Lokmat Sakhi >Health > पदार्थात गरम मसाले घातल्यानं ॲसिडीटी वाढते हे खरं की खोटं? काय खायचं काय टाळायचं...

पदार्थात गरम मसाले घातल्यानं ॲसिडीटी वाढते हे खरं की खोटं? काय खायचं काय टाळायचं...

Powerful Health Benefits Of Garam Masala : गरम मसाले पदार्थात गरम मसाले घातल्यानं ॲसिडीटी वाढते? यात कितपत तथ्य, काय खायचं काय टाळायचं, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 05:03 PM2023-07-13T17:03:35+5:302023-07-14T11:08:33+5:30

Powerful Health Benefits Of Garam Masala : गरम मसाले पदार्थात गरम मसाले घातल्यानं ॲसिडीटी वाढते? यात कितपत तथ्य, काय खायचं काय टाळायचं, वाचा

Powerful Health Benefits Of Garam Masala :4 Reasons The Indian Spice Mix Is Healthy For You | पदार्थात गरम मसाले घातल्यानं ॲसिडीटी वाढते हे खरं की खोटं? काय खायचं काय टाळायचं...

पदार्थात गरम मसाले घातल्यानं ॲसिडीटी वाढते हे खरं की खोटं? काय खायचं काय टाळायचं...

भारतात गरम मसाले हे स्वयंपाकाची शान समजले जातात. कोणत्याही पदार्थाला चविष्ट बनवण्यासाठी गरम मसाल्यांचा वापर केला जातो.  आरोग्याच्या दृष्टीनेही या मसाल्यांचे अनेक फायदे आहेत. काही लोकांना असं वाटतं की गरम मसाले तब्येतीसाठीही गरम पडतात. पोटातील जळजळ, गॅस, एसिडिटी वाढते. लाईफस्टाईल कोच ल्यूक कॉटिन्हो यांच्यामते यात फारसे तथ्य नाही. गरम मसाल्याचे  अनेक फायदे आहेत. (Powerful Health Benefits Of Garam Masala)

यामुळे गॅस, एसिडिटीची समस्या अजिबात वाढत नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी दावा केला आहे की गरम मसाल्यांमध्ये वापले जाणारे धणे, जायफळ, दालचिनी, वेलची, लवंग, बडिशेप, गोल मिरची, मोहोरीचे दाणे हे सर्वच प्रभावी पदार्थ असून फायदेही अनेक आहेत.  (Garam Masala Benefits Reasons The Indian Spice Mix Is Healthy For You)

गरम मसाल्यांचा जेवणात समावेश करण्याचे फायदे

1) आयुर्वेद हे आपल्या देशातील वैद्यकीय शास्त्राचे मोठे वरदान आहे. काही लोक म्हणतात की गरम मसाल्यांचा प्रभाव गरम असतो, ज्यामुळे पोटात उष्णता निर्माण होते आणि गॅस आणि ऍसिडिटीची समस्या देखील होते. ही गोष्ट एक मिथ आहे. अर्थात ते गरम आहे परंतु आपल्याला गरम अन्न आवश्यक आहे. जर गरम मसाला काहीजणांच्या तब्येतीसाठी त्रासदायक ठरत असेल असेल तर त्याची आणखी काही कारणे असावीत, परंतु सामान्यतः निरोगी व्यक्तीला गरम मसाल्यामुळे इजा होत नाही.

2) गरम मसाले डायजेशन सुधारून गॅस्ट्रिक ज्यूस रिलिज करण्यास मदत  करतात. अपचनाची समस्या यामुळे  दूर होते. गरम मसाले डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी उत्तम ठरतात. यामुळे डायजेस्टिव्ह एंजाईम्स वाढतात आणि पोषक त्तव बाहेर येतात. इतकंच नाही तर ब्लोटिंगची समस्याही दूर होते. 

3) गरम मसाल्यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात जे चयापचय वाढवतात. हे चरबी जाळण्यास देखील मदत करते. म्हणजे वजन कमी करण्यासाठी गरम मसाला देखील प्रभावी आहे. यासोबतच गरम मसाल्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेची समस्या दूर करतात आणि जळजळ होऊ देत नाहीत.

4)  गरम मसाला मूत्रपिंड आणि यकृत डिटॉक्सिफाय करण्यात आणि त्यातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास प्रभावी आहे. जर एखाद्याला श्वासातून दुर्गंधी येत असेल तर लवंग आणि दालचिनी खूप प्रभावी ठरते.

Web Title: Powerful Health Benefits Of Garam Masala :4 Reasons The Indian Spice Mix Is Healthy For You

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.