Lokmat Sakhi >Health > वय वाढलं की कमी होतात आई होण्याचे चान्सेस ? वय आणि फर्टिलिटी यांचा संबंध, फायदे तोटे वाचा

वय वाढलं की कमी होतात आई होण्याचे चान्सेस ? वय आणि फर्टिलिटी यांचा संबंध, फायदे तोटे वाचा

Pregnancy Health Tips : 40 नंतर गर्भवती होणे अशक्य गोष्ट नाही. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की 40 ते 44 वयोगटातील प्रत्येक ओव्हुलेटरी चक्रानंतर गर्भधारणेचे प्रमाण 5% कमी  होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 01:40 PM2021-05-24T13:40:40+5:302021-05-24T13:53:52+5:30

Pregnancy Health Tips : 40 नंतर गर्भवती होणे अशक्य गोष्ट नाही. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की 40 ते 44 वयोगटातील प्रत्येक ओव्हुलेटरी चक्रानंतर गर्भधारणेचे प्रमाण 5% कमी  होते.

Pregnancy Health Tips: How much your age matters for fertility | वय वाढलं की कमी होतात आई होण्याचे चान्सेस ? वय आणि फर्टिलिटी यांचा संबंध, फायदे तोटे वाचा

वय वाढलं की कमी होतात आई होण्याचे चान्सेस ? वय आणि फर्टिलिटी यांचा संबंध, फायदे तोटे वाचा

Highlights फर्टिलिटीची समस्या महिलांमध्ये तसंच पुरूषांमध्येही जाणवू शकते. महिलांच्या वयाचा यावर परिणाम होऊ शकतो. याची समज दोघांना असणं गरजेचं आहे. तरच गर्भधारणा आणि गर्भावस्थेदरम्यान योग्य पर्याय निवडण्यास मदत होऊ शकते. 

आपल्या आजूबाजूच्या जास्तीत जास्त महिलांना फर्टिलिटी म्हणजेच प्रजननाशी संबंधीत गोष्टींबाबत अधिक माहिती इसते. त्यातही बायोलॉजिकल क्लॉकबाबत अजिबातच माहिती नसते. जेव्हा कोणतंही जोडपं बाळासाठी प्लॅनिंग सुरू करतं त्यावेळी असे शब्द कानावर पडतात. फर्टिलिटीची समस्या महिलांमध्ये तसंच पुरूषांमध्येही जाणवू शकते. महिलांच्या वयाचा यावर परिणाम होऊ शकतो. याची समज दोघांना असणं गरजेचं आहे. तरच गर्भधारणा आणि गर्भावस्थेदरम्यान योग्य पर्याय निवडण्यास मदत होऊ शकते. 

पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या वयाचा फर्टिलिटीवर कसा परिणाम होतो?

जर वय प्रजननक्षमतेसाठी अंगभूत घटक मानले गेले तर त्याचा परिणाम स्त्रिया आणि पुरुषांवर वेगळा होतो. महिला निश्चित संख्येने स्त्री बीज (अंडी) घेऊन जन्माला येतात, जे वाढत्या वयानुसार कमी होत जातात. विशिष्ट वयोमर्यादेनंतर स्त्री बीज संपायला सुरूवात होते. या अंड्याना पुन्हा तयार केलं जाऊ शकत नाही. तुलनेनं पुरूषांच्या शरीरात वीर्य सतत तयार होत असते. यावरून दिसून येते की गर्भधारणेसाठी महिलांनी विशिष्ट वयोमर्यादेतच प्रयत्न करायला हवेत. पुरूष आपल्या वयाच्या ६० व्या वर्षीही वडील बनू शकतात. आज आम्ही तुम्हाला फर्टिलिटीचे योग्य वय नेमके कोणते याबाबत सांगणार आहोत

वयाच्या दुसऱ्या दशकात गर्भधारणा

तज्ज्ञांच्या मते हे वय मुळ जन्माला घालण्यासाठी  उपयुक्त असते. कारण या वयात महिला जास्त फर्टाईल असतात. दुसऱ्या  दशकाच्या सुरूवातीला आणि शेवटी फर्टिलिटीमध्ये फारसा फरक जाणवत नाही. 

या वयात गर्भधारणा झाल्यास काय फायदे होतात?

महिलांच्या अंड्यांमध्ये अनुवांशिक असमानता होण्याची शक्यता कमी होते. या वयात कोणताही अनुवांशिक आजार उदा, डाउन्स सिंड्रोम, थॅलेसीमिया या आजाराची लागण मुलांना होत नाही. गर्भपाताचा धोका फक्त १० टक्के असतो.  मुलाच्या जन्माच्यावेळी वजन कमी न राहता व्यवस्थित विकास होतो. याशिवाय आईला गर्भकालिन डायबिटिज, हायपरटेंशन याप्रमाणे अन्य समस्यांचा धोका कमी असतो. 

या वयात गर्भधारणा झाल्यास होणारं नुकसान

पहिल्यांदा प्रेग्नेंसीत कॉम्प्लिकेशनचा धोका जास्त असतो. जर तुम्हाला पीसीओडी किंवा गर्भाशय फाइब्रॉएड किंवा दुसरा कोणताही आजार असेल तर गर्भावस्थेदरम्यान कठीण प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. पुरूषांच्या बाबतीत अधिक चिंता करण्याचं कारण नसतं. कारण पुरूषांमध्ये जर जीवनशैली खराब असेल तर इनफर्टिलिटीच्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो. लठ्ठपणा, सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीज आणि डायबिटीज याचे मुख्य कारण असते. पुरूषांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला तर ही समस्या टाळता येऊ शकते. पुरूषांमध्ये सेक्सूअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन स्पर्मची गतीशीलता कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. 

तिसऱ्या दशकात गर्भधारणा

जर एखादी स्त्री तिच्या तिसऱ्या दशकात गर्भवती होऊ इच्छित असेल तर प्रत्येक महिन्यात गर्भवती होण्याची शक्यता 15 ते 20% दरम्यान असते. यासाठी देखील त्यांच्यात कोणतीही मूलभूत स्थिती (आधीपासूनच एक गंभीर आजार) असू नये. एका अभ्यासानुसार, वयाच्या तिसऱ्या दशकात स्त्रिया त्यांच्या पहिल्या प्रयत्नात गर्भवती होण्याची शक्यता 30% अधिक असते.

जेव्हा स्त्री 35 वयात पोहोचते तेव्हा अंड्यांची गुणवत्ता आणि प्रमाण कमी झाल्यामुळे तिची प्रजनन क्षमता कमी होते. वयाच्या 35 व्या वर्षानंतर, नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात कमी होते. या वयात जुळे किंवा तिळे होण्याची शक्यता जास्त असते.

तिसऱ्या दशकात गर्भधारणा होण्याचे नुकसान

सी सेक्शनची भीती जास्त असते. 

लहान मुलांमध्ये अनुवांशिक आजार होण्याची भीती असते. 

गर्भपात होण्याची संभावना वाढते.

एक्टोपिक गर्भधारणा (एक्टोपिक गर्भधारणेमध्ये फर्टिलाईज्ड अंडी गर्भाशयाला जोडत नाही, उलट ते फॅलोपियन ट्यूब, उदरपोकळी किंवा गर्भाशयशी जोडतात.) 

40 नंतर गर्भधारणा

40 नंतर गर्भवती होणे अशक्य गोष्ट नाही. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की 40 ते 44 वयोगटातील प्रत्येक ओव्हुलेटरी चक्रानंतर गर्भधारणेचे प्रमाण 5% कमी  होते. वयाच्या 45 वर्षानंतर हा दर 1% होतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, जगातील निम्म्या स्त्रिया आपल्या वयाच्या चौथ्या  दशकात प्रजनन समस्यांनी ग्रस्त आहेत. या वयात पुरूषांची प्रजनन क्षमताही हळू हळू कमी होते. कारण शुक्रांणूंच्या संख्येत कमतरता जाणवते. 

खरं पाहता तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा बाळ होण्यासाठी प्लॅनिंग करू शकता. करिअरमुळे तुम्ही थोडं उशिरा बाळाला जन्म देण्याचा विचार करत असाल तर त्यांच व्यवस्थित नियोजन करा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या, व्यवस्थित आहार घ्या.  जेणेकरून जेव्हा आपण कुटुंब वाढविण्यास तयार असाल तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागू नये.
 

Web Title: Pregnancy Health Tips: How much your age matters for fertility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.