गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल घडतात (Stretch Marks). त्यातील एक म्हणजे स्ट्रेच मार्क्स. स्ट्रेच मार्क्समुळे स्त्रियांच्या शरीराचे सौंदर्य खराब होते असं म्हणतात (Women health). ज्यामुळे काही महिलांना न्यूनगंडही येतो. महिला हे मार्क्स लपवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात. पण तरीहीस्ट्रेस मार्क्स जात नाही (Skin Care Tips). स्ट्रेच मार्क्स येण्यामागे अनेक कारणं आहेत. प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढतं. ज्यामुळे पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचे स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. वजन कमी केल्यानंतरही हे स्ट्रेच मार्क्स जात नाहीत. पण स्ट्रेच मार्क येण्यामागचं कारण काय? ते घालवण्यासाठी नक्की कोणते उपाय उपयुक्त ठरतील?
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.तान्या गुप्ता यांच्या मते, कोणतीही क्रीम स्ट्रेच मार्क्स घालवू शकत नाही. शिवाय काही क्रीम्समध्ये केमिकल रसायने आढळतात. ज्यामुळे स्किनवर डाग उठण्याची शक्यता असते. जर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने स्ट्रेच मार्क्स घालवायचे असतील तर, काही घरगुती तेलांचा वापर करा'(4 Essential Oils to Help Heal or Prevent Stretch Marks).
द्राक्षाच्या बियांचे तेल
स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी आपण द्राक्षाच्या बियांच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलात पुरेशा प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि लवचिकताही वाढते. या नैसर्गिक तेलाने दररोज मसाज केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात.
केसांची वाढ खुंटली? बघावं तेव्हा गळतात? टक्कल पडण्याआधी ५ रुपयाच्या कडीपत्त्याचा वापर करून पाहा..
सूर्यफुलाचे तेल
सूर्यफुलाचे तेल स्ट्रेच मार्क्स घालवण्यास मदत करते. हे नैसर्गिक तेल जीवनसत्त्वे आणि फॅटी ऍसिडने समृद्ध आहे. ते तेल लावून स्किनवर मसाज केल्याने त्वचेला खोल पोषण मिळते. तीन महिने या तेलाचा वापर केल्यास नक्कीच फरक दिसून येईल.
भिजलेले बदाम की शेंगदाणे? सद्गुरू सांगतात मुठभर 'ही' गोष्ट खा; दिवसभर राहाल एनर्जेटिक
एरंडेल तेल
स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी आपण एरंडेल तेलाचा वापर करू शकता. गर्भावस्थेच्या सुरुवातीला या तेलाने पोटाच्या आजूबाजूच्या भागाला तेल लावून मसाज करा. यामुळे स्ट्रेच मार्क्स पडणार नाहीत. यामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेट राहील.
खोबरेल तेल
स्ट्रेच मार्क्सवर सर्वात उपयुक्त घरगुती उपाय म्हणजे खोबरेल तेल. नारळाचे तेल हे नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल सारखे काम करते. गरोदरपणाचा काळ सुरु झाल्यावर नारळाचे तेल लावण्यास सुरुवात करा. यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसू लागण्यापूर्वीच त्यांना अटकाव बसतो. शिवाय याचा त्रास पुढे होत नाही.