवण्याचा सोपा उपाय आहे. या दोन्ही उपायांचा ताळमेळ बसवून योगी मार्गाची योग्य पद्धतीनं साफ सफाई करणं चांगले ठरेल.

निष्काळजीपणा केल्यास यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच लघवीच्या मार्गात होणारं संक्रमण. हे इन्फेक्शन झाल्यास तुम्हाला गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. हे इन्फेक्शन झाल्यास लघवी करताना वेदना होऊ शकतात. बॅक्टेरियामुळे यूरीनरी ट्रॅक्टमध्ये सूज येऊ शकतो आणि लघवी करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो. हे संक्रमण टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

अशी घ्या काळजी

१) पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागत असल्याने शरीराची पाण्याची गरज अधिक वाढते. कमी पाणी प्यायल्याने ब्लॅडरमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने या इन्फेक्शनपासून आराम मिळू शकतो.

२) लघवी न करणे किंवा रोखून ठेवल्याने यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. कारण जेव्हा तुम्ही लघवी रोखून ठेवता तेव्हा ब्लॅडरमधून बॅक्टेरिया बाहेर येऊ शकत नाही. याने आजार होण्याची शक्यता अधिक असते. 

३) यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाले असताना शारीरिक संबंध न ठेवणे योग्य ठरेल. कारण असे केल्यास इन्फेक्शन महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्स मार्गे ब्लॅडरपर्यंत पोहोचू शकतं आणि एका वेगळ्याच आजाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे इन्फेक्शन दूर होण्याची वाट बघा.

४) जर तुम्ही या यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्येवर स्वत:च्या मनाने उपचार घ्याल तर समस्या अधिक वाढू शकते. इन्फेक्शन आणखी पसरू शकतं. तसेच यावर उपचार घेण्यास उशीर केला तर अक्यूट किडनी इन्फेक्शनही होऊ शकतं.  

टॅग्स :आरोग्यमहिलाहेल्थ टिप्स